अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये डाळींबासारख्या अपारंपारिक पिकानेही दिला आधार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नौकेने

श्री. भिमराव आत्माराम माने,
मु.पो. कोप्रा बु., ता. अमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२०६.
मो. ९४२३३४०३०१



मी २०१४ पासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करीत आहे. आमच्या भागात मी २०१५ मध्ये कापूस या पिकावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करून एकरी १६ क्विंटल उत्पादन घेतले आहे.

तसेच डाळींबाला जर्मिनेटरची आळवणी केली असता झाडांची मर थांबून पांढरी मुळी अधिक सक्षम होऊन झाडांची वाढ होण्यास मदत होत आहे. २३ जानेवारी २०१४ ला १४ x ८ फुटावर मध्यम प्रतीच्या ५० गुंठे जमिनीत लावलेल्या या डाळींबाचा १८ - १९ महिन्यानंतर पहिला बहार धरला. या हस्त बहाराची कळी व्यवस्थित निघण्यासाठी जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. २०० लि. पाण्यातून फवारले आणि जर्मिनेटर १ लि. चे प्रती एकरी ड्रेंचिंग केले. कल्पतरू सेंद्रिय खत बागेस अगोदरच छाटणी केल्यानंतर दिलेले होते. वरील फवारणी व ड्रेंचिंगमुळे फुलकळी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लागली. त्यानंतर जर्मिनेटर, प्रिझम, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंटची फवारणी केली असता झाडावर मधमाश्यांचे प्रमाण वाढून सेटिंग चांगले झाले. त्यानंतर फळांचा आकार वाढण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन व किडीसाठी स्प्लेंडरची फवारणी केली. त्यानंतर फळे साधारण १०० ते १५० ग्रॅमची असताना थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन च्या २ फवारण्या केल्या असता फळांच्या आकारामध्ये वाढ होऊन फळांना कलर येऊ लागला. या वर्षी दुष्काळ असल्यामुळे फळे पोसण्यासाठी उन्हळ्यात पाण्याची गरज असताना पाणी देऊ शकलो नाहो. त्यामुळे खर्च ही निघतो की नाही असे वाटत होते पण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करून मला खर्च वजा जाता ३५ हजार रु. मिळाले. शेवटचे २ - ३ पाणी जरी मिळाले असते तरी मला ४५० झाडांपासून किमान ६ टन माल निघाला असता. या अनुभवातून मी मृग बहारासाठी (जुलै २०१६) डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करीत आहे.