प्रतिकूल परिस्थितीत २ एकर डाळींबावरील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा खर्च १० हजार नफा १ लाख २५ हजार
श्री. झिणे एकनाथ बाळासाहेब,
मु.पो. वडगाव गुप्ता, ता.जि. अहमदनगर
माझ्याकडे आठ एकर शेती आहे. त्यामध्ये ३ एकर डाळींब आहे. २ एकर संत्रा आहे. बाकी शेतात
फुलझाडे व कांदा पिकाची लागवड करतो. डाळींब पीक मी १५ - २० वर्षापासून करत आलो आहे.
परंतु यावर्षी उन्हाचे सर्वात जास्त प्रमाण असल्यामुळे डाळींबाची फुगवण, कलर येणे याचे प्रमाण
फारच कमी होते. तेव्हा अहमदनगर मार्केटमध्ये
रोहन सिडसमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या प्रतिनिधींची भेट झाली. त्यांना डाळींबाची
वरील समस्या सांगितल्यावर ते आणि मी प्रत्यक्ष प्लॉट पाहणीसाठी गेलो. त्यांनी जागेची
पाहणी करून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे थ्राईवर, क्रोपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी
१ लि . आणि प्रोटेक्टंट १ किलो २०० लि. पाण्यातून फवारण्यास सांगितले. त्यानंतर ही
औषधे रोहन सिडसमधून नेऊन याची फवारणी केली असता १५ दिवसातच फळांची फुगवण झाली. फळांवर
चकाकी व कलर आला. त्यांनी आम्हाला पुन्हा १५ दिवसांनी सप्तामृत फवारण्यास सांगितले,
त्याप्रमाणे फवारणी केली तर फळांचे वजन ४०० ग्रॅमपासून ५५० ग्रॅमपर्यंत झाले होते.
शिवाय फळांना आकर्षक चमक व गडद रंग आला. आम्ही हा माल पुणे मार्केटमध्ये ७० ते ८०
रू./किलो अशा १ नंबर भावाने विकला. राहिलेला शेवटचा माल अहमदनगर मार्केटला विकला.
तो ४० रू. किलो भावाने गेला, एकरी साधारण ६ टन उत्पादन मिळाले. हे उत्पादन घेण्यासाठी
एकरी ५० ते ५५ हजार रू. खर्च आला. त्यापैकी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवरील खर्च फक्त १०
हजार रू. आला होता. एकूण सर्व खर्च वजा जाता १ लाख २५ हजार रू. निव्वळ नफा मिळाला.
या अनुभवातून पुढील बहराच्यावेळी पुर्णपणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे. या तंत्रज्ञानाने
कमी खर्चात अधिक फायदा मिळतो. हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे.