विदर्भासाठी पिकाचा नवीन क्रॉपिंग पॅटर्न

डॉ. सुनिल वामनराव सुपले, (बी.ए.एम.एस.),
मु. पो. नारा (वामनवाडी) ता. कारंजा (घाडगे), जि. वर्धा,
मो. ९४२२३११५१


मला वर्ध्यामध्ये फोरसाईट कृषी सेवा केंद्र यांचेकडून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. माझ्या कडे ५ वर्षापुर्वी लावलेली सागाची ३ हजार झाडे आहेत. हैद्राबादवरून ८० रू. प्रमाणे रोपे मिळाली होती. सागाला ठिबक आहे. सध्या झाडे २० फुट उंचीची असून खोड १ फूट जाडीचे आहे. ६' x ६' वर लागवड आहे. माझ्याकडे १० एकर जमीन असून ७ एकरमध्ये कापूस असतो. आमच्या भागात पाणी कमी आहे, तेव्हा सिताफळ व डाळींब लावायचे आहे. यासाठी सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे.

माझे मुळ गाव वरूड (अमरावती) असून राहतो नागपूरला व शेती नारा (कारंजा घाडगे) येथे आहे. मी डॉक्टरकीची १५ वर्ष प्रॅक्टिस केली. मात्र ४ ते ५ वर्षापुर्वी माझा अपघात झाला. त्यानंतर २ - ३ वर्ष विश्रांती घ्यावी लागली. पुढे मग डॉंक्टरकीची प्रॅक्टिस बंद करून प्रकृती स्वास्थ्यासाठी शेती करण्याचे ठरविले. शेतामध्ये घर बांधून जास्तीत - जास्त वेळ शेतातच घालवितो.

सागाला दिवसातून ३ तास ठिबकने पाणी देतो. तासाला ८ लि. चा डिस्चार्ज आहे, तेव्हा सरांनी सांगितले, सागाला हे पाणी जास्त होत आहे. तेव्हा याच पाण्याचा वापर सिताफळ आणि डाळींबाला आपण करू शकतो. सागाला सध्याच्या परिस्थितीत १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत देवून आच्छादन करावे. खोडाला २ - २ टोपली माती टाकून हुंडी केली आहे. आता सरांनी सांगितले, "बाजूची माती ओढून आळे करा, म्हणजे मुळे तुटणार नाहीत आणि खत दिल्यानंतर जर्मिनेटर १ लि. व प्रिझम १ लि. ची २०० लि. पाण्यातून महिन्यातून एकदा किंवा आता एकदा व पाऊस पडल्यावर एकदा आळवणी करा. तसेच जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. + प्रिझम ५०० मिली + प्रोटेक्टंट १ किलो २०० लि. पाण्यातून जमले तर आता किंवा गुढीपाडव्याला एकदा मारुरी पंपाने सागाचे खोड, पाने, फांद्यांवर फवारावे."

मागे खोडाला कीड लागली होती तेव्हा पेट्रोल इंजक्शनने सोडले व मातीने होल बंद केले. तेव्हा खोडकिड आटोक्यात आली. यावर सरांनी सांगितले, "१ किलो चुना + १ किलो गेरू + १ किलो प्रोटेक्टंट +१ किलो मोरचुद हे २० लिटर पाण्यात प्लॅस्टिक ड्रममध्ये कालवून तागाच्या कुंच्याने खोडाला ३ फूट ते ५ फुटापर्यंत लावावे. म्हणजे कीड येणार नाही. ठिबक खोडाच्या एका बाजूला असल्याने ज्याठिकाणी ठिबकचे पाणी पडते तेथेच कल्पतरू सेंद्रिय खत द्या. म्हणजे या खताने आपोआप गांडूळ निर्माण होतील. तसेच आपल्या १० एकर जमिनीतील गवत, काडीकचरा जमा करून त्यावर एक किलो डाळीचे पीट व १ किलो गुळ १५ लि. पाण्यातून शिंपडावे. म्हणजे ५ - ६ महिन्यात गांडूळ खत तयार होईल. मात्र हा खड्डा कडूनिंब किंवा वडाच्या झाडाखाली करावा. म्हणजे ओलावा टिकून राहील. विदर्भातील उष्णतेने गांडूळ हे ओलाव्याच्या शोधात खड्डयाच्या खाली ने जाता वरच्या थरात राहून गवत खावून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होईल व मग हे गांडूळ खत सागाला १ - १ किलो देवू शकाल."

सरांनी सांगितले "कढीपत्ता, सिताफळ, रामफळ, कवठ. 'सिद्धीविनायक' शेवगा ही पिके कमी पाण्यावर घेता येतात. यात आंतरपीक सांबार (कोथिंबीर) करा. सिताफळ, कढीपत्ता, अंजीर ही पिके मृग नक्षत्रात लावली तर फूट व मुळी मुकि होते. म्हणून ती वसंत ऋतूत (शिमगा झाल्यावर गुढीपाडव्यापर्यंत) लावावीत. म्हणजे त्यांना लवकर पालवी फुटते. मात्र याला या अवस्थेत पाणी आवश्यक असते. सिताफळाला कीड लागत नाही. हे झाड काटक आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावरही तग धरते. सिताफळाला जर्मिनेटर, थ्राईवर, प्रोटेक्टंटची आळवणी व फवारणी करावी. प्रोटेक्टंटने मिलीबगचा अटॅक कमी होतो. ज्यावेळेस ३ वर्षांनी फळे लागतात तेव्हा त्याला सप्टेंबर ते डिसेंबर आपोआप ताण बसतो. डिसेंबरमध्ये एक पाटी गांडूळखत व १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत देवून पाणी महाशिवारात्रीला द्यावे. नंतर मार्च - एप्रिल या काळात १ महिन्यात ऐन उन्हाळ्यात शेंड्याला फूल लागते. तेव्हा उष्णता तीव्र असल्याने पश्चिमेकडील उन्हाने फुले टिकत नाहीत. पाकळ्या सुकतात, देठ सुकतो, परंतु याही परिस्थतीत फुले पानाखाली लागली तर टिकताना. नंतर जुनमध्ये कल्पतरू सेंद्रिय खत देतो येते. पहिल्या वर्षी ३० - ४० फळे धरावीत. ही फळे गौरी - गणपतीत येतात. दसरा - दिवाळीत फळे येवू नये असे नियोजन करावे. कारण या सणात भाव नसतो. गौरी - गणपतीत या फळांना सुरत, अहमदाबाद मार्केटमध्ये चांगले भाव मिळतात.

गेली २० - २५ वर्षापासून पळसखेडयाचे नारायण धो. महानोर हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतात. त्यांची फळे तेथे जातात. फळांचा दर्जा सुधारत असल्याने तेजीचे भाव सापडतात, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर सिताफळाच्या बियाच्या उगवणीसाठी ते नेहमीच वापरतात. त्यामुळे खात्रीशीर उगवण होवून दर्जेदार रोपे तयार होत असल्याने त्यांनी पुणे ऑफिसला येवून प्रत्यक्ष भेटीत कळविले.

उत्पन्नाच्या दृष्टीने डाळिंबाचे पैसे होतात. पण कष्ट कमी, देखरेख कमी असेल तर सिताफळ करा, असे सरांनी सांगितले. मी विचारले सिताफळ व डाळींब दोन्ही लावले तर, यावर सरांनी सांगितले , "आपल्या भागातील श्री. विश्वजीत आकरे यांचा डाळींबाचा प्लॉट पहा. त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २१ एकर डाळींब यशस्वी केले आहे. म्हणजे त्यांचे प्लॉट पाहिल्यावर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सिताफळ व डाळींब ही दोन्ही पिके आपण यशस्वीकरू." सरांना डाळींबाच्या कलमाविषयी विचारले असता, "भगवा डाळींबाच्या गुट्या घ्या. गुट्याची रोपे काटक असतात. रोगप्रतिकारक शक्ती ज्यादा असते. तेव्हा पाणी कमी असल्याने प्रथम तुम्ही १ एकर डाळींब व १ एकर सिताफळ करा." असा सरांनी सल्ला दिला.

उन्हाळ्यात १७ मार्च ते २० जुलैपर्यंत सांबार (कोथिंबीर) तुषार सिंचनावर घेता येतील. याला उन्हाळ्यात हमखास बाजारभाव मिळतो.