एक एकर पाच गुंठ्यात ६ टन बेदाणा निर्मिती

श्री. अशोक गोपाळ सगरे, मु. पो. हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ , जि. सांगली, द्राक्ष - थॉमसन

मी माझ्या १ एकर ५ गुंठे क्षेत्रात प्रथमच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरली आणि जवरादस्त उत्पन्न व रिझल्ट मिळाला. मी सुरुवातीस पेस्टमध्ये जर्मिनेटर घेतले. त्यामुळे बाग एकसारखी फुटली. त्यानंतर मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या माहितीपत्रकाप्रमाणे संपूर्ण स्प्रे घेतले. त्यामुळे बाग एकसारखी व लवकर फुटली. घडाला पुढे पाने निर्माण झाल्याने घडाची साईज वाढली. शेंडे कायम चालू होते. पाने मोठी, जाड व पानात भरपूर रोगप्रतिकारक शक्ती होती. फुलोर्‍यात गळ, कुजवा झाला नाही. माझ्या बागेत भरपूर लोड माल असुनही सनबर्न, ममीफिकेशन क्रॅकिंग झाले नाही. इतर वागेपेक्षा माझी बाग चांगली होती. शेवटपर्यंत पाने हिरवीगार होती. कुठल्याच रोगाला बाग बळी पडली नाही.

आम्ही ४ महिने १५ दिवसात प्लॉट काढून तो रॅकवरती टाकला. मला १ इकर ५ गुंठ्यात ५५०० पेटी माल निघाला. व बेदाणा ६००० किलो झाला. माझा बेदाणा ६० रू. किलो डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे मिळाला. दरवर्षी माझा ४ ते ४.५ टन बेदाणा होत होता. यावर्षी १.५ टनापर्यंत वाढ झाली. त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीवर मी खुष झालो.

Related Articles
more...