डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी द्राक्षासाठी रामबाण, रोगमुक्त व दर्जात वाढ, वेलीस ३।। ते ४ पेटी (१४ ते १६ किलो) माल, एरवी एका वेलीला २।। पेटी (८ ते १० किलो)
श्री. अरविंद विष्णू पवार, मु.पो. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली
माझी साधी सोनाका १।। एकर ५ वर्षाची बाग असून २- ३ वर्षे झाली माझ्या बागेस माल कमी
प्रमाणात लागत होता. तसेच लागलेला माल कमी क्वॉलीटीचा मिळत असल्याने खर्च करूनही अपेक्षीत
उत्पन्न मिळत नव्हते. मी सर्व औषधे संजय कृषी सेवा केंद्र, रामांदनगर (ता. पलूस) येथून
खरेदी करीत होतो. या दुकानदाराने मग मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यास सांगितले.
कारण ते स्वतः त्यांच्या बागेला ५ - ६ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरत असून
त्यांना चांगल्या पद्धतीने द्राक्ष पिकाचे उत्पादन मिळत होते. त्यांनी मला डॉ.बावसकर
टेक्नॉलॉजीचा वापर व होणारे फायदे समजून सांगितले. त्यामुळे मी या टेक्नॉलॉजीचा वापर
करण्याचे ठरविले. वरचेवर त्यांनी माझ्या बागेस भेट दिली व मार्गदर्शन केले. प्रथम माझ्या
बागेस अनेक समस्या असता. बाग एकसारखी न फुटणे, घडाला पोत न मिळणे, सनबर्न व क्रॅकिंग
होणे अशा अनेक समस्या असायच्या. अशा परिस्थितीत मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे वापरण्याचे
ठरविले.
पुर्वी बाग छाटल्यानंतर जर्मिनेटर फक्त वापरात होतो. पण चालू वर्षी जर्मिनेटर ५०० मिली + प्रिझम ५०० मिली १०० लि. पाण्यास घेऊन ओलांड्यावर फवारणी केली. तसेच पेस्टमध्येही जर्मिनेटर व प्रिझम वारपले. त्यामुळे हवेत तापमान कमी असतानाही तसेच ४ -५ दिवस ढगाळ वातावरण होते तरीही द्राक्ष बागेच्या काड्या अतिशय उत्तम फुटल्या.
दरवर्षी पोंग्यातून निघणारे घड लहान, कमकुवत व बाळेघड निघण्याचे प्रमाण जास्त होते, पण यावर्षी द्राक्षबाग पोंग्यात असताना जर्मिनेटर ४०० मिली + थ्राईवर ३०० मिली + क्रॉपशाईनर ३०० मिली + हार्मोनी २०० मिली + प्रोटेक्टंट २०० ग्रॅम + १०० लि. पाणी अशा पद्धतीने फवारणी केली. त्यामुळे पोंग्यातून निघणारे घड ठोसर, जोमदार व पाकळीबाज निघाले. यावेळी पिवळे घड न निघता हिरवेगार निघाले. ५ - ६ पानानंतर (कडेची विरळणी केल्यानंतर) जर्मिनेटर ३०० मिली + थ्राईवर ३०० मिली + हार्मोनी २०० मिली + किटकनाशक + १०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केल्यानंतर यापुर्वी माझ्या बागेची पाने अतिशय लहान व शेंडा चपटा निघत होता, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी फवारणीने तो शेंडा गोल व पाने जाड, रुंद, मोठी झालेली दिसून आली. २- ३ फवारणीत मिळालेले रिझल्ट पाहून पुढील फवारण्या घ्यायचा निश्चय केला.
२० व्या दिवशी जी ए सोबत थ्राईवर ३०० मिली + क्रॉपशाईनर ३०० मिली + हार्मोनी ३०० मिली + १०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे घडाची साईज अतिशय जबरदस्त मिळाली. घड ५ - ६ इंच वाढले. पाकळ्या भरपूर निघाल्या. पाने हिरवीगार व रोगमुक्त होण्यास मदत झाली. वातावरण खराब असतानासुद्धा रोगाचे प्रमाण अत्यल्प होते. हे करत असताना ३५ दिवसात बाग प्लॉवरींग अवस्थेत आली. यावेळी ढगाळ वातावरण ४ - ५ दिवस होते. तेव्हा थ्राईवर ३०० मिली + क्रॉपशाईनर ३०० मिली इतर किटकनाशक व बुरशीनाशक + १०० लि. पाणी असे फवारले असता माझ्या बागेत ढगाळ वातावरणामुळे होणारी गळ कमी झाली व पुढे योग्य प्रकारे आवश्यक तेवढेच मण्याचे सेटींग झाले. नंतर मणी सेटींग, पाणी उतरताना, माल मऊ पडल्यानंतर आणि माल काढण्याच्या अगोदर १० दिवस या ४ अवस्थेत थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन च्या ४ फवारण्या घेतल्या. सर्व औषधे प्रत्येकवेळी सरासरी ३ - ३ मिली / लि. याप्रमाणे वापरली. त्याचा फायदा असा झाला की, दरवर्षीपेक्षा मालाची फुगवण जास्त म्हणजे १७ - १८ एम. एम. पेक्षा अधिक झाली. साखरेत २०% ने वाढ झाल्याने वजनात भर पडली. म्हणजेच ४०० ग्रॅमच्या आकारमानाचा असणारा घड ५०० ग्रॅम भरत होता. मालाला लस्टर व डस्टर अतिशय चांगल्या पद्धतीने मिळाले आणि म्हणजे द्राक्ष घडास अतिशय किपींग क्वॉलिटी मिळून यापुर्वी एका झाडापासून २ ते २।। पेटी म्हणजे ८ ते १० किलो माल मिळत होता, परंतु डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरल्याने ३।। ते ४ पेटी उतारा म्हणजेच १४ ते १६ किलो उत्कृष्ट दर्जाचा द्राक्ष माल मिळाला आहे.