उसातील आंतरपीक झेंडू सुधारून, सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लागवडीची प्रेरणा

श्री. विश्वास बाबुराव पाटील, मु.पो. नागाव (कवठे एकंद), ता. तासगाव, जि. सांगली.
मो. ९०९६१४०५०२


माझ्याकडे १२ वर्षाची ३।। एकर सोनाका व थॉमसन बाग आहे. मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे गेली ११ वर्षापासून वापरात आहे. मी चालू वर्षी एप्रिल छाटणी १० एप्रिल २०१६ रोजी घेतली. द्राक्षबाग फुटण्यासाठी वातावरण अनुकूल नव्हते. तेव्हा जर्मिनेटर ५ मिली/लि. पाणी प्रमाणे घेऊन ओलांडे पुर्णपणे धुऊन (दाट फवारणी) घेतले. तर माझी द्राक्ष बाग एकसारखी फुटली. तसेच ५ पानांवरती असताना व तेथून पुढे प्रत्येक १० दिवसांनी याप्रमाणे थ्राईवर ३ मिली + क्रॉपशाईनर ३ मिली/लि. पाणी याप्रमाणे ३ फवारण्या केल्या. त्यामुळे पानांची कॅनॉपी चांगल्या प्रकारे मिळाली. काडीच्या पक्वतेला चांगला प्रतिसाद मिळाला. एप्रिल छाटणीनंतर ६० दिवसांनी १० - १० दिवसांच्या अंतराने राईपनर ४ मिली/लि. पाणी याप्रमाणे २ फवारण्या घेतल्या. त्यामुळे काडी एकसारखी पिकण्यास मदत झाली. अशाप्रकारे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे द्राक्ष बागायतदारांना एक संजीवनीच ठरत आहे.