डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी व कृषी विज्ञान शेतीज्ञान, शेती करण्याची नवी दिशा व उर्जा देते!

श्री. लक्ष्मण रघुनाथ जाधव,
मु.पो. सदाशिवनगर, ता. माळशिरस, जि . सोलापूर.
मो. ९८९००८४१६



आम्ही नवीनच १५० x १०० चे शेडनेट केले आहे. ५०% सावली असणारे हिरवे शेडनेट आहे. जमीन २.३% करल चोपण आहे. यामध्ये आम्ही हॉलंडची शिनेफीट आर झेड काकडी अर्ध्या क्षेत्रात डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने करणार आहे. या काकडीचे बी महाग असते. ८४०० रु. ला १००० बियांचे पाकिट मिळते. २९ दिवसात पहिला तोडा सुरू होतो. ४ महिने ही काकडी चालते. एकरी ७० टन उत्पादन मिळते.

या पिकासोबत बाकी अर्ध्या शेडनेटमध्ये डॉ.बावसकर सरांच्या मार्गदर्शनानुसार रंगीत लाल ढोबळी लावणार आहे. सरांनी सांगितले रंगीत ढोबळी शेडनेटमध्ये चांगली येते. तसेस रंगीत ढोबळीला बाजार भावही चांगले असतात. विशेषतः पिवळ्या व जांभळ्या ढोबळीपेक्षा लाल ढोबळीला भाव जाडा मिळतात. ४० रु. पासून ८० ते १२० रोउ. किलोपर्यंत तिला भाव मिळतो. तेव्हा सरांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा अवलंब करून लाल ढोबळी देखील लावणार आहे.

आमच्या भागात गवारीचे पीक बारामाही असते. गवारीला एप्रिल, मे, जून हे तिन महिने सोडले तर इतर ९ महिने चांगले तेजीचे भाव असतात. एप्रिल, मे, जुने हे शाळा, कॉलेजेसचे सुट्टीचे दिवस असल्याने शहरी भागात खाणावळीचे डबे बंद असतात. तसेच शहरातील लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी गेलेले असतात. त्यामुळे शहरांमध्ये गवारीची मागणी नेहमीपेक्षा कमी होऊन भाव कमी झालेले असतात. गवार हे जेवणाच्या डब्यासाठी उत्तम सुकी भाजी असते. त्यामुळे इतरवेळी शहरी भागात हमी भाव मिळतात.

एका बाईला १२५ रु. हजेरी आहे, ती दिवसभरात १० ते १५ किलो गवार तोडते. म्हणजे १० रु. तर १ किलो गवार तोडणीवरच खर्च येतो. गवारीला सरासरी ४० ते ६० रु. भाव मिळतो. आमच्या भागात अलिकडे डाळींबानंतर द्राक्ष, मोठा पेरू, सिताफळ, अप्पलबोर ह्या फळबागा वाढू लागल्या आहेत.

डाळींबासाठी जर्मिनेटरचा वापर

आमही ७ - ८ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे जर्मिनेटर बिजप्रक्रिया व ड्रेचिंग (आळवणी) साठी वापरतो. जर्मिनेटरमुळे हंगाम कोणताही असो, बियांची उगवण मात्र हमखास होते, तसेच पिकाची वाढ खुंटली असले, शेंडा चालत नसेल तर जर्मिनेटरचे ड्रेंचिंग (आळवणी) केले असता पांढऱ्या मुळीचा जारवा वाढतो. त्यामुळे पिकाची खुंटलेली वाढ जोमाने होते. शेंडावाढ, फुट जोमाने चालते. आमच्याकडे १।। एकर भगवा डाळींब हलक्या रानात १५ x १५ वर लागवड केलेले आहे. त्याला ड्रेंचिंग साठी जर्मिनेटर वापरात असतो. या अनुभवावरून आता शेडनेटमधील हॉलंड काकडी व लाल कलरची ढोबळी या पिकांना सरांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणार आहे.