चेरी टोमॅटोची लागवड

चेरी टोमॅटोचे वनस्पतीशास्त्रीय नाव लायकोपर्सिकॉन इस्कूलेन्टम व्हर सिरॅसीक्रोम (Lycopersicon esculentum var. cerasiforme) असून ते सोलेनेसी कुळातील आहे.

नियंत्रित वातावरणातील जागतिक भाजीपाला लागवडीचा विचार केल्यास क्षेत्र आणि उत्पादन या बाबतीत टोमॅटोचा पहिला नंबर लागतो. विकसीत देशांमध्ये ग्रीनहाऊसमधील टोमॅटो लागवडीचे तंत्रज्ञान विकसीत केलेले आहे. त्यामुळे साहजिकच त्यांनी उत्पादनाची जास्तीत जास्त पातळीसुद्धा गाठली आहे. नेहमीच्या बाहेरील क्षेत्रातून मिळणार्‍या उत्पादनाच्या ३ ते ४ पट उत्पादन ह्या नियंत्रित लागवडीमुळे जास्त मिळते. शिवाय उत्तम दर्जाचा टोमॅटो निर्यातक्षम साठवणुकीसाठी उपलब्ध होतो.

महाराष्ट्रामध्ये मागील १० -१२ वर्षात चेरी टोमॅटोच्या लागवडीस व्यावहारिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. सुरुवातीला चेरी टोमॅटोची लागवड बर्‍याच शेतकर्‍यांनी पॉलीहाऊसमध्ये यशस्वी करून उत्तम प्रतीच्या चेरी टोमॅटो फळांचे उत्पादन घेतले. मात्र नंतरच्या काळात बाजारभावाच्या चढउतारामुळे ही पॉलीहाऊसमधली चेरी टोमॅटोची लागवड आर्थिकदृष्ट्या परवड नसल्याने बहुतेक शेतकरी पॉलीहाऊसमध्ये चेरी टोमॅटोची लागवड न करता बाहेरील क्षेत्रात स्थानिक बाजारपेठेसाठी लागवड करीत आहेत. यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्यास निर्यातक्षम उच्च प्रतीची फळे व जास्त उत्पादन मिळण्यास मदत होते.

आता तर महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरांमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये तसेच घरगुती वापरण्याची मागणी चांगली असल्याने चेरी टोमॅटोची लागवड पॉलीहाऊस तसेच बाहेरील क्षेत्रात फायद्याचीच झालेली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी लहान लहान क्षेत्रावर स्थानिक बाजारपेठेसाठी चेरी टोमॅटोची लागवड बाहेरील क्षेत्रात करीत आहेत. परंतु सध्या पारंपारिक पद्धतीने लागवड करीत असल्याने फळांची प्रत व उत्पादन कमी मिळत आहे. पारंपारिक पद्धतीमध्येच थोडा बदल करून उदा. गादीवाफ्यावर लागवड, लागवडीसाठी उच्च प्रतीची तयार केलेली रोपे, ठिबक संच वापरून पाणी पिकांच्या गरजे एवढेच, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर व विद्राव्य खतांचा वापर तसेच किडी व रोगांचा बंदोबस्त इ. बाबींचा समावेश केल्यास उत्तम प्रतीची चेरी टोमॅटोची फळे मिळू शकतात. त्याकरिता या लेखात उच्च तंत्रज्ञान वापरून चेरी टोमॅटोची लागवड करण्यासाठी तांत्रिक माहिती उपलब्ध केलेली आहे.

चेरी टोमॅटोची लाल पक्क झालेली फळे खाण्यासाठी वापरतात. तसेच फळे, चटणी, टोमॅटो पुरी , पेस्ट, पावडर, केचअप, सॉस, सूप इत्यादींसाठीही वापरतात. तसेच या फळांचे लोणचे व पदार्थांना रंग आण्य्यासाठी ही फळे वापरतात. चेरी टोमॅटोमध्ये इतर टोमॅटो जातींपेक्षा जास्त प्रमाणात लायाकोपेन आणि जीवनसत्त्व 'क' उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे चेरी टोमॅटोची झाडे विषाणू रोगांना जास्त प्रतिकारक असतात. व्य्पारीदृष्ट्या चेरी टोमॅटोची लागवड फायदेशीर असून किचनगार्डनमध्ये लहान क्षेत्रावर लागवड करण्यास उपयोगि आहे.

महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांतून चेरी टोमॅटोची लागवड लहान क्षेत्रावर होतेच पण पुणे, नाशिक अहमदनगर, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर हे चेरी टोमॅटो पिकविणारे प्रमुख जिल्हे आहेत.

चेरी टोमॅटोच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य फळांमध्ये खालीलप्रमाणे पोषकद्रव्ये उपलब्ध असतात. ही पोषकद्रव्ये निरनिराळ्या जातींच्या फळांमध्ये थोडीफार कमी जास्त असू शकतात.

चेरी टोमॅटोमध्ये असलेली घटक द्रव्ये - पाणी (ग्रॅ.) -९३.१, प्रोटीन (ग्रॅ.)-१.९, स्निग्ध पदार्थ (ग्रॅ.) - ०.१, खनिजे (ग्रॅ.) - ०.६, कर्बोहायड्रेटस (ग्रॅ.) ३.६, सोडियम (मि.ग्रॅ.) - ४५.८, पोटॅशिअम (मि.ग्रॅ.) - १४४.०, तांबे (मि.ग्रॅ.) - ०.१९, गंधक (मि.ग्रॅ.) - ४.००, क्लोरीन (मि.ग्रॅ.)- ३८.००, कॅलरीज (मि.ग्रॅ.)- २३.००, थायमिन (मि.ग्रॅ.) - ०.०७, रिबोफ्लेवीन (मि.ग्रॅ.) - ०.०१, निकोटिनीक आम्ल (मि.ग्रॅ.) - ०.४०, जीवनसत्त्व 'क' (मि.ग्रॅ.) - ३१.००, कॅल्शिअम (मि.ग्रॅ.) - २०.००, आक्झॉंलिक आम्ल (मि.ग्रॅ.) - २.००, मॅग्नेशिअम (मि.ग्रॅ.) - ३६.००, जीवनसत्त्व 'अ' ( आय. यू .) - ३२०.०

टोमॅटो झाडाच्या वाढीची सवय - टोमॅटो ही ठिसूळ खोड आणि संयुक्त पाने असलेली वर्षायू वनस्पती असून झाडाच्या सर्व भागावर लव असते. फुले लहान पिवळ्या रंगाची व झुपक्यांनी असतात. फळ रसाळ, लाल, केशरी, बेरी प्रकारचे असते. फळे आंबट व गोलाकार आकाराची असून विविध जाती उपलब्ध आहेत. सर्वसाधारणपणे बाजारातील मागणीचा विचार करता, बहुतेक बाजारपेठेमध्ये गोल आकराच्या टोमॅटो फळांना अधिक मागणी असल्याचे आढळून आलेले आहे. निर्यातीसाठी लागवड करावयाची असल्यास आयात करणाऱ्या देशांतील ग्राहकांच्या मागणीचा विचार करून मगच त्या प्रकारच्या जातीची लागवडीसाठी निवड करावी. परदेशातील बाजारपेठांमध्येसुद्धा गोल, मध्यम आकराच्या, लाल रंगाच्या फळांना मागणी जास्त आहे.

वाढीच्या सवयीनुसार टोमॅटो जातींचे दोन गट आहेत.

१) वेलीसारखे आधाराने वाढणारे (इनडिटरमिनेट)

२) झुडुपवजा वाढणारे (डिटरमिनेट)

चेरी टोमॅटोच्या लागवडीसाठी वेलीसारखे आधाराने वाढणाऱ्या इनडिटर मिनेट गटामधील जातींची निवड करावी.

सुधारित जाती - अलीकडच्या काळात बर्‍याच नामवंत कंपन्यांनी चेरी टोमॅटोच्या अनेक सुधारित, संकरित जाती विकसीत करून शेतकर्‍यांसाठी त्या बाजारामध्ये उत्पलब्ध करून दिलेल्या आहेत 'नोन - यु- सीड' कंपनीने खालील चेरी टोमॅटच्या जाती लागवडीसाठी प्रसारित केलेल्या आहेत. उन्नती -

उन्नती -लागवडीपासून ७५ दिवसांनी फळांची तोडणी चालू होते. इनडिटरमिनेट गटातील जातीचे. सरासरी एका झाडापासून ५०० फळे, प्रत्यके फळाचे वजन १६ ग्रॅम असून फळे घट्ट सालीची व गोलाकार आकाराचीअसतात. फळांचा रंग चकचकीत गोल्डन (पिवळ) असतो. जास्त उत्पादन देणारी जात आहे.

रंभा - 'अमेरिकन सिलेक्शन विनर' या प्रकारातील जात असून लागवडीपासून ७० - ७५ दिवसांनी फळांची तोडणी चालू होते.

ही संकरित इनडिटरमिनेट गटातील जात आहे. उंच वाढणारी, जोमदार व उत्तम रोगप्रतिकार शक्ती असलेली जात, लांबट आकाराचे , आकर्षक लाल, घट्ट, १२ ते १४ ग्रॅमचे, चवीस गोड असे फळ. अंदाजे ५०० फळे प्रीत झाड. अशी उत्तम उत्पादनक्षमता असलेली जात आहे. उत्तम टिकाऊक्षमता लांबच्या वाहतुकीस योग्य असे अद्वितीय वाण.

याशिवाय इतर काही परदेशी सिड कंपन्यांचे संकरित बियाणे उपलब्ध आहे.

हंगाम - महाराष्ट्रामध्ये चेरी टोमॅटोची लागवड जवळजवळ वर्षभर करता येत. खरीप किंवा पावसाळी (जून -जुलै), रब्बी किंवा हिवाळी (ऑक्टोबर - नोव्हेंबर ) आणि उन्हाळी (जानेवारी -फेब्रुवारी) या तिन्ही हंगामात चेरी टोमॅटोची लागवड करता येते.

लागवडीचे तंत्र निरोगी रोपे तयर करणे - प्रत्येक बी पासून उत्तम निरोगी आणि जामदार रोप तयार होईल याची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ३ मीटर लांब, १ मीटर रुंद आणि २५ सें.मी. उंच या आकाराचे गादीवाफे तयार करावेत. एक एकर लागवडीसाठी अंदाजे १० वाफे पुरतात. प्रत्येक वाफ्यावर १५ ते २० किलो चांगले जुकलेले शेणखत आणि १ ते १।। किलो कल्पतरू सेंद्रिय खत वाफ्यांतील मातीमध्ये मिसळावे. गादी वाफ्याच्या रुंदीच्या समांतर ७ ते १० सें.मी. अंतरावर रेषा काढून २.५ सें.मी. अंतरावर १ सें.मी. खोलीवर एक - एक बी टोकून द्यावे आणि ते गांडूळ खताने आठव बारीक शेणखताने झाकून हलक्या हाताने दाबून द्यावे. लगेच झारीने पाणी द्यावे. उन्हाळी आणि हिवाळी हंगामात गादी वाफ्यांना झारीने सकाळ, संध्याकाळ पाणी द्यावे. रोप उगवून वाढू लागल्यावर मग वाफ्यांना पाटाने पाणी द्यावे. पावसाळी हंगामासाठी रोपे तयार करताना गादीवाफ्यावर १२० ते १५० सें.मी. (४ ते ५ फूट) शेडींग नटे उभारून घ्यावे. तसेच उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी शेडींग नेटची सावली केल्यास रोपांची वाढ चांगली होते. रोप वाढीस लागल्यावर ही सावली काढून टाकावी. कीड व रोगांचा पादुर्भाव होऊ नये म्हणून रोपांवर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३० मिली आणि प्रोटेक्टंट ३० ग्रॅमच्या १० लि. पाण्यातून १२ ते १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्य. कराव्यात. बियांची लागण झाल्यापासून बी रुजणे,अंकुरणे, मोड येणे आणि खरी पाने येणे या क्रिया अनुकूल वातावरण असताना ६ -७ दिवसांत होतात. चेरी टोमॅटोच्या वेगवेगळ्या अवस्थांसाठी पोषक तापमान खाली दिलेले आहे

वाढीच्या अवस्था       |       पोषक तापमान (अंश सेल्सिअस )

बी उगवण्यासाठी                 २६ ते ३२

रोपांच्या वाढीसाठी               २३ ते २६

फुले येण्यासाठी                    १३ ते १४

परागकणांच्या वाढीसाठी      २० ते २७

फलधारणा होण्यासाठी          १८ ते २०

फळ पिकण्यासाठी                २४ ते २६

महाराष्ट्रातील हवामानात टोमॅटो पिक जवळजवळ वर्षभर केव्हाही घेत येते. खरीपासाठी जून किंव जुलैमध्ये बी पेरतात. तर हिवाळी हंगामासाठी डिसेंबर - जानेवारी महिन्यामध्ये बियांची पेरणी केली जाते.

बीजप्रक्रिया - बी गादीवाफ्यावर पेरणीच्या अगोदर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच उगवण चांगली होण्यासाठी गादीवाफ्यावर १० लि. पाण्यास प्रत्येकी ३० मिल जर्मिनेटर आणि प्रोटेक्टंट औषधाचे ड्रेंचिंग करावे आणि वाफ्यावरील माती फॉरमॅलिन ४० % द्रावणाने निर्जंतुक करावी. फॉरमॅलिन गादीवाफ्यावर टाकल्यानंतर गादीवाफे २४ तास प्लॅस्टिक पेपरने झाकून टाकावे. ५०० मि.ली. फॉरमॅलिन प्रती चौ. मी. क्षेत्रास पुरेसे होते. १ ग्रॅम वजनामध्ये सरासरी ३०० ते ३२५ बिया असतात. एक एकर क्षेत्र लावण्यासाठी ५० ग्रॅम चेरी टोमॅटोचे बियाणे पेरणीसाठी पुरेसे होते. रोपे ३ ते ४ आठवड्यानंतर साधारणत : १२ ते १५ सें.मी. उंचीची झाली म्हणजे लागवड करावी.

जमिनीची पूर्वमशागत - चेरी टोमॅटोचे पीक जमिनीच्या बाबतीत फारसे चोखंदळ नाही. हलक्या रेताड जमिनीपासून ते मध्यम काळ्या, पोयट्याच्या जमिनीत चेरी टोमॅटोचे पीक यशस्वीपणे घेता येते. जमिनीची निवड करताना पाण्याचा निचर उत्तम प्रकारे होणे आवश्यक आहे. पाण्याचा उत्तम निचरा असलेल्या काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत टोमॅटोचे पीक फारच चांगले येते. जमिनीचा सामू ६ ते ७ पर्यंत चांगला समजला जातो.

एक एकराल १० -१२ मे. टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे . शक्य होईल तेव्हा हिरवळीच्या खतांचा जास्तीत जास्त वापर करावा.

लागवड करण्यासाठी ६० सें.मी अंतरावर सर्‍या पाडाव्यात व रोपांचे स्थलांतर सरीवरंबा पद्धतीने करावे. उत्तम प्रत, जादा उत्पादन मिळण्यासाठी चेरी टोमॅटो रोपांची पुनर्लागण गादीवाफ्यावर करून ठिबक संच वापरून पाणी आणि डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरल्याने शेतकर्‍यास आर्थिक फायदा होतो. उत्पादन उच्च प्रतीचे मिळते. याकरिता जमिनीची पूर्वमशागत झाल्यावर गादीवाफे ६० सें.मी. रुंद , ३० सें.मी. उंच व सोयीप्रमाणे लांब तयार करावेत. प्रत्यक दोन वाफ्यांमध्ये ४० सें.मी. अंतर ठेवावे.

लागवड - पारंपारिक लागवड पद्धतीमध्ये सरीवरंबा पद्धतीने खरीप व हिवाळी हंगामातील लागवडीसाठी दोन ओळींतील अंतर ६० सें.मी. व दोन झाडांतील अंतर ६० सें.मी. (६० x ६० सें.मी.) ठेवून वरंब्यावर एका ठिकाणी एकाच जोमदार, निरोगी गोप लावून लागवड करावी. एक एकरमध्ये ११११० रोपांची लागवड होते. उन्हाळी हंगामातील लागवड ६० x ४५ सें.मी. वर करवी. गादी वाफ्यावर लागवड करताना गादी वाफ्याचा मधोमध ४५ ते ६० सें.मी. अंतरावर लागवड करावी. एक एकर क्षेत्रात ८८८८ रोपांची लागवड ४५ सें.मी. अंतरावर, तर ६६६६ रोपांची लागवड ६० सें.मी. अंतर ठेवून करता येते.

चेरी टोमॅटोचे उत्पादन आणि फळांची गुणवत्ता चांगली मिळण्यासाठी चेरी टोमॅटो पिकावर सूक्ष्म पोषक द्रव्यांची फवारणी करणे आवश्यक आहे. पोषक द्रव्यांबरोबरच फवारणीच्या द्रवरूप खतांचासुद्धा वापर करावा.

नत्र, स्फुरद, पालाश याशिवाय काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची (आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक, बोरॉन इ.) सुद्धा चेरी टोमॅटोच्या निरोगी वाढीसाठी आणि फळांची प्रत उत्तम राखण्यासाठी गरज असते. चांगले कुजलेले शेणखत, कल्पतरू सेंद्रिय खत किंवा हिरवळीचे खत भरपूर प्रमाणत वापराल्याने सूक्ष्म द्रव्यांची कमतरता आढळून येत नाही.

आंतरशागत - लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी रोपांना मातीची भर द्यावी. तसेच खुरपणी करून पिकातले तण काढून टाकावे. पिकाच्या मुळ्यांभोवती हवा खेळती राहण्यासाठी हलक्या कुदळीने दोन ओळीत उथळ खणून (चाळणी करून ) क्षेत्र भुसभुशीत ठेवावे.

पाणी व्यवस्थापन - चेरी टोमॅटोची रोपे स्थलांतर केल्यानंतर रोपांची वाढ समाधानकारक होण्यासाठी लागवडीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. पिकांच्या सुरुवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ जास्त होते. म्हणून फुलोरा येईपर्यंत पाणी ४० -४५ दिवसापर्यंत बेताने द्यावे. फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले -फळे गळणे, फलधारणा न होणे या समस्या निर्माण होतात. पणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही. झाडाची पाने पिवळी पडू लागतात. साधारण खरीप हंगामात १० ते १२ दिवसांनी (पावसाचा अंदाज घेऊन) पाणी द्यावे. हिवाळी हंगामासाठी पिकास ६ ते ८ दिवसांनी तर उन्हाळी हंगामात ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे.

रोपांना आधार व वळण देणे - रोपे स्थलांतर केल्यानंतर वाढ समाधानकारक होत असताना पानांच्या बेचक्यात बगल फूट येऊ लागते. जमीनपासून २० ते ३० सें.मी. पर्यंत येणारी बगल फूट खुडून टाकावी. पाने काढू नयेत. रोप सरळ वाढेल याची काळजी घ्यावी. चेरी टोमॅटो झाडांपासून जास्तीत जास्त उत्पादन व प्रत मिळविण्यासाठी रोपांना आधार देऊन आडव्या तारांच्या सहाय्याने वळण देणे आवश्यक आहे. लागवडीनंतर २५ दिवसांनी प्रत्येक तीन रोपांच्या दरम्यान १५० ते १८० सें.मी. उंच व ३ ते ४ सें.मी.जाडीचे मजबूत बांबू रोपांच्या रांगेत घट्ट रोवून उभे करावेत. तसेच २० -२५ मीटर अंतरावर रोपांच्या ओळीतून जाड दणकट २०० ते २२० सें.मी. उंच वासे खोलवर मजबूत रोवून घ्यावेत. या डांबाला अगर वाशाला १६ गेजच्या जी.आय. तारा बांधून त्या ओळीतील काठ्यांना खालीलप्रमाणे आडव्या बांधाव्यात

लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिली तार जमीनीपासून सुमारे ४५ सें.मी. अंतरावर जमिनीशी समांतर काठ्यांवर बांधावी. दुसरी तार सुमारे ७५ सें.मी. अंतरावर (४० दिवसांनी ) बांधावी आणि तिसरी तार जमिनीपासून १ मीटर उंचीवर (साधारण ५० ते ६० दिवसांनी ) घट्ट बांधावी. रोपाच्या वाढणार्‍या फांद्या तारांच्या आधारे पसरून सुतळीने सैलसर बांधाव्यात. रोपे जसजशी वाढत जातील तसतशा झाडांच्या फांद्या पसरून दुसर्‍या व तिसर्‍या तारेपर्यंत सुतळीने बांधण्याचे काम नियमित चालू ठेवावे. एक एकर क्षेत्रात २५०० ते २८०० बांबू आणि १५० -१६० डांब (वासे ) लागातात. सदरचे साहित्य पुढील ४- ५ हंगामासाठी वापरत येते. झाडांना वळण दिल्यामुळे औषध फवारणी फळांची तोडणी, रोपांना मातीची भर देणे, पाणी देणे इत्यादी मशागतीची कामे व्यवस्थिपणे पार पाडता येतात. त्याचप्रमाणे जमिनीलगत हवा खेळती राहून फळांचा जमिनीवरील मातीशी संपर्क टळल्यामुळे ती स्वच्छ व निरोगी टवटवीत निघतात. झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळून झाड निरोगी राहते व फुलाफळांची वाढ चांगली होते.

रोग व किडींचा बदोबस्त - चेरी टोमॅटोवर अनेक प्रकारचे रोग उद्भवतात. महत्त्वाच्या रोगांची माहिती आणि त्यावरील नियंत्रण उपाय खाली दिलेले आहेत.

कीड आणि रोगामुळे चेरी टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. वेळीच उपाय योजले नाहीत तर पिक हाताचे जाण्याची शक्यता असते. सर्व कीड व रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी शक्यतोवर चेरी टोमॅटोच्या संकरित रोगप्रतिबांधक जाती आणि कीटकनाशक व बुरशीनाशक औषधांची कमीत जमि फवारणी या गोष्टी कराव्या लागतात. चेरी टोमॅटो पिकावर कीड / रोग यांचा उपद्रव होऊ नये म्हणून लागवड झाल्यापासून शिफारशीप्रमाणे फवारणी करणे योग्य असते. कीडनाशक आणि बुरशीनाशक औषधांची फवारणी करणे योग्य असूनही सर्वसाधारण शेतकर्‍याला ते परवडत नाही. म्हणूनच पीक संरक्षणाच्या इतर पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असते. पिक संरक्षण म्हणजे निव्वळ औषध फवारणी न करता जैविक नियंत्रण, रोग आणि कीड प्रतिबंधक जातींचा वापर, पिकाची फेरपालट, हंगामातील बदल, तण वाढू न देणे आणि कीडनाशक औषधांचा कमीत कमी वापर एकात्मिक पीक संरक्षण उपाययोजनांचा वापर होणे आवश्यक आहे.

रोग व कीड -

रोग - अ ) बुरशीजन्य रोग -

१) रोप कोलमडणे किंवा रोपांची मर (डँपिंग ऑफ) - राझोक्टोनिया, फायटोप्थ्रोरा किंवा पिथियम या बुरशीमुळे हा रोग होतो. त्यामुळे वाफ्यातील रोपे जमिनीलगत कुजतात आणि कोलमडून सुकून जातात.

उपाययोजना - रोपांचे वाफे लागवडीपूर्वी फॉरमॅलिन रसायनद्रव्याने निर्जंतुक करावेत. तसेच बियांना जर्मिनेटर आणि प्रोटेक्टंटची बीजप्रक्रिया करावी. तसेच जर्मिनेटर आणि प्रोटेक्टंटची बीजप्रक्रिय करवी. तसेच जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करावे. पाण्याचा निचरा होणे अत्यावश्यक आहे.

२) करपा (अर्ली ब्लाइट) - हा रोग अल्टरनेरिया सोलानाई या बुरशीमुळे होतो.जमिनीलगतच्या पानांपासून या रोगाची सुरुवात होते. प्रथम पाने पिवळी पडतात आणि नंतर पानावर तपकिरी काळपट ठिपके दिसू लागतात.बारकाईने निरीक्षण केल्यास या ठिपक्यांवर एकात एक अशी वर्तुळे दिसतात.पाने करपून गळून पडतात.कित्येक वेळा फांदीवर आणि फळांवर ठिपके आढळून येतात.दमट व उष्ण हवेत या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.

३) मर रोग - (फ़्युजेरियम विल्टफ़्युजेरियम स्पी.) हा रोग जमिनीतील फ्युजेरियम या बुरशीमुळे होतो.खालची पाने पिवळी पडून गळून जातात व रोगट झाडांची वाढ खुंटते.

उपाय - हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होत असल्याने पिकांची फेरपालट करून, रोग प्रतिबंधक जातींची लागवडीसाठी निवड करावी.

ब) व्हायरसजन्य रोग -

१) पर्णगुच्छ किंवा बोकड्या (लिफ कर्ल व्हायरस ) - पाने सुरकुतल्यासारखी होऊन पानांची वाढ खुंटते व त्यांचा रंग फिकट हिरवा दिसतो. वाढीच्या सुरुवातीला रोग असल्यास फलधारण होत नाही. या रोगाचा प्रसार पांढर्‍या माशीमुळे होतो.

उपया : रोगट झाडे दिसल्याबरोबर उपटून त्यांचा नाश करावा. रोगाचा प्रसार पांढर्‍या माशीमार्फत होत असल्याने तिच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट किंवा मिथिल पॅराथिऑन किंवा मोनोक्रोटोफॉस हे औषध योग्य प्रमाणात १०- १५ दिवसांच्या अंतराने ३ -४ वेळा फवारावे किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हार्मोनी १५ मिली १० लिटर पाण्यातून सप्तामृतासोबत वेळापत्रकाप्रमाणे फवारावे.

२) भुरी - हा रोग पानांवर व फुलांवर येतो. या रोगाची पांढरट पिठासारखी बुरशी पानाच्या पृष्ठभागावर व खालच्या बाजूस येते.

उपाय -रोग दिसताच पाण्यात मिसळणार्‍या गंधकाच्या ०.२५% १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम या प्रमाणात १० दिवसांच्या अंतराने २ -३ फवारण्या कराव्यात. तसेच नियंत्रणासाठी हार्मोनी १५ ते २० मिली किंवा बावीस्टीन १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार फवारावे.

कीड -

१) फळे पोखरणारी अळी (हेलीओथीस आर्मिजेरा ) - मादी पतंग पानावर, फुलांवर अंडी घालतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी कोवळी पाने खाऊन वाढते. नंतर फळे आल्यावर फळे खाऊ लागते. अळी फळावर छिद्रे पाडून पुढील अर्धे शरीर फळांत ठेवते. त्यमुळे फळे सडतात. जानेवारी ते मे दरम्यान या अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो.

उपाय - नियंत्रणसाठी जैविक पद्धतीचा वापर केला जात आहे. त्यामध्ये परोपजीवी कीटक तसेच विषाणू आणि बॅक्टेरिया वापरतात. परोपजीवी किटकांमध्ये ट्रायकोग्रामा आणि कंम्पोलेटिस क्लोरोडी या नावाचे कीटक आहेत. ट्रायकोग्रामा हे कीटक फळे पोखरणार्‍या अळीच्या अंड्यावर उपजीविका करतात, तर कंम्पोलेटिस या कीटकाच्या अळ्या फळे पोखरणार्‍या अळीवर जगतात. ट्रायकोग्रामा हे कीटक एक एकराला एक लाख एवढ्या प्रमाणात सोडावेत, म्हणजे फळे पोखरणार्‍या अळ्यांचे अंदाजे ७० टक्क्यापर्यंत नियंत्रण होते.

२) तुडतुडे, पांढरी माशी व मावा - हे कीटक पानांतील अन्नरस शोषून घेतात व व्हायरस रोगांचा प्रसार करतात. त्यामुळे पाने बोकडलेली दिसतात. लीफ कर्ल या व्हायरस रोगाचा प्रसार पांढरी माशीच करते.

३ पाने पोखरणारी अळी - अळी रंगाने पिवळी असते. माशी अगदी लहान असून सहजासहजी दृष्टीस पडत नाही. परंतु अळीमुळे प्रादुर्भाव झालेली पाने मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. अळी पानाच्या वरील पापुद्र्याखाली राहून आतील भाग कुरतडत पुढे सरकते. ही अळी जशी पुढे सरकते तशा पानांवर पांढर्‍या नागमोडी रेषा पडतात. किडीच्या प्रादुर्भावमुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया कमी पडते. त्यामुळे उत्पादन घटते.

वरील रोग - किडीस प्रतिबंधक उपाय म्हणून तसेच बदलत्या हवामानाचा पिकावर वाईट परिणाम न होता उत्पादन व दर्जा, मालाच्या टिकाऊपणात वाढ होण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर पुढीलप्रमाणे करावा -

फवारणी :

१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३५० ते ४०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली + २५० लि. पाणी.

फळांचे तोडे सुरू झाल्यावर दर १५ दिवसांनी फवारणी क्रमांक ४ प्रमाणे औषधांचे प्रमाण घेऊन फवारणी करावी म्हणजे उत्पादनात व दर्जात हमखास वाढ होऊन बाजारभाव अधिक मिळतात.

काढणी आणि उत्पादन - रोप लागवडीपासून बहुधा ७० -७५ दिवसांत फळांची पहिल्या तोडणीस सुरुवात होते. वाहतुकीचे साधन आणि बाजारपेठचे अंतर लक्षात घेऊन टोमॅटोच्या फळांची काढणी पुढीलप्रमाणे करावी.

१) हिरवी पक्क अवस्था - फळे लांबच्या बाजारपेठेत पाठवावयाची असल्यास ती पूर्ण वाढलेली पण हिरवी असतानाच काढावीत .

२) गुलाबी अथवा पिंक अवस्था - फळांचा हिरवा रंग बदलून त्यावर तांबूस छटा दिसू लागली की चेरी टोमॅटोची काढणी करावी. अशी फळे जवळपासच्या बाजारपेठेत पाठविण्यास उत्तम असतात.

३) पक्क अवस्था - स्थानिक जवळच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी फळे झाडावरच लाल रंगाची झाल्यावर काढणी करवी.

४) पूर्ण पक्क अवस्था - या अवस्थेत फळ झाडावरच पूर्ण पिकून लाल रंगाचे किंचित मऊ असते. अशी फळे केचअप, सॉस, सूप, चटणी वगैरे तयार करण्यासाठी उपयुक्त असतात.

काढणीनंतर फळांची प्रतवारी करून फळे करोगेटेड बॉक्सेसमध्ये १ कि.ग्रॅ., २ कि.ग्रॅ. वजनाचे भरून पॅकिंग करावे.

उत्पादन - उत्तम मशागत व व्यवस्थापन असल्यास प्रत्येक चेरी टोमॅटो झाडापासून प्रत्येक फळ सरासरी १५ ग्रॅमचे अशी ४०० फळे मिळतात. म्हणजेच एका झाडापासून विक्रीलायक सरासरी ५ कि.ग्रॅ. फळे मिळतात. एक एकरातून सरासरी ३० ते ३३ मे. टन फळांचे उत्पादन मिळते

Related Articles
more...