टिश्युकल्चर डाळींबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फायदेशीरच !

श्री. सुभाष नारायण भुजबळ,
मु.पो. खानवडी, ता. पुरंदर, जि. पुणे,
मोबा. ९८९०९५४५७४


जैन टिश्युकल्चर भगवा डाळींबाची १ हजार रोपे ३२ रू. प्रमाणे पोहोच घेऊन त्याची २।। एकर मुरमाड जमिनीत १२ x १० फुटावर फेब्रुवारी २०१३ मध्ये लागवड केली. बागेला ठिबक केले आहे. जमीन अतिशय मुरमाड, हलक्या प्रतीची आहे. अशा जमिनीतील या भगव्या डाळींबाला सुरूवातीपासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्यास चालू केले. प्रथम जर्मिनेटर चे ड्रेंचिंग करून झाडांच्या वाढीसाठी व खोड, फांद्या सशक्त होण्यासाठी, झाडे निरोगी, तेल्यामुक्त राहण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम, हार्मोनी, प्रोटेक्टंटच्या फवारण्या दर महिन्याला घेत होतो. याला कल्पतरू सेंद्रिय खताचाही वापर केला होता. त्यामुळे बाग अवघ्या १५ महिन्यात बहार धरण्यायोग्य तयार झाली. खोड मजबुत होऊन ४ - ४ फांद्या प्रत्येक झाडावर आहेत.

या बागेला मार्च - एप्रिल २०१४ दरम्यान ताण देऊन निंबोळी पेंड २५० ग्रॅम आणि १०:२६:२६ रासायनिक खत २५० ग्रॅम असा एकूण १ किलोचा डोस दिला आणि बागेस पाणी सोडले. पहिले पाणी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी दुसरे पाणी देताना जर्मिनेटर एकरी १ लि. चे ठिबकद्वारे ड्रेंचिंग केले. त्यामुळे पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून फूट जोमाने निघण्यास मदत झाली. वरून थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी १ लि. २०० लि. पाण्यातून फवारल्याने सर्व बाग एकसारखी फुटून पाने रुंद तयार झाली. त्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगले होऊन कर्बग्रहण (अन्न तयार) होण्यास मदत झाली. त्यानंतर फुलकळी निघताना पुन्हा थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर आणि प्रोटेक्टंट फवारले. त्यामुळे भरपूर फुलकळी निघाली. फुलकळीने बाग लालभडक दिसत होता. त्यातील काही फुले गळली. तरी प्रत्येक झाडावर ७० - ८० फळांचे सेटिंग झाले आहे. फुलकळी लागल्यापासून आज (४ जुलै २०१४) अखेर लिंबू आकारची फळे तयार होईपर्यंतच्या १ महिन्यात थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट, हार्मोनीच्या २ फवारण्या केल्या असून जर्मिनेटरचे एकदा ड्रेंचिंग असे एकूण ४ फवारण्या व २ वेळा ड्रेंचिंग बहार धरल्यापासून केले आहे.

आता फळांची फुगवण होण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंटसोबत न्युट्राटोन आणि राईपनर फवारणीसाठी तसेच कल्पतरू सेंद्रिय खत १४ बॅगा घेऊन जात आहे.

बागेला जमीन हलकी व सध्या वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने सकाळी पाणी दिले की संध्याकाळपर्यंत पूर्ण सुकून जात आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक झाडास ४ ड्रिपरद्वारे तिसऱ्या दिवशी २ तास पाणी देत आहे. ताशी ८ लि. चा डिस्चार्ज असून एकूण ६४ लि. पाणी/झाडास तिसऱ्या दिवशी मिळत आहे. पुढे फळे पोसण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनरसोबत, न्युट्राटोन, राईपनर चे स्प्रे सरांच्या सल्ल्यानुसार आवश्य घेणार आहे. सरांनी सांगितले "क्रॉपशाईनरने सालीला चमक येते. राईपनर, न्युट्राटोनमुळे फळांची फुगवण अधिक होऊन दाणे एकसारखे भरतात. दाण्यांना कलर येऊन गोडी वाढते. फळांचे वजन व टिकाऊपणा वाढतो. त्यामुळे बाजारपेठेत इतरांच्या मालापेक्षा १० ते २०% भाव हमखास जादा मिळतो.