२ दिवसापुर्वी न्युट्राटोन बागेवर फवारून फुगवण एवढी जबरदस्त की दुसऱ्याच्या बागेत आलो का? असे वाटते.

श्री. संतोष तानाजी साळुंखे (S.Y.B.A.),
मु. पो. राजापूर, ता. तासगाव, जि. सांगली.
मोबा. ९६०४३६९३३


माझी ४ एकर जमीन आहे. सर्व क्षेत्रामध्ये द्राक्षबाग सोनाका आणि विजयचमन आहे. या दोन्ही बागांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी मागील ६ - ७ वर्षापासून वापरत आहे. तर जबरदस्त रिझल्ट आम्हाला मिळाले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वपार केल्यावर द्राक्षबागावर वेगळेच लस्टर येते. न्युट्राटोन फवारले आणि गावाला जाऊन २ दिवसांनी आल्यावर शेतावर गेलो तर द्राक्षमण्यांना जबरदस्त फुगवण येते. ती सहजच नजरेस येते. जणू दुसऱ्याच प्लॉटमध्ये आपण आलो आहोत असे वाटते. हार्मोनीच्या वापराने डावण्या येत नाही. आम्ही प्रतिबंधात्मक हार्मोनीच्या वेळच्यावेळी फवारण्या घेतो. त्यामुळे डावण्या, भुरी, करपा, झान्तोमोनास रोगांपासून बागेचे संरक्षण होते.

मी स्वत: ७ वर्षापासून शेती करतो. पहिले आमच्या शेजारचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत होते. तेव्हा माझाही टेक्नॉंलॉजीवर विश्वास बसत नव्हता. जेव्हा मी वापरण्यास सुरुवात केली, तेव्हा आश्चर्यकारक रिझल्ट मिळाल्याने खात्री झाली. इतर औषधांपेक्षा तंत्रज्ञानाचे प्रमाण जास्त वाटते, मात्र उप्तादन इतरांपेक्षा जास्त मिळते, दर्जाही सुधारतो. त्यामुळे फारच परवडते.

पारंपारिक सोनाकाचे एकरी सरासरी १६ ते १८ टन उत्पादन मिळते. मात्र आम्हाला या तंत्रज्ञानाने २४ टन (४ किलोची ६ हजार पेटी) उत्पादन मिळाले.

सी. पी. पी. यु. आणि अॅमिनो अॅसिड ने नुसती फुगवण होते. पाण्याचे प्रमाण वाढते. मात्र चव मिळत नाही. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने मात्र फुंगवण वाढून गोडी भरते. शिवाय मालाची टिकाऊक्षमता वाढते.

जी.ए. न वापरता बेदाणा सरासरी भाव ५५ ते ६० असताना आम्हाला मात्र १०४ रुपये / किलो

४ वर्षापुर्वी अर्ध्या एकरातील प्लॉटचा बेदाणा केला होता. त्याला जी. ए. न देत नुसती डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरली, तर बेदाण्याला कुठेही सुरकुत्या नाही. फुगवण कायम होती. अर्ध्या एकरात ३ टन बेदाणा झाला होता. श्री. अशोक बाफणा यांच्याकडे बेदाणा विकला. त्यावेळी ५५ - ६० रू. / किलो दर असताना आपला बेदाणा उत्कृष्ट असल्याने आम्हाला १०४ रू/ किलो भाव मिळाला होता. बाकीच्या क्षेत्रातील माल केरळ, तामिळनाडू, मुंबई, भोसरी (पुणे) येथील व्यापार्यांनी जागेवरून १६० रू/ पेटी (४ किलो) भावाने माल नेला.

विजयचमन व सोनाकाच्या नवीन प्लॉटमधील पहिल्याच बहाराचा माल घेण्यास यंदा व्यापारी बागेत आले तेव्हा त्यांच्यामध्ये 'प्लॉट मला पाहिजे' अशी चुरस निर्माण झाली होती. सरसकट जागेवरून माल रोख पैशाने नेला. विजयचा २४० रू. / पेटी तर सोनाकाचा १६० रू/ पेटी भावाने माल नेला. विजयाला लांबी व फुगावन सोनाकापेक्षा जास्त असते. पहिल्यावर्षी विजयचमनचा अर्ध्या एकरात ७ टन माल निघाला. त्याचे २४० रू. / पेटी प्रमाणे ४ लाख २० हजार रुपये झाले.

रिकटनंतर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर फवारले तर पानांची साईज वाढून शेंड्याची आकडी तयार होते.