२ एकरात कापूस उत्पादन ५० क्विंटल ३५ किलो, दर ५१०० रु./क्विंटल, उत्पन्न २,५६,७८५/-रु

श्री. गोपीनाथ नागनाथराव मुंडे, मु.पो. गोविंदवादी, ता. माजलगाव, जि. बीड - ४३११३१.
मो. ९८२३४६११०५


कापूस हे पीक नियोजन व मेहनत केल्यास नेहमी फायदेशीर रहाते असा माझा मागच्या काही वर्षापासूनचा अनुभव आहे. मुळात मी अल्पमुधारक शेतकरी आहे. त्यामुळे सचोटीने व अभ्यासू वृत्तीमुळे नवनवीन तंत्राच्या मदतीने शेती करीत असतो. मात्र मागच्या काही वर्षापासून खोल गेलेली पाण्याची पातळी यामुळे पिके घेणे जिकीरीचे झाले आहे. तेव्हा कमी पाण्यावर पिके घेण्यासाठी आवश्यकता आहे ती नविन तंत्रज्ञानाची. यामध्ये आम्ही कमी पाण्यावर उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचा वापर करतो.

मी माझ्या शेतामध्ये दि. १० जून २०१६ रोजी २ एकरमध्ये कापूस कावेरी सीड्सच्या एटीएम या जातीची लागवड केली. प्रथम रेषा पाडून ४ x १.५ फुट अंतरावर ड्रीप अंथरले व कापसाची लागवड केली. त्या कालावधी दरम्यान माझी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. कंपनी प्रतिनिधी श्री. सतिश बुरंगे (मो. ८३०८८५१३८८) यांची श्री तिरूपती कृषी सेवा केंद्र, माजलगाव येथे भेट झाली व त्यांनी मला व माझ्या काही सहकार्यांना एकत्रीतरित्या डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे वापरून उत्पादन वाढवण्याचा सल्ला दिला. तसेच आमच्या प्रश्नांचे त्यांनी समाधान केले. सुरुवातीला ड्रीपमधून जर्मिनेटर एकरी १।। लि. सोडले व नंतर फवारणीच्या वेळेस किटकनाशकासोबत जर्मिनेटर ५० मिली + कॉटन थ्राईवर ५० मिली + १५ लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यानंतर तिसऱ्या फवारणीच्या वेळेस लालकोळी नियंत्रणासाठी स्प्लेंडर ३० मिली १५ लि. पाण्यामध्ये मिसळून फवारणी केली.

मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे वापरल्यामुले माझ्या प्लॉटमधल्या झाडांची प्रतिकारक शक्ती वाढली. गेल्यावर्षी अतिरिक्त पाऊस झाला तरीही झाडांची मर झाली नाही वा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जाणवला नाही. झाडावरचे तेज व हिरवेगारपणा एवढा होता की, शेजारील शेतकरी प्लॉट पहायला यायचे. माझ्या कापसाच्या झाडाचे एकही पण लाला पडले नाही वा पिवळे दिसत नव्हते. थोडक्यात झाडाला म्हातारपण आलेच नाही. कापसाची वाढ एवढी झाली की, त्यामधून माणूस उभा राहिला तरी दिसत नसे. ७ ते ८ फुट उंचीची झाडे फुलपात्यांनी लगडलेली होती. पाते लागण्याच्या अवस्थेमध्ये कॉटन थ्राईवर ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली + १५ लि. पाणी अशी फवारणी केल्यानंतर पात्यांची संख्या वाढली, तसेच पातेगळ झाली नाही. बोंडे पोसण्यासाठी कॉटन थ्राईवर, राईपनर, न्युट्राटोन च्या फवारण्या केल्यामुळे मोठ्या बोंडांची संख्या जास्तीत जास्त राहिली. त्यामुळे पोषण व्यवस्थीत झाल्यामुळे वजनदार बोंडे भरली आणि उत्पादन जास्त आले.

मला २ एकर क्षेत्रामधून पहिल्या वेचणीस २२ क्विंटल कापूस निघाला व दुसऱ्या वेचणीस ११ क्विंटल कापूस निघाला. त्यानंतर मी ड्रीपने पाणी दिले व एकरी जर्मिनेटर १।। लि. सोडून वरून किटकनाशकासोबत जर्मिनेटरची फवारणी केली, तर नंतरच्या बहाराला १७ क्विंटल ३५ किलो असे एकूण मला २ एकर क्षेत्रामधून ५० क्विंटल ३५ किलो कापसाचे उत्पादन निघाले. सुरुवातीला कापूस विकल्यामुळे मला ५१०० रु. प्रति क्विंटल भाव मिळाला व एकूण २ एकर क्षेत्रामधून २,५६,७८५/- रु. चे उत्पन्न झाले. त्यामुळे चालूवर्षी (२०१७) डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांचा सुरुवातीपासून वापर चालू असून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न आहे.