अत्यंत कमी पाणी, प्रतिकूल परिस्थितीत ५ एकरमधून ६० क्विंटल कापूस व फरदड २५ क्विंटल

श्री. उत्तमराव ग. ठाकरे, मु.पो. बाभुळगाव, ता. देवळी, जि. वर्धा -४४२००१,
मो. ९४०४८२३३४४


माझ्याकडे १५ एकर शेती असून त्यामध्ये सोयाबीन,तूर, कापूस ही पिके पारंपरिक पद्धतीने घेत असतो. त्यानंतर माझ्या वाचण्यात डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे कृषी विज्ञान मासिक आले व त्यातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून प्रेरीत होऊन हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. मासिकामध्ये दिल्याप्रमाणे बेसल डोस मध्ये कल्पतरू खताचा वापर करू जून २०१५ मध्ये ५ एकर कपाशीची लागवड केली. जमीन मध्यम प्रतीची असल्याने लागवडीतील अंतर ५ x २ फुट ठेवले. त्यानंतर १ महिन्यांनी पुन्हा कल्पतरू खत एकरी ५० किलो याप्रमाणे देऊन जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले. लगेच जर्मिनेटर, कॉटन थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + हार्मोनी व स्प्लेंडर प्रत्येकी २०० मिली/१०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे झाडांची वाढ जोमदार होऊन पिक हिरवेगार दिसू लागले. त्यानंतर दुसरी फवारणी १५ दिवसांनी वरील प्रमाणे केली. अशा फुलपात्या लागेपर्यंत एकूण ४ फवारण्या केल्या. त्यामुळे झाडे चांगली घेरदार झाली. फुलपात्याचे प्रमाण वाढून बोंडांचे पोषण झाले. पावसाचे प्रमाण कमी असून देखील मला एकरी सरासरी १२ क्विंटक प्रमाणे एकूण ६० क्विंटल उत्पादन मिळाले.

नंतर मी फरदड घेण्याकरीता पुन्हा एक फवारणी केली. त्यामुळे मला फरदडपासून ५ एकरमध्ये २५ क्विंटल उत्पादन झाले.