२० गुंठे दोडका ४० हजार नफा

श्री. विठ्ठल सिताराम आरकस,
मु.पो. म्हसे, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर
मो. ९९२२१६४०३९


मध्यम प्रतीच्या २० गुंठे जमिनीमध्ये डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने दोडक्याची (नागा) लागवड ३' x ३' वर केली. या जमिनीमध्ये अगोदर कांदा केला होता. दोडका बियाला जर्मिनेटरची प्रक्रिया करून लागवड केली. प्रत्येक ठिकाणाचे बी उगवले. नंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वेळापत्रकाप्रमाणे ४ फवारण्या १५ -१५ दिवसांनी केल्या. तेवढ्यावर वेळांची जोमदार वाढ झाली. पाने रुंद, केसाळ लव असलेली तयार झाली. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढली.

७० दिवसांत तोडा सुरू झाला. २ दिवसाआड तोडा करीत होतो. तोडे चालू झाल्यानंतर सप्तामृत ओषधांच्या पुन्हा २ फवारण्या घेतल्या. त्यामुळे वेलींवर मर झाली नाही. शिवाय माल ३ महिने चालला. सर्व माल शिरूरला विकला. जुलैमध्ये लावलेल्या दोडक्याला नोव्हेंबरमधेय शेवटचा तोडा झाला. २० गुंठ्यामध्ये खर्च जाऊन या दोडक्यापासून ४० हजार रू शिल्लक राहिले.