डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या गोड अनुभवाच्या जुन्या आठवणी साऱ्यांसाठी मार्गदर्शक
श्री. बाबुराव नानासाहेब कर्णे (वय ७४),
मु.पो.डिस्कळ, ता.खटाव, जि.सातारा.
मोबा. ९९६०९७०५३१
२५ वर्षापुर्वी शेती करत असताना नियमित १० वर्षे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कोबी, टोमॅटो, काकडी,
दोडका, कारली, द्राक्ष या पिकांना वापरली. त्यावेळी द्राक्ष तास - ए - गणेश २ एकर आणि
सोनाका २ एकर होती. द्राक्षाला लागवडीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरली. पुढेही उत्पादनासाठी
नियमित एप्रिल छाटणीपासूनच वापरत असे. त्यामुळे द्राक्षाची पाने जाड, हिरवीगार राहून
प्रकाश संश्लेषण चांगले होत असे. रोग प्रतिकारक शक्ती वाढत होती. त्यामुळे रोगराई कमी
राहत असे. विकृती येत नसत. मालाला चमक येत असे. दोन्ही वाणांच्या द्राक्षाचे एकरी १८
ते २२ टन उत्पादन मिळत असे. २७ टनांपर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पादन
घेतले आहे. सर्व माल मुंबई मार्केटला
जात असे. त्यावेळी १५ ते २० किलोच्या करंड्यांमधून माल पाठविला जात असे. तेव्हा भाव
१२ ते १५ रू. तर जास्तीचा २० रू. किलो मिळत होता.
सोनाकाचे १। इंचापर्यंत लांब मणी मिळत होते. मण्यांचे ४ ते ५ ग्रॅम वजन भरत असे. तेव्हा एकरी ५० ते ६० हजार रू. एकूण खर्च येत असे. यातील ४ - ५ हजार रुपये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर खर्च होत होता. त्याकाळी १।। ते २ लाख रुपये उत्पन्न मिळायचे. खर्च वजा जाता १ लाख रू./एकरी नफा सहज शिल्लक राहत होता. त्यामुळे चांगले परवडायचे. त्याकाळीदेखील कधीकधी गारपिटीचा धोका निर्माण होत होता. एकदा ३ एकरातून साधारण १० लाख रुपयाचा माल काढणीस आला असताना १६ जानेवारी १९९५ ला अचानक गारपीट झाली. ती फक्त ४ ते ५ मिनिटेच होती. मात्र एवढी भयानक होती की ५- ६ इंच गारांचा थर साचला होता. डोळ्यादेखत सर्व घड व द्राक्षाची पाने गळाली . याचा धक्का बसला. मात्र हसूही आले. ते याचे की, ५ मिनिटांपुर्वी १० लाखाचा मालक ५ मिनिटात शून्य झालो होतो. लोकांना वाटले यांना याचा धक्का बसून वेड लागले. गावातून जाताना अशी कुजबूज ऐकायला मिळत होती. मात्र अशा परिस्थितीतूनही सावरलो.
कोबीला बीजप्रक्रियेपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत होतो. लागवडीला जर्मिनेटरच्या द्रावणात रोपे बुडवून लावत असे, त्यामुळे मर होत नसे. पुढे कोबी वाढीसाठी व रोगकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या करत असे. ३ - ४ फवारण्यात पिक निघत होते. तेव्हा किडरोग आताच्या एवढे नसायचे. गरजेपुरतेच किटकनाशक फावरत असे. कोबीचे एकरी २५ ते ३० टन उत्पादन घ्यायचो. टोमॅटोलादेखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा याच पद्धतीने वापर करीत असे. १।। ते २ एकर टोमॅटो दरवर्षी असायची. वैशाली व इंटम जातीच्या टोमॅटोचे २० -२५ टनापर्यंत उत्पादन मिळत असे. तेव्हा टोमॅटोला २ ते ५ रू. / किलो भाव मिळायचे.
काकडी अर्धा ते १ एकर दरवर्षी सप्टेंबर - ऑक्टोबरला लावायचो. ती थंडीत चालू व्हायची. ३० - ४५ दिवस दिवस चालायची. नंतर पुन्हा उन्हाळी फेब्रुवारीतील काकडी करायचो. काकडीचे एकरी १० टनापर्यंत उत्पादन मिळत असे. याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ - ३ फवारण्या करायचो. याला डांब रोवून तारा ओढून त्यावर वेल चढवत असे. दोडका - कारल्याला आडवे माळा पद्धत करायचो.
या शेतीच्या उत्पन्नातूनच आता पेट्रोल पंप टाकला आहे. मला २ मुले असून १ मुलगा डॉक्टर आहे व दुसरा पेट्रोल पंप पाहतो. शेतीदेखील आता मुलेच पाहतात.
२००१ सालानंतर पाऊसमान कमी झाल्याने विहीरीचे पाणी कमी झाले. तसेच शेजारी विहीरींची संख्या वाढली. त्यामुळे पाणी फारच कमी झाले. त्यावर खर्चिक व्यापारी पिके घेणे धोक्याचे ठरू लागले. कारण कधी - कधी ऐन उत्पादन चालू होण्याच्यावेळी पाणी कमी पडल्यावर हातचे पीक जात असे. त्यामुळे पारंपारिक हंगामानुसार ज्वारी, हरभरा, गहू, भुईमूग अशी पिके घेवू लागलो.
'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वी
आता पावणे दोन एकर 'सिद्धीविनायक' शेवगा लावला आहे. यातील १। एकर ऑक्टोबर २०१३ ची लागवड आहे. आणि अर्धा एकर नोव्हेंबर २०१४ ला लावलेला आहे. पहिला बहार चांगला मिळाला. २।। लाख रू. १। एकरात झाले. माल ५०० ते १ हजार किलो दर आठवड्यास निघत होता. सातारा, फलटण, मुंबईला विक्री करीत असे. याला १५ रू. पासून ६० रू. पर्यंत भाव मिळाले आहेत. मार्च २०१४ ला शेवगा चालू झाल्यावर सुरूवातीला भाव कमी होते. नंतर जून - जुलैमध्ये ६० रू. /किलोपर्यंत भाव मिळाले. शेंग १।। ते २ फूट लांबीची भोतात पॅकिंग करून विक्री करीत असे. सातारा मार्केटला ३० किलो, फलटणला ५ किलोचे बंडल आणि मुंबईला ५० ते ६० किलोचे भोत असे पॅकिंग करून विक्रीस पाठवत असे.
सध्या वातावरणात बरेच बदल झाल्याने मध्येच थंडी, धुके, धवकाळी पाऊस होत असल्याने शेवग्याची पानगळ होत आहे. फुले कमी लागतात व तिही गळतात. काहींना थोड्या शेंगा लागतात मात्र त्या १ ते १।। इंचाच्या असतानाच गळतात. यावर कोणत्याही औषधाचा परिणाम न झाल्याने मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची खात्री व अनुभव असल्याने याच औषधांनी वरील समस्या नाहीशा होतील व पुन्हा खात्रीशीर उत्पादन मिळेल याकरिता आज (११ मार्च २०१५ ) सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो अव शेवग्याकरिता आता जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५ - ५ लि. घेवून जात आहे. याच्या २ - ३ फवारण्या करून शेंगाचे सेटिंग झाल्यावर पुढे शेंगा पोसण्यासाठी राईपनर व न्युट्राटोन घेणार आहे.