खत - पाणी टंचाईवर मात म्हणजे कल्पतरू व सप्तामृत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी म्हणजे पिकाची संजीवनीच !

श्री. विजय मारुती नहेरकर,
मु.पो. येडगाव, ता. जुन्नर, जि. पुणे
मो. ९८६०८५५३२५


माझे मित्र श्री. रामदास काळे यांचे सल्ल्यानुसार १ एकर अभिनव टोमॅटोसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला. २० एप्रिल २०११ रोजी ४ फुटाच्या सरीवर ३ फुटावर लागवड केली होती. जमीन हलकी - मध्यम प्रतिची आहे. या टोमॅटोला ठिबक केली होती. सुरुवातीस कल्पतरू सेंद्रिय खत आणि निंबोळी पेंडीचा वापर केला. कल्पतरू खतामुळे जमीन भुसभुशीत होऊन पांढऱ्या मुळ्यांची वाढ झाली. फुटवे अधिक प्रमाणात निघाले. जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५० मिलीची १५ लि. पाण्यातून फवारणी केली. त्यामुळे टोमॅटोची पाने टवटवीत राहिली. माझ्या बोअरला उन्हाळ्यात पाणी कमी पडले तरीही कल्पतरू खताच्या वापरामुळे पिकाला कोणताही धोका पोहचला नाही. या टोमॅटोला कोणतेही रासायनिक खत वापरले नाही. माझ्या शेजारच्या शेतकऱ्याने एकरी पन्नास हजार रुपये खर्च केला. तरीही माझा प्लॉट त्याच्यापेक्षा एकदम सरस होता. त्याने मला याविषयी विचारले असता मी त्याला सप्तामृत औषधांची फवारणी आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केला असे सांगितले. त्यानंतर त्याने लगेच नारायणगाव सेंटरला जाऊन तेथून कल्पतरू खत आणि थ्राईवर, क्रॉंपशाईनर,प्रिझम, न्युट्राटोन ही औषधे आणली. कल्पतरू खत जमिनीतून देऊन या औषधांचे फवारणी केली. तर त्यांचाही प्लॉट दुरुस्त होऊन बहरला.