दुष्काळात दिवसाआड ८० - ९० क्रेट उन्हाळी वांगी, ३ एकरातून ६ लाख, अजून ५ - ६ महिने चालतील

श्री. विवेक रामचंद्र कोलते,
मु. पो. पिसर्वे, ता. पुरंदर, जि . पुणे.
मोबा. ९५२७९६५९६८


मी डॉ.बावसकर तंत्रज्ञान ३ - ४ वर्षापासून वापरत आहे. कोथिंबीरीवर प्रथम वापर केला. त्याचे कोथिंबीरीवर जबरदस्त रिझल्ट मिळाले असून कोथिंबीरीपासून ५ एकरातून २ हंगामात ५ - ६ लाख रू. असे विक्रमी उत्पन्नही घेतले आहे. (संदर्भ : कृषीविज्ञान, मे २०१२, पान नं.१२)

चालू हंगामात १ फेब्रुअवि २०१३ ला पंचगंगा (माऊली) वांग्याची ३ एकरमध्ये ठिबकवर ६ x ३ फूट अंतरावर लागवड केली आहे. जमीन मध्यम प्रतीची असून पाणी विहीरीचे मात्र फारच कमी प्रमाणात आहे. आमचा भागच तसा दुष्काळी असल्याने उन्हाल्यात पाण्याची मोठी टंचाई असते. या वांग्याच्या चारी बाजूला १ ते २ किमी अंतरावर उन्हाळ्यात कोणतेही पीक नव्हते. एवढा दुष्काळी पट्टा. अशा परिस्थितीत डॉ. बावसकर तंत्रज्ञानाच्या वेळोवेळी फवारण्या करून दुष्काळी परिस्थितीत वांग्याचा दर्जेदार प्लॉट आणला. पाणी कमी असल्याने फुटवा कमी होईल म्हणून दोन झाडत अंतर तीनच फूट ठेवले होते. मात्र या तंत्रज्ञानाने फुटावा एवढा झाला की, ३ फूट अंतर पुर्ण व्यापले आहे. आता वाटते ४ फूट अंतर ठेवायला पाहिजे होते. या वांग्याला नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या करतो आणि ठिबकमधून १९:१९:१९, ०:५२:३४ , १२: ०:६१, १३:०:४५ ही विद्राव्य खते देतो. लागवडीच्यावेळी निंबोळ पेंड आणि १०:२६:२६ खत दिले होते. कल्पतरू वापरले नाही पण आता वापरणार आहे.

इतरांना ८ ते १० रू तर आम्हाला १५ रू. भाव

एवढ्यावर वांग्याचा प्लॉट अडीच महिन्यात चालू झाला. दिवसाड १॥ - १॥ एकराचा तोडा करतो. तर ८० - ९० क्रेट वांगी निघतात. पाणी कमी असल्याने माल थोडा कमीच वाटतो. तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निघणाऱ्या वांग्याचा दर्जा उत्तम असल्याने सुरुवातीला महिनाभर मंदी असताना ८ ते १० रू./किलो भाव असताना आम्हाला १५ रू. किलो भाव मिळत होता. याला फक्त एकच कारण होते की, ते म्हणजे या तंत्रज्ञानाने वांग्याचा देठ लांब, कलर आकर्षक व चमकदार होता. त्यामुळे मार्केटमध्ये वांग्याचे क्रेट उठावदार दिसत होते. आता पाऊस झाला आहे. त्यामुळे तोड्याला १०० ते १२५ क्रेट उत्पादन सहज मिळेल.

सध्या भाव चांगले ४०० रू. १० किलो एक नंबर मालाला मिळत असून काही वांगी मोठी झालेली असली तर ३२० रू./१० किलो अशा भाव मिळाला आहे.

अशाप्रकारे तोडे चालू होऊन २॥ महिन्याच्या काळात २४ जून २०१३ अखेपर्यंत ३ एकर वांग्यापासून ६ लाख रू. उत्पन्न मिळाले असून १ लाख रू. खर्च आतापर्यंत झाला आहे. ही वांगी अजून ५ - ६ महिने सहजच चालतील.

सरांनी मागे सांगितले होते, ऊस पीक करू नका ते आळशी लोकांचे पीक आहे. मला ही ते पटले. कारण उसाला पाणी खूप लागते आणि ऊस काढणीला (तुटायला) लागणीपासून १६ महिने लागतात. पैसे मिळायला अजून २ महिने म्हणजे १८ महिन्याचा काळ जातो. शिवाय उसाला एखादे पाणी कमी पडले तर टनेजमध्ये प्रचंड घट येते. म्हणून ऊस बंद करून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भाजीपाल्याचे कमी पाण्यात दर्जेदार व विक्रमी उत्पादन व भाव घेत आहे.