चारापीक - स्टायलो हेमाटा
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
स्टायलो हेसुद्धा द्विदल वर्गातील चाऱ्याचे पीक आहे. ऑस्ट्रेलियातील कुरणात हे पीक
मोठ्या प्रमाणात आढळते. त्याचे मूळ उगमस्थान ब्राझील आहे. आपल्याकडेसुद्धा ह्या चारापिकाची
लागवड यशस्वी झालेली काही भागात पहावयास मिळते. त्यामुळे अलीकडे चराऊ रानात या पीकची
मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे. स्टायलो हे पीक चारा - चराई करण्यासाठी
तसेच वाळवून साठविण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. जनावरांसाठी यापासून मुबलक प्रमाणात चारा मिळतो.
चाऱ्याची प्रत पाहिली असता असे दिसून येत की, याचा चार पौष्टिक व पाचक आहे. त्यात प्रथिने
१२%, तंतुमय पदार्थ ३८%, खनिजे ८.५%, चरबी १ टक्का व शर्करा ४०.५% आढळते.
.
*जमीन व हवामान : स्टायलो या चारा पिकासाठी जमीन निवडताना बहुधा ती मध्यम व हलकीच निवडावी. मुरमाड व अतिशय हलक्या जमिनीवरही, कमी पावसात, ३८ ते २५० सें.मी. पाऊसमान असणाऱ्या भागात हे पीक चांगल्या प्रकारे वाढू शकते. हलक्या, मध्यम व भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक उत्तम येत असले तरी देखील साधारण आम्लयुक्त जमिनीतही हे पीक चांगले वाढीस लागते.
* पूर्व मशागत : पावसळ्यापूर्वी मशागत न केलेल्या रानातही याचे बी टाकले तरी ते उगवते. तथापि शक्य झाल्यास एक खोलवर नांगरट व एक कुळवाची पाळी देऊन जमीन भुसभुशीत करून पेरणीस तयार ठेवणे फायद्याचेच ठरणारे असते. सुरूवातीच्या वेळीच शेतजमीन तणे, धसकटे, दगडधोंडे वेचून स्वच्छ ठेवावी.
* बी व पेरणी : वास्तविक पाहता, स्टायलो या चारापिकासाठी बी निवडताना ते भेसळयुक्त नसावे. रोगविरहीत, टपोरे, न फुटलेले, वजनदार बियाणे निवडावे. ओळीतील अंतर ५० सें. मी. ठेवून हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे फोकले जाते अथवा ८ ते १० किलो बियाणे पाभरीने पेरावे. बी साधारणत: १ सें.मी. खोलीवर पेरावे. त्यापेक्षा जास्त खोल बी पेरले तर उगवण चांगली होत नाही, बी फोकून व हलकी चाळणी अथवा हलकी कुळवाची पाळी दिल्यावरही चांगली उगवण होते. पीक वाढीला लागल्यावर बी पडून त्याच रानात ते दरवर्षी आपोआप उगवत राहते. तसेच बियाणाच्या टोकास आकडा असल्यामुळे गुरांच्या अंगाला चिकटून बियाणाचा आपोआप प्रसारदेखील होत असतो.
बीजप्रक्रिया : बियाची लवकर व जास्तीत जास्त उगवण होण्यासाठी तसेच जास्त फुटवे फुटण्यासाठी जर्मिनेटर ३० मिली + १ लि. पाणी या द्रावणात १ किलो बी याप्रमाणे ३ - ४ तास बी भिजवून नंतर सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे.
खते : स्टायलो हेमाटा या चारापिकासाठी जुलै ते ऑगस्ट या काळात दरवर्षी एकदा २०० ते २५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत प्रति हेक्टरी द्यावे. त्याचप्रमाणे १० किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश ह्या खतांच्या मात्रा (Base Dose) प्रति हेक्टरी द्याव्यात.
पाणी : जमिनीचा प्रकार, हंगाम आणि जातीपरत्वे पाण्याच्या पाळ्या ठरवाव्या लागतात. स्टायलो ह्या चारापिकासाठी साधारणत: २० ते २५ दिवसांच्या अंतरने पाणी देले तरी चालते. जमीन फारच निचऱ्याची असल्यास १५ दिवसांनी पाणी द्यावे.
जाती : साधारणत: लसूणघास व काहीसे लाख या पिकासारखे हे पीक दिसते. स्टायलोच्या हंगामी तसेच बाहुवार्षिक अशा अनेक जाती उपलब्ध आहेत. एस हेमाटा, एस ह्युमिलीस, एस स्केवरा, स्तयलोंसन्सस हेमटा, संब्रो ह्युमिलिस. इ. जातींचा यामध्ये समावेश होतो.
फेबदल व मिश्रपीक : स्टायलो हे चाऱ्याचे पीक इतर गवतांत मिश्र पीक म्हणून घेणे ही फायदेशीर आहे. मद्रास अंजन, धामण, ऱहोडस, मारवेल, दिनानाथ इ. गवतांबरोबर लागवडीस योग्य आहे. त्यासाठी या गवतांच्या बियाणातच स्टायलोचे बी हेक्टरी ४ - ५ किलो याप्रमाणे मिसळून पेरावे. अगर स्वतंत्र पट्टा पद्धतीने पेरणी करावी. म्हणजे ५ ओळी गवताच्या पट्ट्या नंतर ५ ओळी स्टायलोच्या पट्ट्या पेरणेही फायदेशीर ठरते.
फवारण्या : स्टायलो पिकाची वाढ, फुट लवकर होऊन चाऱ्याचा दर्जा, पौष्टिकमुल्य वाढीसाठी पुढीलप्रमाणे
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पीक कापणीपर्यंत ३ फवारण्या कराव्यात.
१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० - १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी : (वरील फवारणीनंतर १५ दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रिझम ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ३०० मिली.+ १५० लि.पाणी.
३) तिसरी फवारणी : (वरील फवारणीनंतर १५ ते २१ दिवसांनी ) : जर्मिनेटर ७५० मिली.+ थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + प्रिझम ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + २०० लि.पाणी.
* कापण्या : स्टायलो या चारापिकाच्या सर्वसाधारणपणे २ कापण्या केल्या जातात. हा चारा चराई करण्यासाठी तसेच वाळवून साठविण्यासाठी किंवा सायलेजमध्ये वापरात येतो.
उत्पन्न : स्टायलोपासून २५० ते ३५० क्विंटल प्रति हेक्टरी हिरवा चारा उपलब्ध होतो व १० ते ११ टन वाळलेला चारा मिळतो. अधिकाधिक उत्पादन वाढण्यासाठी शेतकरी बांधवांनी वरीलप्रमाणे लागवडीचे तंत्र अवलंबावे.