डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने कमी खर्चात दर्जेदार बटाट्याचे उत्पादन !

श्री. शंकर आप्पाराव माने (शिक्षक),
मु.पो. बारुळ, ता. कंधार, जि. नांदेड.
मो. ९५६१०३९६९२


मी शिक्षक असून माझी नोकरी पालघर जिल्हात आहे. वडील शेतीत करतात. मी सुट्टीवर आल्यावर नवीन - नवीन माहितीच्या आधारे वडीलांना मार्गदर्शन करून मी देखील शेतीत मदत करतो. मी एके दिवशी इंटरनेटवर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची माहिती वाचत होतो. ती माहिती मला खुप चांगली वाटली आणि माझ्याही मनात डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी विषयी आवड निर्माण झाली व मी कंपनीशी संपर्क केला. तेव्हा तेथून मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी श्री. मोतीराम पवार यांचा नंबर (८९७५०६६०६७) मिळाला. मी लगेच त्यांना फोन केला व त्याच्यांशी चर्चा केली. त्यांनी मला कंधार - लोहा प्रतिनिधी श्री. गौतम जोंधळे यांचा नंबर दिला. मी त्यांना फोन करून बोलून घेतले व आलू (बटाटा) या पिकाविषयी माहिती घेतली.

मी पहिल्यांदा जमीन नांगरून भुसभुशीत केली व नंतर शेणखत १० ट्रॅक्टर व कल्पतरू ६ पोते आणि पोटॅश ५० किलो असे बेसल डोसमध्ये घेतले. १८ नोव्हेंबर २०१६ रोजी आलूची (बटाट्याची) लागवड केली. लागवड करत असताना जर्मिनेटरची बेणे प्रक्रिया करून घेतली व लागवड केली. मग निघणारा कोंब एकदम टवटवीत व जोमाने निघाला. नंतर १० दिवसांनी पहिली फवारणी जर्मिनेटर + थ्राईवर + प्रिझम + प्रोटेक्टंट पी + क्रॉपशाईनर यांची फवारणी केली. नंतर माझा प्लॉट एकदम टवटवीत व चांगला दिसत होता. नंतर प्रत्येक १० दिवसांनी फवारणी करत गेलो. एकूण मी पंचामृताच्या ५ फवारण्या केल्या. प्रत्येक फवारणीला मला चांगली आलुची वाढ होताना दिसत होती व कोणत्याच रोगाला पीक बळी पडले नाही. मग दुसरा डोस कल्पतरू १०० किलोचा दिला. ते खत टाकल्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन सुपिकता वाढल्याने बटाटे चांगले पोसले. आकार व वजनात वाढ झाली. मग आलू काढण्यासाठी आल्यावर १० दिवसांनी अगोदर पाणी पाळी बंद केली व काढणी केली. मला ७ क्विंटल बेण्यापासून १३ ते १४ टन आलू उत्पादन मिळाले. कमी खर्चात चांगले उत्पादन मिळाल्याने आम्ही खुष आहोत.