७ गुंत्यातून भेंडीचे ३० हजार

श्री. हनुमान केशवराव नाईकवाडे,
मु.पो. दही गव्हाण, ता. घनसावंगी, जि. जालना - ४३१२०९.
मो. ७७४३८९३९५५


आम्ही कापूस काढल्यानंतर थोड्या पाण्यावर ५० गुंठ्यामध्ये बायर कंपनीची भेंडी २५ फेब्रुवारी २०१६ रोजी लावली. जमीन माध्यम प्रतिची आहे. गेल्यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने यंदा उन्हाळा फार कडक होता. त्यामुळे अति उष्णतेने ३०% झाडांची मर झाली. शिवाय राहिलेल्या भेंडीचीदेखील वाढ होत नव्हती. त्यानंतर मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची माहिती मिळाली. नंतर मर समर्थ अॅग्रो तिर्थपुरी यांच्याकडून जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझम ही औषधे नेली. जर्मिनेटरचे मुळावाटे ड्रेंचिंग करून थ्राईवर, प्रिझमची फवारणी केली. त्यामुळे मर जागेवरच थांबून झाडांची वाढ ऐन उन्हाळ्यात जोमाने होऊ लागली. हे पाहून पुढेही हीच औषधे वापरायचे असे ठरविले. नंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या कंपनी प्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार घेऊ लागलो. थ्राईवर, क्रॉपशाईनरमुळे प्लॉटवरील बोकड्याचे प्रमाणही कमी झाले.

१। ते १।। महिन्यात भेंडीचे तोडे चालू झाले. प्रिझममुळे फुलकळीचे प्रमाण वाढले. पुढे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या थ्राईवर, क्रॉपशाईन, राईपनर, न्युट्राटोन औषधांच्या नियमित फवारण्यांमुळे फळधारणा चांगली होऊन दररोज २५ ते ३० किलो भेंडी निघू लागली. उन्हाळ्यात बाजारभाव चांगले होते. १० ते १२ किलोचे क्रेट ५०० - ६०० रु. ला ठोक विकले जायचे. असे १।। महिना तोडे मे २०१६ अखेर चालू होते. नंतर बहार कमी होऊन जूनमध्ये १५ ते १६ किलो भेंडी निघू लागली. जून अखेर ठोक विक्रीतून २७ - २८ हजार रु. झाले असून किरकोळचे ३ हजार असे ३० हजार रु. उत्पन्न मिळाले. २ जुलैला जर्मिनेटर ड्रेंचिंग करून पुन्हा थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझमची फवारणी केल्याने नवीन फुट निघू लागली आहे. आता याच्या नवीन फुटीस लागलेल्या कळीपासून १५ दिवसात अजून १० - १२ हजार होतील. कारण आजही ४०-५० रु./किलो होलसेल भाव आहे.

हे उत्पादन घेण्यामध्ये आम्हाला कंपनी प्रतिनिधी श्री. अशोक काटे व गणेश कसाब (मो. ७७९८६१०६५०) यांचे मार्गदर्शन मिळाले. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळेच आम्हाला या १० गुंठ्यांतील ३०% झाडे जाऊन राहिलेल्या ७०% झाडांपासून (म्हणजे ७ च गुंठे) हे उत्पादन मिळाले. आता या अनुभवातून चालूवर्षी कपाशीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणार आहे.