कमी पाण्यावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने उसाची लागवड व वाढ उत्तम
श्री. आंदन भिमराव साळेकर,
मु.पो. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड, जि. यवतमाळ.
मो.
९४०४५२५९०७
माझ्याकडे एकूण २२ एकर जमीन आहे.
मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा पहिल्यांदा वापर २०१४ मध्ये कापूस पिकावर केला होता.
त्यावेळेस मी तुळजा भवानी कृषी केंद्र, सारखनी ता. किनवट येथून
औषधे आणली होती. तेव्हापासून मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी चा वापर करीत आहे. आता आमच्या
भागात औषधे मिळत आहेत व कंपनी प्रतिनिधी वेळोवेळी मदत करत आहेत. मी ऊस या पिकासाठी
डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे ठरवले.
२ एकरात १५ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यम प्रतिच्या जमिनीत ४ x १ फुटावर ३१०२ या जातीच्या उसाची लागवड केली आहे. सुरुवातीला बेणे प्रक्रियेसाठी जर्मिनेटर १ लि. + क्विनॉलफॉस १ लि. + २०० लि. पाणी यामध्ये १० मिनिटे बेणे भिजत ठेवले आणि त्यानंतर लागवड केली. त्यामुळे उगवण लवकर व एकसारखी १००% झाली आहे.
तसेच ऊस निघाल्यानंतर मर किंवा काजळी लागू नये म्हणून एकरी १ लि. जर्मिनेटर याप्रमाणे मुळाला सोडले. त्यामुळे पांढऱ्या मुळाची वाढ होवून पीक निरोगी झाले. पिकाची वाढ एकसारखी झाली आहे. तसेच कल्पतरू एकरी २ बॅग दिल्या आहेत. त्याने शेणखताची कमतरता भरून निघाली आहे. कल्पतरू खतामुळे जमीन भुसभुशीत होवून जमिनीत गारवा, वाफसा अवस्था जास्त काळ राहत असल्याने जारवा (पांढऱ्या मुळ्यांची संख्या) वाढून रसरशीत मुळ्या असल्याने शेंडा वाढ जोमाने होत आहे. वाफसा अवस्था राहत असल्याने पिकाला सारखे (लवकर) पाणी द्यावे लागत नाही. त्यामुळे कमी पाण्यावर पीक चांगले वाढत आहे.