डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने प्रतिकूलतेतून अनुकूलता देऊन ८ एकर कपाशीपासून १०० क्विंटल दर्जेदार कापूस !

श्री. सुधीरराव उत्तमराव बोमखडे, मु.पो. वाल्मिकपुर, ता. अचलपूर, जि. अमरावती.
मो. ७२४९४४०९७३


माझ्याकडे वडीलोपार्जीत १५ एकर जमीन आहे. मी 'कृषी विज्ञान', मासिकाचा वर्गणीदार आहे.

त्यातील शेतकऱ्यांच्या मुलाखती वाचून मी यावर्षी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे ठरवले. तेव्हा मी आमच्या भागातील विक्रेते चरणदास वटाणे (दत्तकृपा इरिगेशन, परतवाडा) यांची भेट घेतली आणि तेव्हा पासून मी सोयाबीन कापूस, तूर, संत्रा या पिकावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधी दत्तकृपा इरिगेशन यांच्याकडून घेतली. त्यावेळेस त्यांनी अचलपूर भागात डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी आहेत असे सांगून त्यांचा मोबाईल नंबर (९६६५२९०४९५) दिला. त्यावेळेस आमच्या भागातील कंपनी प्रतिनिधी यांना संपर्क केला असता त्यांनी मला माझ्या शेतावर नेऊन कापूस पिकाबद्दल मार्गदर्शन केले. त्यावेळेस माझी पेरणी झाली होती. त्यामुळे मी सुरुवातीला कल्पतरू खत देऊ शकलो नाही. त्यावेळेस मी एकरी १०:२६:२६ एकरी १ बॅग याप्रमाणे खत टाकले व दुसऱ्या खताचे डोसच्या वेळेस मात्र कल्पतरू ५० किलो + ५० किलो पोटॅश खत टाकले. पहिली फवारणी उगवणीनंतर १५ दिवसांनी केली. त्यामध्ये जर्मिनेटर २५० मिली + प्रिझम २५० मिली + कॉटन थ्राईवर २५० मिली + मोनोक्रोटोफॉस २५० मिली प्रमाणे फवारणी केली आहे. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ झाली. पांढऱ्या मुळ्याची रसरशीत चांगली वाढ होती. रोगप्रतिकार शक्ती वाढून झाडे हिरवीगार दिसत होती. सततच्या पावसात देखील झाडे हिरवीगार, सशक्त निरोगी होती. ४० दिवसांनी मी कल्पतरू खत वापरल्यामुळे जास्त पाऊस पडून सुद्धा पिकाची मुळी चोकोप झाली नाही. तसेच पांढऱ्या मुळ्या वाढतच होत्या. कल्पतरू खतामुळे जमिनीचा पोत सुधारला होता. कल्पतरू खतासोबत १०:२६:२६ या रासायनिक खताचे फक्त १ पोते वापरले. त्यामुळे नेहमीच्या रासायनिक खतामध्ये बचत झाली. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे एकूण ३ फवारण्या केल्या होत्या तर झाडांची मर न होता. झपाट्याने वाढ झाली होती. शिवाय लाल्या, दहिया या रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. फुल व बोंडगळ कमी झाली. फळधारणा चांगली झाली. ३ वेचण्यातच पीक मोकळे झाले. तिन्ही वेचण्याचा कापूस पहिल्या वेचणीसारखा पांढरा शुभ्र पुर्ण उमललेला निघत होता. त्यामुळे आमच्याकडे कापूस वेचणाऱ्या बायका म्हणत, साहेब तुम्ही काय फवारले आहे. कारण कापूस वेचताना बोंडातून सहज, अलगद कापूस निघत होता. अशा प्रकारे मला ८ एकरातून १०० क्विंटल कापूस झाला. मला आपल्या टेक्नॉलॉजीने फरदड घ्यायची होती, मात्र यावर्षी शेंदरी बोंड आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मी फरदड न घेता कापूस काढून भुईमूग पेरला आहे. त्याला आपलीच फवारणी चालू आहे.