काकडी तारेवर वा जमिनीवर डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पन्न सारखेच, खर्चात बचत माल १ नंबर

श्री. भगवान मारुती हुलावळे,
मु.पो. कोंढावळे, ता. मुळशी, जि. पुणे,
मोबा. ९५४५८५९४४७



काकडी, वांगी या पिकांना ७ - ८ वर्षापासून डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. गेल्यावर्षी अर्धा एकर जिप्सी काकडी जानेवारीत लावली होती. तारेवर ३० सऱ्या होत्या व खाली १० सऱ्या होत्या. ४२ दिवसात काकडी चालू झाली. काकडीला डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीच्या १५ दिवसाला ३ फवारण्या केल्या होत्या. माल चालू झाल्यानंतर फवारण्याची गरज भासली नाही. पानांवर केवडा येत असला किंवा पाने जाडी भरडी, करपायुक्त निस्तेज असली आणी डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी केली तर लगेच तिसऱ्या दिवशी पाने हिरवीगार होतात. नवीन पाने निघतात. शेंडा जोमाने चालतो. त्यामुळे फुलकळ्या ज्यादा लागतात. त्यांची गळ होत नाही. काकडी माल पोसण्यास मदत होते. काकडीचे वजन वाढले तरी माल कोवळा राहतो.

काकडी लावलेली जमीन मध्यम काळी निचऱ्याची आहे. त्यामुळे तोडा झाला की, पाणी देतो. असे दिवसाआड तोडा व पाणी चालू असते. पाणी दिल्याने काकडीचा माल टवटवीत व वजनदार मिळतो. काकडी ३ पानांवर असताना १९:१९:१९ च्या ३ बॅगा आणि युरियाची १ बॅग असे मिश्रण खोडाजवळ गाडून देतो. त्यानंतर झाल्यावर ८ - ८ दिवसाला २५ - २५ किलो युरिया पाटपाण्यातून देतो.

दिवसाआड ७०० - ८०० किलो माल निघत होता. गोण्यात भरून पुणे मार्केटला काकडी आणत होतो. गोणीचे वजन ४० - ४५ किलो भरत असे. ८० रू. पासून १०० रू./१० किलोस भाव मिळत होता. असे १७ - १८ तोडे १।। महिन्यात झाले. ७० - ८० हजार रू. ची काकडी झाली.

आम्हाला तारेवर व जमिनीवरच्या काकडीमध्ये अनुभव असा आला की, काकडीचे वेल पोकळ असल्याने तारेवर सोडले की मालाने तारेवरचा वेल पिचकतो. त्याला जोम चालत नाही. त्यामुळे मालामध्ये वाढ होत नाही. तारेवरच्या वेलाची काकडी मात्र सरळ, डाग विरहीत असते. त्यामुळे त्याला १० किलोस १५ ते २० रू. ज्यादा भाव मिळतो. बाजार ज्यादा मिळाला तरी माल जमिनीवरच्या मालाएवढाच निघत असल्याने उत्पन्नात फारसा फरक पडत नाही. कारण ३० सऱ्यांसाठी १० किलो तार लागली. तिचे ८० रू. प्रमाणे ८०० रू. आणि ३ हजार रू. चे बांबू असा मजुरीसह ५ हजार रू. ज्यादा खर्च केला. त्यामानाने उत्पन्नात फरक फरक जाणवला नाही. मात्र तारेऐवजी पुर्ण मांडव जर केला तर उत्पन्नात निश्चित वाढ होईल. पण तेवढा (मांडवाचा) खर्च करणे आम्हाला शक्य होत नाही. त्यामुळे चालू वर्षी तार काठी न करता वेल जमिनीवरच सोडले आहेत. दरवर्षी अर्धा एकर काकडीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ७० - ८० हजार रू. चे उत्पन्न मिळत असते.

चालू वर्षी फेब्रुवारीत पाऊस झाल्याने काकडी लागवड उशीरा झाली. ती २० फेब्रुवारीला लावली आहे. दरवर्षी जानेवारीत लावत असतो. सध्या १५ दिवसाची काकडी २ - ३ पानांवर आहे. याकरिता आज सप्तामृत १ लिटर घेवून जात आहे. ते वांग्याला देखील वापरणार आहे. माऊली वांगी २ महिन्यापुर्वी अर्ध्या एकरमध्ये २ हजार रोपे लावली आहेत. त्याचीही जमीन मध्यम काळी असून ३।। x ३।। फुटावर लागवड आहे. या वांग्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची १ महिन्याची वांगी असताना १ फवारणी केली. वांग्याची वाढ १ नंबर आहे. गुडघ्याएवढी झाडे झाली असून माल लागण्यास सुरुवात झाला आहे. १० - १२ दिवसात तोडा चालू होईल. फुलकळी भरपूर आहे. किडीच्या बंदोबस्तासाठी प्रोफेक्स - सुपरची १ फवारणी केली आहे.