संत्र्याच्या बागेत कोथिंबीर, काकडी, कांदा आंतर - आंतरपीक (HSF) कमी जागेत, कमी पाण्यात पिकांचे उत्तम नियोजन डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी!

श्री. मदनलाल चांदमल मुथा,
मु.पो. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे.
मो.९८९०९२४९२९



माझ्याकडे संत्राची २०० झाडे ९ वर्षाची आहेत. लागवड १३' x १३' वर आहे. जमीन मध्यम लालसर आहे. पाटाने (विहीरीचे) पाणी देतो. या संत्रा बागेत १५ दिवसापुर्वी (१५ जून २०१६) कोथिंबीर (धना) ६० किलो वाफ्यामध्ये फोकली. धन्याला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केली होती त्यामुळे उगवण आठ दिवसात झाली. ९०% पेक्षा जास्त उगवण झाली. उगवणी नंतर ८ दिवसांनी (३० जून २०१६) रोजी पुणेरी काकडी कोथिंबीरीच्या वाफ्याच्या वरंब्यावर १ - १ फुटावर लावली आहे. वाफा ६ फुट रुंदीचा आहे. वेल वाढीस लागेपर्यंत कोथिंबीर निघेल. त्यानंतर साऱ्यामध्ये हे वेल पसरतील असे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने संत्र्यातील आंतर पिकांचे नियोजन केले आहे. आज पहाटे ३ वाजल्यापासून (३/७/२०१६) संततधार पाऊस सुरू झाल्याने त्यापासून कोथिंबीर, काकडीचे संरक्षण होण्यासाठी जर्मिनेटर, थाईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रिझम १ - १ लि. घेऊन जात आहे.

मागे याच संत्रा बागेत नोव्हेंबर २०१५ मध्ये २।। एकर गरवा कांदा लावला होता. जर्मिनेटरची प्रक्रिया करून रोपे घरी तयार केली होती. बी घरचेच होते. रोप सव्वा महिन्यात लावायला आले होते.

रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून वाफ्यात लावली. लागवडीच्या अगोदर शेणखत २।। एकरला ४ ट्रॉली आणि गोंडूळखत ३० गोणी दिले. खुरपणी झाल्यावर साधारण १।। - २ महिन्याचे पीक असताना १८:४६:० च्या २ बॅगा, २०:२०:० च्या २ बॅगा आणि युरीया १ बॅग याप्रमाणे २।। एकरला खत दिले.

डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित ३ फवारण्या केल्या. पहिली फवारणी खुरपणी झल्यानंतर (४० दिवसाचे पीक असताना) केली. त्यासाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम, प्रोटेक्टंट प्रत्येकी १ लि. २५० लि. पाणी हे प्रमाण घेतले. त्यामुळे थंडीतदेखील कांद्याची वाढ चांगली झाली. रोगराई आली नाही. पातीला काळोखी आली. त्यानंतर २० दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी गाठी लागल्यावर केली. तेव्हा थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. आणि राईपनर ५०० मिली + हार्मोनी ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम हे २५० लि. पाण्यातून फवारले. त्याने पातीची निरोगी वाढ होऊन कांदा १५० ते २०० ग्रॅमपर्यंत पोसला. नंतर कांदा काढणीच्या १ महिना अगोदर थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन १ - १ लि. ची २०० लि. पाण्यातून तिसरी फवारणी केली. तर कांद्याचे पोषण होऊन २५० ते ३०० ग्रॅमचा कांदा मिळाला. पत्ती डबल, कलर आकर्षक होता. हा कांदा मार्च २०१६ मध्ये काढला. २।। एकरात ५०० - ५२५ गोणी निघाला, तो साठविला आहे.

कांदा साठवणीचा एक अफलातून प्रयोग

७० फुट लांब x ५ फुट रुंद व जमिनीपासून ५ फुट उंच असा दगडाचा पार रचून जागा तयार केली. त्यावर ह्या कांद्याचा टोकदार ढिग (कौलारू घरासारखा) केला. त्यानंतर हा कांदा पाचटाचे झाकून त्यावरून प्लॅस्टिक कागद अंथरला आहे. दगडामुळे हवा गाळून जाते. कांदा सडत नाही व वरून पाचट व प्लॅस्टिक कागदामुळे पावसापासून बचाव होतो.

आता हा कांदा ऑगस्ट - सप्टेंबर मध्ये बाजार भावाचा अंदाज घेऊन विक्रीस काढणार आहे.

संत्र्याला कांदा निघाल्यापासून ताण बसला होता. आता कोथिंबीरीच्या वेळी पाणी बसले. त्यामुळे १५ जुलैला (२०१६) बहार फुटून फूल लागले आहे.