२४ किलो भुईमूग शेंग बी, १८ पोती, भाव ६५ रू./किलो, ४५ हजार रू.

श्री. दिनकर गंगाराम पंधारे, मु. पो. पाडळी, ता. शिरूर कासार, जि. बीड, मोबा. ७३८७३८२०४९

२४ किलो भुईमूग उपट्या घरचेच बी १ एकरात तिफणीने जून २०१२ ला पेरला. पेरणीनंतर १५ दिवसांनी खुरपण केली. नंतर पाणी दिल्यावर लगेच पहिली पंचामृत फवारणी केली. नंतर १॥ महिन्यांनी दुसरी खुरपण केल्यावर दुसरी फवारणी केली. त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी देत गेलो.

९० दिवसात भुईमूग काढला, तर वाळल्यानंतर १८ पोती शेंगा (तोंडे शिवून) भरली. शेंगा वाळवून ३५ ते ४० किलो पोते भरते. ६ हजार रू./क्विंटल भावाने शेंगा विकल्या. बियाण्यासाठी ७० रू. किलो भावाने लोकांनी शेंगा खरेदी केल्या. यातीलच ६५ किलो बी यावर्षी २० जुनला पेरला आहे. त्यालाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे.

गेल्यावर्षी ७ - ८ बॅग कापूस पेरला होता. मात्र पाऊस नसल्याने खर्चही निघाला नाही.

यंदा ४ एकर कापूस, सोयाबीन महागुजरातचा ३ एकर आहे. त्यालाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे. यंदा पाऊस बरा झाला आहे.

Related New Articles
more...