डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भगव्याचा लेट आंबीया बहाराचा प्रयोग ?

श्री. बापू लहू भगत,
मु.पो. राजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे.
मो.नं. ७७०९५०२७०१



मी मध्यम प्रतिच्या १।। एकर जमिनीत भगवा डाळींबाची १४' x १२' वर लागवड केली आहे. या बागेचा चालूवर्षी पहिला बहार धरण्यासाठी बागेस मागील १।। महिन्यापासून ताण देऊन २ - २ पाटी शेणखत (विकतचे) देऊन १० मार्च २०१६ ला पहिले पाणी दिले. छाटणीसाठी सांगोल्याहून लोक आले होते. ते १५ रू./ झाड प्रमाणे छाटणी करतात. आमचे भाऊबंध श्री. सदाशिव आत्माराम भगत हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ४ - ५ वर्षापासून काकडी, शेवगा, मेथी, डाळींब या पिकांना वापरून 'ए - १' क्वॉलिटीचे उत्पादन घेतात. म्हणून आज (१४ मार्च २०१६) त्यांच्यासोबत डॉ. बावसकर सरांचे मार्गदर्शन व तंत्रज्ञान घेण्यास आलो आहे.

सरांनी सांगितले, आता दुसरे पाणी सोडण्यापुर्वी १।। एकर डाळींबाला जर्मिनेटर १.५ लि., प्रिझम १.५ लि. आणि कॉपर ऑक्सीक्लोराईड १.५ किलो + १५० लि. पाणी असे द्रावण तयार करून ठिबकद्वारे ड्रेंचिंग करणे. खते भरताना जरी कल्पतरू वापरले नसेल तरी ड्रेंचिंग केल्यानंतर प्रत्येक झाडांना ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्या. जमीन मध्यम असल्याने व कडक उन्हाळा असल्याने ठिबकने ३ ऱ्या दिवशी (३५ ते ४० लि.पाणी/झाड) पाणी देणे, कारण आता तापमान वाढत आहे. छाटणी केल्यामुळे सघ्या झाडावर पाने नाहीत. मायक्रो क्लायमेट उष्ण आहे. त्यामुळे ३ च्या दिवशी पाणी दिले गेलेच पाहिजे.

नंतर जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + प्रिझम १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी करा. म्हणजे फुट चांगली फुटेल, नंतर पाण्यातून फवारणी करा. म्हणजे फुट चांगली फुटेल, नंतर चौकी तयार होईल व त्यानंतर मादी कळी मोठ्या प्रमाणात लागेल. त्यानंतर कळी गळ होऊ नये म्हणून थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + न्युट्राटोन ७५० मिली + प्रोटेक्टंट १ किलो + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + २०० लि. पाणी अशी दुसरी फवारणी करा. म्हणजे गळ न होता प्रत्येक झाडावर ६० - १०० फळे धरता येतील. हा पहिलाच बहार असल्याने झाडावर फळे मर्यादित घेऊन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फळे जंबो साईजची मोठी मिळतील. फळांचे सेटिंग झाल्यावर तिसरी फवारणी थ्राईवर १.५ लि. + क्रॉपशाईनर १.५ लि. + प्रोटेक्टंट १.५ किलो + न्युट्राटोन १.५ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी घेणे. खोडाला मोरचूद १ किलो, चुना १ किलो, गेरू १ किलो आणि प्रोटेक्टंट १ किलो २० लि. पाण्यात रात्रभर भिजवून मध्ये काठीने २ - ३ वेळा ढवळून तयार होणारी पेस्ट तागाच्या कुंच्याने जमिनी पासून ३ ते ४ फुटापर्यंत लावणे. म्हणजे सुरसा आळी, वाळवी, लाल मुंग्यांचा प्रादुर्भाव होणार नाही. तसेच डाळींबाच्या झाडाभोवती सापळापीक झेंडू लावणे. म्हणजे फुलांचे उत्पादन मिळेल आणि सुत्रकृमीचा प्रादुर्भावही आटोक्यात राहील. तसेच पाणी असेल तर मधल्या पट्ट्यात १.५ ते २ महिन्यात येणारी कोथिंबीर, मेथी, पालक, चवळई अशी पालेभाजी पिके घेणे. म्हणजे या कमी कालवधीच्या पिकांपासून उन्हाळ्यातील तेजीचे भाव सापडून डाळींबाचा उत्पादन खर्च निघेल.