संत्र्यात २ एकर कांदा, १२ गोण्या कल्पतरू व २ सप्तामृत फवारण्या, ३०० गोण्या उत्पादन, १॥ लाख रू.

श्री. मदनलाल चांदमल मुथा,
मु. पो. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे.
मोबा. ९८९०९२४९२९



मी गेल्यावर्षीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्यास सुरुवात केली. ऊस आणि कांदा पिकावर या तंत्रज्ञानाचा वापर केला. उसाचा अनुभव गेल्या (जून २०१३) मासिकात दिला आहे. तर संत्र्यात २ एकर कांदा दिवाळीनंतर लावलेला होता, त्याला २ फवारण्या व कल्पतरू १२ गोण्या २ वेळा दिले. तेवढ्यावर ३०० गोण्या कांदा उत्पादन मिळाले. त्याचे १॥ लाख रू. झाले होते.

संत्र्याला जूनच्या पहिल्या आठवड्यात जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले आणि वरील खताचा डोस रिंग पद्धतीने चरी घेऊन गाडून दिला. मधल्या आळयातील जागा कुदळीने चाकून/ खणून काढली. नंतर ८ - ८ दिवसांच्या फरकाने चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाण्याच्या पाळ्या दिल्या नाहीत. एवढ्यावरच फूट भरपूर निघाली आहे. फुले येऊन बारीक - बारीक गुंडी तयार झाली आहे. बहार नेहमीपेक्षी चांगला आहे. यापुर्वी २ बहार घेतले होते. मात्र एकावेळी सर्व झाडांना कधीच बहार आला नव्हता . तो यावर्षी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सर्व झाडांना आला आहे. काही झाडांना बहार कमी वाटतो पण त्यांना अजून फुले येत आहेतच, त्यामुळे त्यांनाही फळे लागतील.

आता या गुंडीची गळ होऊ नये म्हणून डॉ.बावसकर तंत्रज्ञान घेण्यास आलो आहे.