प्रतिकूल परिस्थितीत शिस्तबद्ध नियोजनामुळे दुसऱ्यापेक्षा सोयाबीन व कापसाचे दर्जेदार व अधिक उत्पादन
श्री. आशिष नंदकिशोर निहाटकर,
मु.पो. धानोरा म्हाली, ता. चांदूर रेल्वे, जि.
अमरावती - ४४४९०४
मो. नं. ९५०३८३२६६०, ९४०४९५२९९०
यावर्षी आम्ही कपाशी लागवड १८ जून २०१५ रोजी २' x ५' अंतरावर केली. त्यामध्ये ६ तासी
तूर सुद्धा पेरली. आमची जमीन भारी काळी असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता व
सोबतच पाणी निचरा होण्याची देखील क्षमता चांगली आहे. लागवडीवेळी आम्ही कपाशीला व तुरीला
खत देत नाही. आम्ही बी उगवल्यानंतरच साधारण ८ ते १० दिवसांनी त्याला खताचा पहिला डोस
१०:२६:२६ एकरी १ बॅग असा देतो. यावर्षी आम्ही भजभुजे साहेबांच्या सांगण्यानुसार सुरुवातीला
लागवडीच्या वेळी एकरी एक बॅग कल्पतरू हे सेंद्रिय खत दिले. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनानुसार
१५ दिवसांनी १०:२६:२६ हे रासायनिक खत एकरी ३० किलोच वापरले. रासायनिक खताचा अधिक वापर
केला तर जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे रासायनिक खताचा
वापर कमी करण्याचे ठरविले.
डॉ. बावसकर सरांनी लिहिलेला कपाशीवरील विशेष पुस्तक वाचले. त्यामध्ये कपाशीबद्दल विस्तृतमध्ये
माहिती होती. त्या पुस्तकानुसार मी कपाशी पीक घ्यायचे ठरविले. यावर्षी
गेल्या वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी सांगितले असल्यामुळे आम्ही संभ्रमात
होतो. तरी ५ जुलै २०१५ रोजी हंगामातल्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. सुमारे ३ - ४
तास चांगला पाऊस झाला.
त्या अगोदर मी २६ जून २०१५ रोजी सोयाबीन पिकांनी लागवड १।। एकरमध्ये केली होती. लागवडीसाठी मी १ लिटर पाण्यामध्ये ३० मिली जर्मिनेटर आणि १५ ते २० ग्रॅम प्रोटेक्टंट - पी पावडर घेऊन बीजप्रक्रिया केली. सुरूवातीला तुषार सिंचनाने पाणी दिले. बीजप्रक्रियेचा असा फायदा जाणवला की, उगवण ९५% ते ९८% झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन चांगले हाती लागले. २ जुलैला आलेल्या पावसामुळे तिन्ही पिकांच्या लागवडी यशस्वी रित्या पार पडल्या.
आम्ही शेतात दरवर्षी घरचे उपलब्ध असलेले साधारणत: एक वर्षे कुजलेले शेणखत एकरी ३ ते ४ ट्रॉली टाकतो. त्यानंतर लागवडीच्या १५ दिवसांनी कपाशीला पहिला फवारा जर्मिनेटर, प्रिझम, न्युट्राटोन, कॉटन थ्राईवरचा केला असता कॉटन थ्राईवरच्या वापरामुळे लाल्या, ताक्या, करपा, बोकड्या, केवडा इत्यादी रोग आले नाही. त्यामुळे मी कॉटन थ्राईवरची १५ ते २५ दिवसांनी नेहमी फवारणी केली. त्यामुळे आतापर्यंत म्हणजे ११/१/२०१६ पर्यंत मला लाल्या रोगाचे एकही लक्षण आढळून आले नाही. नाहीतर लाल्या आमच्या इकडे सुरुवातीला जरी नाही आला तरी दिवाळीनंतर पहिल्या कापूस वेचणी नंतर हमखास येतो. तो यावर्षी अजीबाता दिसला नाही.
सोबत सोयाबीनवर आम्ही पहिल्या फवारणीला जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवर प्रत्येकी ३ मिली/ लिटर पाण्याला वापरले. कपाशीवर मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी ह्या किडी प्रमुख प्रादुर्भाव करतात. त्याकरिता कपाशीवर १४ आणि १५ जुलै अमावस्या असल्याकारणामुळे स्प्लेंडर हे किटकनाशक २०० लिटर पाण्याला ३०० मिली टाकून फवारले. त्यानंतर २० ते २५ दिवस कोणत्याही प्रकारचे किटक तिथे आढळून आले नाही, हे विशेष. नंतर थोड्या प्रमाणात पांढरी माशी दिसू लागली होती आणि ३ दिवसांनी पुन्हा दुसरी अमावस्या होती. त्याकरिता आम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये जर्मिनेटर, प्रिझम, कॉटन थ्राईवर, न्युट्राटोन प्रत्येकी ४ मिली सोबत स्प्लेंडर २ मिली/लिटर पाण्यास वापरले. त्यानंतर ऑगस्ट (२०१५) महिन्याचे कृषी विज्ञान मासिक भजभुजे साहेबांकडून घेतले. त्यामध्ये अतिशय उपयुक्त माहिती वाचण्यास मिळाली. कपाशी पिकांवरील अळीच्या नियंत्रणाची माहिती दिली होती. त्यामध्ये अळी नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५% ची संपूर्ण माहिती होती.
त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार घरीच निंबोळी अर्क बनविला व त्याची फवारणी केली. त्यामुळे सुद्धा अळी निमंत्रीत राहते हे लक्षात आले. त्या सोबतच दशपर्णी अर्काबद्दल साहेबांनी माहिती दिली. त्यानुसार आम्ही तो सुद्धा तयार केला आणि त्याची फवारणी केली. आम्ही अळी आणि किटकनाशक नियंत्रणासाठी स्प्लेंडर, निंबोळी अर्क आणि दर्शपणी अर्क यांचा वापर केला. त्यांच्या वापरामुळे आमच्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारची अळी किंवा किटक दिसून आले नाही. याआधी मी कधीच ही औषधे वापरली नव्हती. मी यापुर्वी महागडी औषधे फवारत होतो आणि विनाकारण खर्च करीत होतो, माझ्या लक्षात आले की इतर किटकनाशकांपेक्षा स्प्लेंडर हे औषध उपयुक्त असून परवडते. १ लिटर स्प्लेंडरमध्ये १५ लि. पाण्याचे ३३ ते ३४ पंप तयार होतात. त्यानंतर मी माझ्या सर्व शेतकरी मित्रांना डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करण्यास सांगितले. तिसऱ्या फवारणीला मी प्रिझम, कॉटन थ्राईवर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लिटर आणि हार्मोनी ३०० मिली २०० लिटर पाण्याला असा वापर केला. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे बुरशीचा त्रास आमच्या जमिनीत या वर्षी थोड्या प्रमाणात आढळून आला. पाऊस कमी झाल्यामुळे यावर्षी डवऱ्याचे फेर पण चांगल्या प्रकारे देता आले. त्यामुळे यावर्षी तणांचा त्रास झाला नाही. त्यामुळे शेतीच्या नियोजनाला यावर्षी जास्त त्रास झाला नाही. आमच्या भागात आवश्यकतेनुसार चांगला पाऊस पडला.
सोयाबीनला मात्र पाणी कमी पडले. पोळ्याला दाणे भरायच्या वेळेस सोयाबीनला तिसऱ्या फवारणीमध्ये प्रिझम, थ्राईवर, न्युट्राटोन, राईपनरचा वापर केला आणि शेवटी पाऊस न आल्यामुळे आम्ही पात पाणी दिले आणि सोबतच चौथी फवारणी म्हणून न्युट्राटोन आणि राईपनर वापरले. याआधी आम्हाला २ एकरात सरासरी १० ते १२ पोती व्हायची. यावर्षी मला १।। एकरमध्ये १० पोते सोयाबिन झाले. सरसरी ६ ते ७ पोते एकरी उत्पन्न झाले. इतरांच्या मानाने ते समाधानकराकच आहे. इतर सर्वत्र माझ्या भागात सरासरी २ ते ३ पोते उत्पन्न झाले. त्यामुळे माझे उत्पादन त्या मानाने फार चांगले झाले आणि मी सोयाबीन ३८५० या भावाने धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकले. यापासून सुमारे ३८,०००/- रू. मला उत्पन्न झाले. त्याकरिता मला सुमारे १७०००/- रू. खर्च आला तर निव्वळ २१०००/-रू नफा दीड एकरात मिळाला. तो येथील परिस्थितीनुसार माझ्यासाठी समाधानकारकच आहे.
प्रतिकूल परिस्थिती तरीही हंगामी व फडदड कापसाचा प्रयोग
कपाशीवर ऑक्टोबर महिन्यात प्रिझम, राईपनर, न्युट्राटोन, कॉटन थ्राईवर प्रत्येकी १ लि. हार्मोनी ४०० मिली, स्प्लेंडर ४०० मिली २०० लि. पाण्याला वापरले. यावेळेस कपाशीला सरासरी ५० ते ६० बोंडे आणि २० ते ३० फुल तयार होती. तेव्हा हलकीशी फुलगळ सुरू झाली. त्याकरिता आम्ही प्रोटेक्टंट-पी, थ्राईवर, क्रॉपशाईनरचा एक फवारा दिला. त्यामुळे फुलगळ थांबली. नोव्हेंबर, महिन्यापासून माझा कापूस निघायला सुरुवात झाली. पहिल्या वेच्याला मला दोन एकरात ६ क्विंटल कापूस झाला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आम्ही फवारणी करीता प्रिझम, न्युट्राटोन, राईपनर, कॉटन थ्राईवर प्रत्येकी १ लि. आणि हार्मोनी ५०० मिली, स्प्लेंडर ४०० मिली प्रति २०० लि. पाण्याला अशी फवारणी केली. मला जानेवारी महिन्याच्या पहिल्या ह्प्त्यापर्यंत २६ क्विंटल कापूस दोन एकरात झाला असून त्यातला १५ क्विंटल कापूस मी ४६०० रू./क्विंटल भावाने आर्वी येथील जमीनमध्ये थेट विकला. म्हणजे मला सरसरी एकरी १३ क्विंटल कापूस झाला. आमच्या भागात सरासरी १० क्विंटल इतकाच कापूस झाला आहे. तसेच जवळपास ९९% लोकांची कपाशी फरदड घेण्यालायक नसताना त्यांच्या तुलनेत माझी कपाशी हिरवीगार असून फरदड करीता आम्ही एकरी २५ किलो १०:२६:२६ आणि युरिया एक बॅग टाकली. सोबत कॉटन थ्राईवर, प्रिझम, राईपनर यांची प्रति २०० लिटर पाण्याला प्रत्येकी १ लिटर अशी फवारणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात केली असून आता कपाशीला सरासरी ८ ते १० बोंडे असून १५ ते २० नवीन फुले आलेली आहेत आणि नवती अजून सुरू आहे. आमच्या प्राथमिक अंदाजानुसार मला आणखी ८ क्विंटल कापूस होण्याची शक्यता आहे.
कपाशीतील आंतरपिकातील २ एकर तुरीचे १५ पोते उत्पादन
त्याचबरोबर मला दोन एकर कपाशीतील आंतरपीक ६ तासी तुरीला १५ पोते झाले आहे, म्हणजे सरासरी ७।। पोती एकरी झाली आहेत. हे सुद्धा आमच्या भागात जास्त उत्पादन आहे. नाहीतर इकडे सरासरी ५ ते ६ पोती इतकेच उत्पादन झाले आहे. या सर्व कारणामुळे मी वापरलेल्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा मला चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे या वर्षी मी फार संतुष्ट असून डॉ.बावसकर साहेबांचे मी फार आभार मानतो. यापुढे मी माझी संपूर्ण शेती डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने करण्याचे ठरविले आहे.