१।। एकर उन्हाळी काकडी खर्च ३० हजार, उत्पन्न मात्र १।। लाख

श्री. कुशबराव रामचंद्र हरणे,
मु.पो. माळेगाव, ता. लोहा, जि. नांदेड.
मो. ७७६९८०५१३५


आम्ही ३ ते ७ मार्च २०१६ रोजी नांदेड येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनास भेट देत असताना आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या स्टॉलवर नांदेड जिल्हा प्रतिनिधी मोतीराम पवार यांचा परिचय झाला. तेव्हा त्यांना काकडी पिकाबद्दल माहिती विचारून त्यांच्या मार्गदर्शनानुसार काकडीला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरण्याचे ठरविले.

मग लोह्यातील केंद्रे कृषी केंद्र यांचेकडून अजित - ६६ वाणाचे बियाणे आणि बिजप्रक्रियासाठी जर्मिनेटर घेऊन गेलो. जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून काकडीची ठिबकवर मार्चच्या दुसऱ्या पंधरावड्यात ४' x १।' वर बी टोकून लागवड केली. बीजप्रक्रियेमुळे बियाणे ५ व्या दिवशीच उगवताना दिसले. २ - ३ दिवसात सर्व उगवण होऊन लागवड यशस्वी झाली. त्यानंतर मग २० दिवसाचे पीक असताना १।। एकर क्षेत्राला १।। लि. जर्मिनेटर ठिबकमधून सोडले असता पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून वेल वाढीस लागले. ड्रेंचिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी वरून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनरची पहिली फवारणी केली होती. त्यामुळे वेलींना नवीन पाने फुटून हिरवीगार, निरोगी वेलांची वाढ सुरू झाली. या काकडीला मांडव केला नव्हता. कमी पाण्यात ठिबकवर हे पीक घेतले होते. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या १० -१२ दिवसाला फवारण्या करत होतो. २ फवारण्या झल्यावर ४० दिवसाचे पीक असताना तोडा सुरू झाला. सुरुवातीला दररोज ५ - ६ क्विंटल काकडी उत्पादन मिळू लागले. काकडी ऐन उन्हाळ्यात (एप्रिल अखेरीस) चालू होऊन माल हिरवागार, टवटवीत मिळत असल्याने नांदेड मार्केटला २० - २२ किलोचे कट्टे (पोते) ३०० रु. ला ठोक जात होते. पुढे प्रत्येक तोड्यास माल वाढू लागला. १।। एकरातून ८ ते १० क्विंटल दररोज माल निघू लागला. असे १८ - २० तोडे झाल्यानंतर पुढे बहार कमी होते गेला. त्यानंतर मात्र पुर्णच बहार संपला. तोडे चालू असतानाही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या घेत असल्याने १ महिनाभर भरपूर उत्पादन मिळून मालाचा दर्जा उत्तम मिळत होता. त्यामुळे नांदेडला ठोक १४ - १५ रु. भावाने काकडी विकली जात होती. या १।। एकर क्षेत्रातून २५ ते ३० हजार रु. खर्च करून १।। लाख रु. उत्पन्न सव्वा २ महिन्यात मिळाले.

आता या काकडीच्या रानात ७ जून २०१६ रोजी त्याच ठिबकवर ४' x २।।' वर कपाशीची लागवड केली आहे. काकडीच्या अनुभवातून आता कपाशीला देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणार आहे.