सर्वांचे खरबुजाचे प्लॉट रोगाने जळून खाक आम्हाला मात्र २ एकर १० गुंठ्यात ३८ टन, नफा ४ लाख

श्री. दिलीप शिवदास यादव,
मु. पो. बांगी नं. १, ता. करमाळा, जि. सोलापूर.
मोबा. ९७६७७४१०५५


पारंपारिक ऊस बागायती शेती करणाऱ्या उजनी बॅकवॉल परिसरामध्ये ऊस सोडून इतर भाजीपाला पिके करण्याचा माझा छंद असल्याने साहजिकच मार्केटमधील बरीचशी किटकनाशके, बुरशीनाशके वापरण्यात आली यातूनच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांची माहिती मिळाली. त्यावरून आम्ही २ वर्षापुर्वी २ मी २०१० रोजी लावलेल्या खरबुजास डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरायचे ठरविले. भारी काळ्या जमिनीमध्ये ६ x १.५ ते २ फुटावर नोन्यु सिडस कंपनीच्या बॉबी खरबुजाची लागवड २ एकर १० गुंठ्यामध्ये केली होती. बीजप्रक्रियेस जर्मिनेटरचा वापर केल्याने खरबुजाची उगवण चांगली झाली. खरबुज ३ पानांवर आल्यानंतर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर एकत्र मिसळून पहिली फवारणी केली. तेवढ्यावर नेहमीपेक्षा तजेलदार व वाढ जोमदार दिसून आली. त्यानंतर हवामानातील बदलामुळे नोन्यु कंपनीच्या खरबुजावर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला होता. या अवस्थेत पुन्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची दुसरी फवारणी जर्मिणेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५० मिली/ पंप याप्रमाणे फवारणी केली तर व्हायरसचा प्रादुर्भाव अजिबात झाला नाही. या काळात बऱ्याच शेतकऱ्यांचे खरबुजाचे प्लॉट व्हायरस रोगाने उद्ध्वस्त झाले. त्याचा प्रादुर्भाव एवढा होता की त्याच्या बातम्या अनेक वर्तमान पत्रातून प्रसारित झाल्या होत्या. मात्र अशा अवस्थेतून आमचा प्लॉट पूर्णता निरोगी राहिला.

एका किलोला खर्च २ रू. ७५ पैसे दर मात्र १८ रू./किलो

फळे लागल्यानंतर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची तिसरी फवारणी घेतली. त्यामुळे वेलीची रोग प्रतिकार शक्ती वाढून फळांचे पोषण चांगले झाले. फळधारणा एकसारखी झाल्यामुळे आणि फळांचे पोषण झाल्यामुळे उत्पादन चांगले मिळाले. २ एकर १० गुंठ्यातून ३८ टन उत्पादन मिळाले. आपल्या कंपनी ची औषधे वापरल्यामुळे आम्हाला या प्लॉटमधून ३०% अधिक उत्पादन मिळाले. (संदर्भसाठी कव्हरवर फोटो दिला आहे.) सर्व माल मुंबईला पाठविला. काढणीनंतर विक्रीपर्यंत एका किलोला २ रू. ७५ पैसे खर्च आला. तेथे १८ रू./ किलो भाव मिळाला. पट्टीमधून १०% खर्च वजा करून पट्टी होत असे. एकून ३८ टनाचे १८ रू. किलोप्रमाणे ६॥ लाख झाले. काढणीनंतरचा खर्च वजा जाता ५ लाख रू. उत्पन्न मिळाले. तरी सर्व खर्च वजा जाता ४ लाख रू. सव्वा दोन एकरातून निव्वळ नफा मिळाला.