मरणप्राय गुलछडी जिवंत होऊन ३ महिन्यात अर्ध्या एकरातून ५० हजार

श्री. बाळासाहेब हरिभाऊ बलकवडे (७ वी),
मु, दारवली, पो.पौड, ता. मुळशी, जि . पुणे


गेल्यावर्षी उसासाठी ४॥ फुटी सरी काढली होती. मात्र उसाची लागण रद्द झाल्याने त्यामध्ये गुलछडी (सिंगल गावरान) जूनमध्ये लावली. जमीन मुरमाड, पांढरीची आहे. नदीवरून लिफ्ट केले आहे. उन्हाळ्यात पाणी ५ - ६ दिवसाला सरीतून देतो.

४॥ फुट रुंदीच्या सरीवर गुलछडी लावल्यामुळे मध्ये जास्त अंतर राहिले. त्यामध्ये सततच्या पावसाने घोळू व इतर तणांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे गुलछडीचे उत्पादन ३ - ४ किलो एवढेच मिळू लागले. नंतर तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाची फवारणी केली तर तण गेले, मात्र त्याबरोबर गुलछडीही निस्तेज झाली. लाल पडली, दांडा सुकला, फुटवा थांबला, कुठे - कुठे १ - २ कोंब फक्त दिसत होते. पुर्ण गुलछडी मरायला टेकली होती. त्यावर अनेक प्रकारची उपाययोजना केली, मात्र फरक काहीच पडला नाही. यामध्ये ३ महिने गेले. प्लॉट काहीच सुधारेना.

डॉ.बावसकर तंत्रज्ञानाबद्दल ऐकून होतो. मार्केटयार्डला आल्यानंतर माहिती घेत असे, परंतु वापर केला नव्हता. आत शेवटचा उपाय म्हणून जानेवारी अखेरीस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ऑफिसमध्ये जाऊन गुलछ्डीबद्दल उद्भवलेल्या परिस्थतीची माहिती देऊन त्यावर उपाय करण्यासाठी सल्ल्यानुसार डॉ.बावसकर तंत्रज्ञान घेऊन गेलो. जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम,न्युट्राटोन प्रत्येकी ६० मिली आणि प्रोटेक्टंट २ काडेपेटी याप्रमाणे प्रति पंपास घेऊन फवारणी केली.

त्याचा आठवड्यातच फरक जाणवला. लाल पडलेल्या व मारायला लागलेल्या गुलछडीला फुट निघू लागली. त्यानंतर लगेच आठवड्याने पुन्हा डॉ.बावसकर तंत्रज्ञान घेऊन गेलो. यातील सर्व सप्तामृत औषधे ५० मिली/ पंपास घेऊन फवारली. तर १ महिन्यात फुटवे भरपूर झाले. कळी निघू लागली. १॥ महिन्यात तोडे चालू झाले.

सुरूवातीला ३ - ४ किलो निघणारी गुलछडी १५ ते २० किलो निघू लागली.

सुरुवातीला ३ - ४ किलो निघणारी गुलछडी मरगळल्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पुन्हा पुनर्जिवीत होऊन ऐन उन्हाळ्यात १५ ते १८ - २० किलोपर्यंत निघू लागली. त्यानंतर नियमित १५ दिवसाला सप्तामृताच्या २ फवारण्या केल्या. तर चांगला माल मिळू लागला. सर्वसाधारण गुलछडीवर लाल कोळीचा प्रादुर्भाव होतो. अनेक भागात लाल कोळीचा प्रादुर्भाव झाल्याने मार्केटमध्ये गुलछडी ची आवक कमी होती. त्यामुळे भाव वाढले होते. याच अवस्थेत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आमच्या गुलछडीचा दर्जा वाढून उत्पादनही वाढले. त्यामुळे १५० - २०० रू. / किलोपर्यंत भाव मिळाले. ऐन उन्हाळ्याच्या ३ महिन्यात माल व भाव जादा मिळाल्याने ५० हजार रुपयाचे उत्पन्न अर्ध्या एकरात मिळाले.

आमच्या पश्चिम पट्ट्याट पाऊसमान अधिक असते. त्यामुळे सध्या माल कमी झाला आहे. गेल्या आठवड्यात ५ - ६ दिवस सतत पाऊस होतो. अशा परिस्थितीत ४ - ५ किलो माल निघतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी घेत असल्याने तेथे आज १३ -१४ किलो गुलछडी निघाली. ती पुणे मार्केटला १०० रू./किली भावाने गेली.

सरांना अजून एक सल्ला विचारला की, गुलछडी ला आमच्या भागात सर्वसाधारण मोठा पाऊस संपल्यानंतर बारीक पाऊस (बुरंगाट) येते, तेव्हा गुलछडीला गळ पडते. कॉलर रॉट होतो. पानात पाणी जाते. खोडाचा पाला सडून मुटभर पाला सहज प्रत्येक खोडावरील निघतो. पांढरी बुरशी येते. हा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरांनी आताच सांगितल्याप्रमाणे जर्मिनेटर ५० मिली, प्रिझम ४० मिली, थ्राईवर ५० मिली, क्रॉपशाईनर ७० मिली आणि हार्मोनी ३० मिली / १० लि. पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून ड्रेंचिंग करणार आहे.

गुलछडी पीक मी मागील १४ - १५ वर्षापासून करीत आहे. मात्र असा रिझल्ट मला कमी आला नव्हता. म्हणून आज (२४ जून २०१३) पुन्हा पुढील फवारण्यासाठी सप्तामृत औषधे घेऊन जात आहे.

गुलछडीच्या कंदाचे पोते ८०० रू. ला मिळाले होते. अर्ध्या एकराला ५ पोती कंद लागले. टिचूभर अंतरावर लागवड वरंब्याच्या दोन्ही बाजूला आहे.

सर्व गुलछडी पुणे फुल मार्केटला महादेव जगताप यांच्या गाळ्यावर विक्रीय आणतो. 'कृषी विज्ञान' मासिकाची मी ३ महिन्यापुर्वी वर्गणी भरली आहे. माझे शिक्षण ७ वीपर्यंत झाले असून अंक नियमित वाचत आहे. आपले लाल कोळीवरील नवीन 'स्प्लेंडर' औषध वापरलेल्या शेतकऱ्यांचे अनुभव मासिकात वाचले. तेही औषध गुलछडीवर वापरणार आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नियमित फवारण्यामुळे गुलछडीमध्ये कीड रोग प्रतिकारशक्ती वाढत असल्याने लाल कोळीचा प्रादुर्भाव इतरांप्रमाणे आपणास अजिबात झाला नाही. पुढेही होऊ नये म्हणून 'स्प्लेंडर' हेही औषध व्पारणार आहे. पाऊण एकर उशीरा सुरू हंगामी ऊस लावला आहे. सध्या छातीएवढा उंच आहे. बांधणीस आला आहे. त्याला सरांनी सांगितले जर्मिनेटर ५०० मिली, थ्राईवर १ लि., कॉपशाईनर १ लि., प्रिझम १ लि. फवारा. म्हणजे १५ ते २० तन ऊस उत्पादन नेहमीपेक्षा निश्चित वाढेल.

पौड पट्ट्याच्या भागात अति पाऊस असतो. त्यामुळे जमीन दलदलयुक्त झाल्याने मातीला घट्ट, चिकटपणा राहत नाही. आणि उंच वाढलेला ऊस वाऱ्याने लोळतो. नंतर त्याला उंदीर, कोल्ह्याचा उपद्रव होऊन उसाचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे उत्पादनात घट येते. असा आमचा अनुभव आहे. अन्यथा आम्ही पुर्व पट्ट्यापेक्षाही उसाचे पीक जोमाने आणतो.

इंद्रायणी भात करतो, चालू वर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यात गबाळ (गवत) जादा झाले असल्याने पाऊस उघडल्यावर पाळी मारून गवत काढून पुढच्या पावसावर भात लागवड करणार आहे. त्याला देखील सरांनी सांगितल्याप्रमाणे सप्तामृत वापरणार आहे.