आपल्या घराच्या अवतीभोवती असणाऱ्या मोकळ्या जागेत परसबाग तयार करता येते. परसबागेमुळे
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
आपल्या घराच्या अवतीभोवती असणाऱ्या मोकळ्या जागेत परसबाग तयार करता येते. परसबागेमुळे
घराभोवतीचे हवामान, वातावरण आल्हाददायक, प्रसन्न राहते. घरासाठी जे एकूण पाणी लागते
त्याच्या ८० ते ९०% पाणी सांडपाण्याच्या स्वरूपात वाया जात असते. या वाया जाणाऱ्या सांडपाण्याचा
योग्य वापर परसबागेकरिता होऊ शकतो. घराच्या समोरच्या भागात फुलबाग किंवा शोभिवंत झाडांची
लागवड करावी. काही क्षेत्रावर हिरवळ लावावी. हिरवळीच्या कडेने फुलझाडे, शोभिवंत पानांची
झाडे, रॉकरी असे छोटे उद्यान देखावे असावेत. देवपूजेसाठी, वेणी, गजरा तयार करण्यासाठी
मोगरा, जाई - जुई, जास्वंद, अॅस्टर, झेंडू, अबोली इ. फुलझाडे आपल्या बागेत असावीत.
घराच्या भोवती दोन ते तीन फूट उंचीचे कुंपण करावे.
परसबागेचे नियोजन : घराच्या अवतीभोवती असणाऱ्या क्षेत्रामध्ये दगडधोंडे, झाडे - झुडपे काढून त्या जागेचे सपाटीकरण करावे. खडकाळ, मुरमाड जमीन असल्यास नदीकाठची गाळाची सुपीक माती आणून एक ते दीड फुटाचा थर दिल्यास झाडांची चांगली वाढ होते. सदर जागेचा उतारा एका कोपऱ्यामध्ये काढावा, जेणेकरून अतिरिक्त पाण्याचा निचरा उत्तम प्रकारे होऊ शकतो. चांगले कुजलेले शेणखत या मातीमध्ये मिसळावे. निंबोळी, पेंड गांडूळ खत याचाही वापर करावा.
परसबागेची आखणी : कंपाउंडच्याकडेने उंच वाढणारी झाडे म्हणजेच नारळ, सुपारी, हादगा, शेवगा आंबा, कढीपत्ता, पेरू, चिकू, लिंबू, डाळींब, आवळा याची लागवड करावी. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात घराभोवती गारवा निर्माण होऊ शकतो. नियमित छाटणी करून या फळझाडांचा आकार नियंत्रित ठेवावा. स्वयंपाकघरात नेहमी लागणारे लिंबू, कढीपत्ता ही झाडे बागेत असावीत.
वेलवर्गीय भाजीपाला उदा. तांबडा भोपळा, दुधी भोपळा, कारले, दोडका, घोसाळी, पडवळ यांच्या बिया पावसाळ्यामध्ये कंपाउंडच्या कडेने लावाव्यात. त्यांचे वेळ कंपाउंडवर चढवावेत.
फळवर्गीय भाजीपाला - टोमॅटो, वांगी, मिरची यांची रोपे अगोदर तयार करून सरी वरंब्यावर लागवड करावी. मूळवर्गीय कंदवर्गीय भाज्या उदा. रताळी, मुळा, कांदा, लसूण, बीट यांची लागवड वरंब्यावर करावी.
सपाट वाफे तयार करून त्यामध्ये पालेभाज्या उदा. मेथी, कोथिंबीर, पालक, राजगिरा, शेपू, माठ यांची लागवड करावी. या वाफ्यांचा वरंब्यावर कांदा, मुळा, लसूण, बीट लावावे. वाफे किंवा सरी वरंब्यावर वाटाणा, गवार, भेंडी, पावटा, वाल, श्रावणी घेवडा यांची लागवड करून आंतरपीक म्हणून पालेभाज्या घेता येतात. एका वर्षी ज्या वाफ्यांमध्ये मूळवर्गीय किंवा कंदवर्गीय या वाफ्यांमध्ये पुढच्या वर्षी शेंगवर्गीय भाज्या किंवा फळवर्गीय भाज्या किंवा पालेभाज्या लावाव्यात. सरी वरंब्यावर टोमॅटो किंवा पावट्याची लागवड केलेली असेल तर त्यांचे आयुष्यमान तीन ते चार महिने असते. टोमॅटोचे पीक संपण्याच्या एक महिना अगोदर इतर भाजीपाला उदा. पावटा ,वाटाणा किंवा काकडी यांच्या बिया टोमॅटोच्या झाडाशेजारी टोकाव्यात. म्हणजे टोमॅटो उपटून टाकल्यानंतर दुसरे पावट्याचे पीक वाढून एक महिन्याचे झालेले असते. टोमॅटोकरिता आधार म्हणून रोवलेले बांबू किंवा तारा यांचा उपयोग दुसऱ्या पिकला होतो. तसेच दुसरे पीक कमी कालावधीत उत्पादन देऊ शकते. परसबागेमध्ये कोबी, फुलकोबी, नवलकोल यांची लागवड पावसाळा, हिवाळा हंगामामध्ये करता येऊ शकते. या पिकांची रोपे कुंडीमध्ये आपण तयार करून प्रत्येक पंधरा दिवसांतून एकदा रोपे लावू शकतो. तसेच विदेशी भाजीपाला झुकिनी, ब्रोकोली, ब्रुसेल्स, स्प्राऊट यांचीही लागवड करता येते. परसबागेमध्ये भाजीपाल्यावर येणाऱ्या किडींच्या नियंत्रणाकरिता लिंबोळी अर्क, कडुनिंबाचे तेल, करंज तेल यासारख्या वनस्पतीजन्य किटकनाशकांचा वापर करावा. सेंद्रिय भाजीपाला मिळण्यासाठी रासायनिक खते, औषधे न वापरता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून घरच्या घरी आरोग्यवर्धक भाजीपाला उत्पादन करावे.