हिरव्या मिरचीस १५ रू. तर वाळलेल्या मिरचीस ७५ रू./किलो भाव खर्च वजा जाता एकरात ७० हजार रू. निव्वळ नफा
डॉ. अण्णाराव विठ्ठलराव कर्णे,
मु. पो. बावलगाव, ता. औराद, जि. बीदर - ५८५३२६,
(कर्नाटक)
मोबा ९१५८००३०२०
माझ्याकडे मौजे बावलगाव येथे ४० एकर जमीन सर्व प्रकारची आहे. त्यामध्ये गेली १० वर्षापासून
डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत असून खात्रीशीर उत्पादन घेत आहे. आम्ही गेल्यावर्षी फेब्रुवारी
२०११ मध्ये एक एकर मध्ये २ x २ फुटावर पुसा ज्वाला मिरचीची लागवड केली होती. या मिरचीची
रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात (१० लि. पाण्यात ५०० मिली जर्मिनेटर याप्रमाणे) बुडवून
लागवड केली आणि कल्पतरू सेंद्रिय खताच्या ५० किलीच्या २ बॅगा आणि शेणखत देऊन लागवड
केली. त्यानंतर दर १५ - २० दिवसांच्या अंतराने १०० लि. पाण्यासाठी ३०० ते ३५० मिली
सप्तामृत घेऊन एकूण ५ फवारण्या केल्या, तर पहिल्या ३ फवारण्यातच
६५ दिवसांना प्लॉट असताना हिरव्या मिरचीचे तोडे चालू
झाले. प्लॉट नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्यामुळे सुरूवातीपासूनच
निरोगी राहून वाढ, फुलकळी व बहर अधिक लागला. मिरचीचे पीक ३ महिन्याचे होईपर्यंत हिरव्या
मिरच्या उदगीर मार्केटला विकल्या. १५ रू./किलोप्रमाणे भाव मिळाला. साधारणपणे २ टनाहून
अधिक माल (हिरव्या मिरच्या) मिळाला. त्याचे ३० हजार रू. झाले. त्यानंतर लाल मिरच्या होऊ
दिल्या. लाल मिरच्यांचे तोडे करून त्या वाळवून विकल्या, त्याला ७५ रू./किलो भाव उदगीर
मार्केटला मिळाला. त्याचे ६० हजार रू. झाले. या मिरचीस एकूण २० हजार रू. खर्च आला.
खर्च वजा वजा जाता ७० हजार रू. निव्वळ नफा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे मिळाला.