२५० किलो शेवगा शेंगा - ७५०० रू.
श्री. चंद्रकांत रंगनाथ देशमाने,
मु. पो. कोरेगाव, ता.कर्जत, जि .अहमदनगर.
मोबा. ९७६६१८३०७२
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमधून जानेवारी २०१३ मध्ये "सिद्धीविनायक' शेवग्याची ५०० रोपे
नेली होती. त्यांची लागवड मध्यम प्रतीच्या जमिनीत ८' x ८' वर केली. उन्हाळ्यात पाणी
कमी असल्याने ठिबकवर झाडे जगविली दरम्यान दर महिन्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या
आतापर्यंत ४ - ५ फवारण्या केल्या आहेत. एक एकरसाठी कल्पतरू ५० किलो वापरले आहे. उन्हाळ्यात काही रोपे मेली. सध्या ४००
झाडे आहेत. आठवड्याला ६५ - ७० किलो शेंगा मिळतात. आतापर्यंत ५ - ६ तोडे केले आहेत.
शेंगा २० - २५ किलो निघाल्या की कर्जतला विकतो आणि जास्त ६० - ७५ किलो निघाल्यावर पुणे
मार्केटला पाठवितो. पुण्याला ४० - ४५ रू. किलो भाव मिळाला आहे. आतापर्यंत एकूण २५०
किलो शेंगा निघाल्या असोन ७५०० रू. झाले आहेत. मागे लहान शेंगा व फुलकळी भरपूर आहे.
त्यानंतर २०० झाडे शेवग्याची लावली आहेत. ती १॥ ते २ महिन्याची असून २ फूट उंचीची आहेत, आज अजून ३०० झाडे लागवडीसाठी ४ पाकिटे 'सिद्धीविनायक' शेवगा बी घेऊन जात आहे.
त्यानंतर २०० झाडे शेवग्याची लावली आहेत. ती १॥ ते २ महिन्याची असून २ फूट उंचीची आहेत, आज अजून ३०० झाडे लागवडीसाठी ४ पाकिटे 'सिद्धीविनायक' शेवगा बी घेऊन जात आहे.