बागायती कापसाची लागवड
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
बागायती कापसाची प्रथम निरा, फलटण भागामध्ये (निरा डावा व उजव्या कालव्याच्या क्षेत्रामध्ये
) करण्यात आली. मार्च महिन्यात लागवड केलेल्या वरलक्ष्मी जातीच्या कापसाला ३०० बोंडे
लागालेली होती. कोरडवाहू कापसाला मात्र १० ते १५ बोंडे निघत असत, त्याचप्रमाणे Y-1,
जरीला जातीचा कापूस टाक्या रोगाला बळी पडत असे, उत्पन्न अतिशय कमी महणजे एकरी १ ते
२ क्विंटल निघत असल्याने भारतामध्ये प्रथम कर्नाटकात बागायती कापसाच्या लागवडीत यश
मिळाले. या यशस्वी प्रयोगानंतर महाराष्ट्रामध्ये ३० वर्षापूर्वी तेथून बी आणून, पिशव्यात
रोपे तयार करून निरा - उजवा, डावा कालवा क्षेत्रामध्ये मार्च महिन्यामध्ये अक्षय्यतृतियेला
लागवड पूर्ण करण्यात आली. हा भाग दुष्काळी असल्याकारणाने पावसाळ्यात फुलावर येऊनही
पाऊस कमी असल्याने बोंडांची संख्या थोडी कमीच राहिली. शिवाय मर होत असे. हा कापूस ऑगस्टमध्ये
तयार होत असतो.
निरा, फलटण भागातून ३ वस्तु भारतात सर्वप्रथम मार्केटला येतात. त्या म्हणजे १) गुळ, २) कांदा, ३) कापूस . ह्या वस्तु जून - जुलैमध्ये भारतात प्रथम मार्केटमध्ये येतात. यातच कापूसही येतो व येथूनच पुढे बागायती कापसाची लागवड सुरू झाली.>
कापूस लागवडीचे महत्त्व :
कापसाची लागवड उसापेक्षा नक्कीच फायदेशीर आहे. कारण यामध्ये रक्कम तरी एकावेळेस, एकजीनसी मिळण्याची खात्री असते. टप्पे नसतात. उसाचे एकरी ३० टन उत्पन्न धरले तरी १,००० ते १४०० रू टनाने जास्तीत - जास्त ४०,००० रू. मिळतात. शिवाय खर्च अधिक, ऊस तोडोन नेणार याची शाश्वती नाही. त्यामानाने कापूस हे हुकमी पीक असल्याने. बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असल्याने कापसाच्या लागवडीकडे शेतकरी वळू लागले. परंतु खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती, अनावश्यक होत चाललेले रोगट झाड, कापसाला दोन महिने पडणारा ताण ह्यासारख्या समस्या आहेत. यावर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने मात करता येते.
खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये कापूस हे पारंपारिक पीक असल्यामुळे कापसास कमी अधिक भाव मिळाला तरी हे पीक शेतकरी करीत असतात.
जाती : सुधारित जातीमध्ये -२, राशी -११, सावित्री, ब्रम्हा तसेच अलीकडे नांदेड -४४, अजित व महिको कंपनीच्या जाती प्रचलित आहेत.
लांब धाग्याच्या सीओ -२ जाती प्रसिद्धा असून वरलक्ष्मी, सावित्री, एच -४,५,६ ह्या जातीही हल्लीच्या काळात प्रसिद्ध असून अशा जातींची पाने तांबुस पडत असली तरी उत्पन्नास त्या चांगल्या असल्या कारणाने वेगाने प्रचलित होत गेल्या.
जमीन : सर्वसाधारणपणे या विकास काळी, भारी जमीन मानवते असे आजपर्यंतच्या अनुभवावरून सिद्ध आहे. म्हणून जी जमीन कापसास मानवते त्या जानिनीस भारी काळी कापसाची जमीन ( Black Cotton Soil) असे म्हटले जाते. अशा जमिनीत एकदा बी पेरले की, पावसाच्या पाण्यावर हे पीक हमखास येते. परंतु जसजशा कापसाच्या लवकर येणार्या, भरपूर उत्पन्नाच्या संकरित जाती विकसित झाल्या, तसतसे हे पीक मध्यम, करड्या, हलक्या जमिनीमध्ये देखील अनेक राज्यांच्या विविध भागात घेतले जाऊ लागले आणि सध्या हे पीक बागायती झाल्याने चांगले उत्पन्नही येते.
हवामान : उष्ण व दमट हवामान कापूस पिकास मानवते. थंडीचे हवामान या पिकास मानवत नाही. ढगाळ हवामानामध्ये, झिमझिम पावसामध्ये, फुलपगडी, पात्यांची गळ होत असल्यामुळे तसेच फुलपगडी, पात्यांचे पक्क्या बोंडामध्ये रूपांतर होतात कापसाची कवडी होते यामुळे प्रचंड नुकसान होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांनि अशा समस्येवर मात करता येते. शिवाय कापसाला चकाकी, शाईनिंग येते. बोंडे भरपूर लागतात. कापूस पांढरा शुभ्र चमकदार मिळतो.
पेरणीपुर्वीची प्रक्रिया : काळ्या जमिनीमध्ये जेथे तूर, कापूस असे सोटमुळवर्गीय पीक घेतले जाते, तेथे हमखास कापसाची मर ( Wilt) ही Fusarium Oxysporium Disinfectant मुळे बाल्यावस्थेत होते. ही मर टाळण्यासाठी तसेच बियांची उगवण शक्ती वाढून उगवण लवकर होण्यासठी 'जर्मिनेटर' ह्या औषधाचा वापर करावा. त्यामुळे पात्यांची चांगल्या प्रकारे फुट होते व कपाशीचा खोडवादेखील घेता येतो. ह्यासाठी पेरणीपुर्वीची प्रक्रिया करतेवेळी १ किलो बी + २५ मिली जर्मिनेटर + २० ग्रॅम प्रोटेक्टंट या प्रमाणात शेणकाल्यामध्ये मिश्रण घेऊन रात्रभर बी भिजवून ठेवावे व नंतर बी पेरल्यास बियांची उगवण ९० -९५ टक्के व नेहमीपेक्षा २ -३ दिवस लवकर होते, तसेच उगवणीनंतर रोपांची मर होत नाही.
एकरी बियाणे पेरणीची योग्य वेळ व अंतर:
बागायती लागवडीसाठी कापसाचे एकरी १।। किलो बियाणे पुरेशे होते. लागवड सर्वसाधारण ३' x ३' ते ४' x ४' अंतरावर जमिनीच्या मगदुरानुसार करावी. अनुभवाअंती बागायती कापसाची लागवड आधुनिक कृषी तंत्रज्ञान वापरून अक्षय्यतृतियेला पूर्ण करणे उत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
पाण्याची उपलब्धता कमी असणार्या भागात मृग नक्षत्रामध्ये हमखास पाऊस पडेल की नाही याची खात्री नसते. अशीरात अशीरा ' आर्द्रा' नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये पेरणी करावी, त्यानंतर पेरणी करणे हितावह नाही. जत, आटपाडी, कवठे महांकाळ, राहुरी, निरा, फलटण, बारामती, सांगोला, सोलापूर या भागांमध्ये या पिकाची लागवड मार्च / एप्रिल महिन्यामध्ये करण्यात येउन पहिली वेचणी ऑगस्ट / सप्टेंबर महिन्यात सुरू होते. कारण या भागामध्ये यावेळेस पाऊस नसल्यामुळे वेचणी सुखकर होते. मार्च महिन्यातील लागवडीची ऑगस्ट महिन्यात वेचणी केली जाऊन नोव्हेंबर - डिसेंबरपर्यंत ७ ते ८ वेचण्या पूर्ण होतात. इतर भागामध्ये या कालावधीत जोमाने पाऊस पडत असल्याने मार्च महिन्यातील लागवड करीत नाहीत.
कापसाची रोपे पिशव्यात करण्यास सावलीची गरज असते. ग्रीन हाऊसची गरज नाही. वाडाच्या झाडाखालची माती, चिमूटभर कल्पतरू सेंद्रिय खत टाकुन पिशव्या भराव्यात,म्हणजे रोपांची वाढ चांगली होते.
रोपे कोवळ्या उन्हात ठेवावीत. डायरेक्ट लागण करू नये. कारण शॉक बसण्याची, रोपे मरण्याची शक्यता असते. आठ - दहा दिवस जागा बदलून सावलीत ठेवावीत व नंतर संध्याकाळी ४ x ४ फुटावर लागवड करावी. लागवड चौफुलीवर करावी. म्हणजे मशागत करताना औत चालविता येते. बायांची मजुरी व वेळ वाचतो. कारण एक बाई चालविता येते. बायांची मजुरी व वेळ वाचतो. कारण एक बाई एका तासात एक वखरच करते. चौफुलीवर लागवड केल्यास औत १ ते २ पाळ्या चालेल व मजुरीवर पर्याय उभा राहील.
खते :जमिनीस नुसते शेणखत टाकण्यापेक्षा शेणखताबरोबर कल्पतरू सेंद्रिय खत मिसळून सरीमध्ये, दोन तासामध्ये (वखरामध्ये टाकलयास पीक व्यवस्थित येते. यासाठी एकरी दोन टन शेणखत व १०० किलो कल्पतरू खत पुरेसे होते. या खतास " सुपर डायजस्टेड सेंद्रिय खत " म्हणतात. जे चांगले लागू पडते. म्हणून कापसासाठी ते आवश्यक आहे. काळ्या जमिनीमध्ये पालाशयुक्त खते वापरण्याची गरज नाही. परंतु भेंडीवर्गीय पीक की जी सोटमूळ वर्गातील आहेत, अशा ठिकाणी मात्र पालाशचा उपयोग होतो. काळी जमीन मॉन्टमोरलिनाईट ( Montmorillinite type of clay ) प्रकारतील असल्यामुळे स्वाभाविकच पोटॅशचे प्रमाण जास्त असते व पोटॅशसाठी देशाला परकीय चलन मोजावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या खताचा आग्रह कमी धरावा. तथापि संकरित कापसाच्या जाती ह्या करपा, लाल्या,ताक्या, दहिया या रोगांस बळी पडून पाने तांबूस पडतात. कॉटन थ्राईवरच्या फावणीमुळे पीक वरील रोगापासून बचावते. वरखतामध्ये शक्यतो नत्र व स्फुरदयुक्त डी. ए. पी. (१८:४६) हे मिश्रखत द्यावे. असे खत महिन्या - महिन्याच्या अंतराने साधारण खुरपणी झाल्यानंतर इकडं व नंतर दोन महिन्यांनी एकदा असे दोन ते तीन वेळेस खत दिल्यास झासांची वाढ झपाट्याने होऊन फुलपात्या बऱ्यापैकी लागतात.
कल्पतरू सेंद्रिय खत वापरण्याचे वेळापत्रक
२५ ते ३० किलो / एकरी लागवडीच्या वेळेस बियांबरोबर देऊन नंतर ७० -८० किलो / एकरी लागवडीनंतर ३० दिवसांनी सरीमधून आळ्याभोवती खुरपण झाल्यावर कल्पतरू खताची मात्रा वाफश्यावर द्यावी, म्हणजे उष्णतेच त्रास पिकास होणार नाही.
पाणी : बागायती पिकांस दर ८ दिवसांनी पाणी द्यावे. पाणी चूळ भरून, ठिबकने किंवा दांडाने द्यावे. या कापसामध्ये आंतरपीक म्हणून धना ( कोथिंबीर ) पुंजक्याने करता येईल. उगवणीस जर्मिनेटरचा वापर करावा. धना उगवून आल्यानंतर २ -३ दिवसांनी पाणी द्यावे. म्हणजे पाणी देताना पाणी साचणार नाही व साचलेले पाणी तापणार नाही.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत फवारणीचे वेळापत्रक -
१) पहिली फवारणी -(उगवणीनंतर १५ ते २१ दिवसांनी ) - २५० मिली जर्मिनेटर + २५० मिली कॉटन थ्राईवर + २५० मिली क्रॉंपशाईनर + १०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १०० मिली प्रिझम +१०० लि. पाणी.
२) दुसरी फवारणी - ( ३० ते ४० दिवसांनी)- ५०० मिली जर्मिनेटर + ५०० मिली कॉटन थ्राईवर + २५० मिली क्रॉंपशाईनर + २५० ग्रॅम प्रोटेक्टंट + २५० मिली प्रिझम +१५० लि. पाणी.
३) तिसरी फवारणी - ( ६० ते ७० दिवसांनी ) - ७५० मिली कॉटन थ्राईवर + ७५० मिली क्रॉंपशाईनर + ५०० मिली राईपनर + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + ५०० मिली प्रिझम + ५०० मिली न्युट्राटोन + २०० लि. पाणी.
चौथी फवारणी - ( ८० ते ९० दिवसांनी ) - १ लिटर कॉटन थ्राईवर + १ लिटर क्रॉंपशाईनर + ७५० मिली ते १ लिटर राईपनर+ ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + ७५० मिली न्युट्राटोन + २०० लि. पाणी.
(वरील तंत्रज्ञानाने कपाशी लागवडीचे अनुभव
अंमळगांवमध्ये (जि. जळगाव ) डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचे प्लॉट पाहण्यासाठी भेट दिली असता असे आढळून आले की, ज्यावेळेस जून, जुलै महिन्यात कपाशीची पेरणी होते, तेव्हा कापसाच्या बियांस जर्मिनेटरची प्रक्रिया केली असता पावसाचा ताण सहन होऊन मर होत नाही. वीतभर किंवा पोटरीच्या खाली कापसाची उंची झाल्यावर इतर खत न टाकता कल्पतरू सेंद्रिय खत चिमूटभर प्रत्येक रोपास टाकल्यानंतर रोपे कणखर होतात. यानंतर २ ते ३ पाऊस होतात. या पावसाच्या असलेल्या ओळीवर कपाशी गुडघ्याचे वर उंचीची होते आणि पावसाचा ताण बसतो व हा ताण बसल्यावर उपाय म्हणून ८ दिवसाचे अंतराने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या ३ ते ४ फवारण्य केल्या व या कालावधीत थोडा पाऊस पडल्यानंतर पालवी काळीशार, पाने रुंद, लव जादा असलेली, टणक राहिल्याने कपाशीस लाल्या, दहिया, करपा टाक्या हे रोग आलेले नाहीत. अगदी लहान वय असताना फुले, पात्या लागण्यास सुरुवात होते. नंतर जो एक महिन्याचा पावसाच ताण बसतो तो ताण ह्या फवारण्यांनि सहन केला जातो. या काळामध्ये एक वेळेस लागणीच्या सुमारास आणि ओल पूर्ण पाहून दोन वेळेस कल्पतरू खत वापरले होते. हे सर्व तंत्रज्ञान वापरल्याने बोंडे (पक्क्या) कैर्या भरपूर लागल्या. याचे विरुद्ध कपाशीस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे व कल्पतरू खत न वापरलेल्या प्लॉटसची कपाशी खुंटलेली, सुकवा भरलेली, फुलपगडी पूर्ण गळालेली आहे. कैर्या तुरळक, बोंडांची संख्या फक्त ५ ते १० दिसून आली. रसायनिक खते वापरल्यामुळे पाने हिरवी पण मऊ होती. त्यामुळे किडींचा पादुर्भाव काही प्रमाणात जादा होता.पंचामृत, प्रिझम, न्युट्राटोन औषधांचा वापर केलेल्या कपाशीस कीड तुरळक होती, तीही कार्बारील व प्रोटेक्टंट प्रमाणात फवारल्याने आटोक्यात आली.
फुलपगडी वाढण्याच्या अवस्थेत थंडी व आभाळ जास्त असल्यास फुलपगडी गळण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे मावा, तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव कापसावर मोठ्या प्रमाणात होतो. परंतु ज्या शेतकर्यांनी कापसाकरीता सुरूवातीपासून ' प्रोटेक्टंट' चा वापर केला आहे, तेथे या किडीचा पादुर्भाव कमी असतो. सतत दोन महिने थंडीची लाट राहिल्यास जी पक्व कैरी आहे तेथे या किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो. तसेच सूर्यप्रकाश, ऊन, उष्णता कमी मिळून सूर्य प्रकाशाचा कालावधी (Photoperiodism) आठ तासापेक्षा कमी राहिल्याने पक्क कैरी उमलत नाही, बोंड अळीस बळी पडते, पाने अरुंद, आखुडलेली राहतात. झाडाचे पोषण व्यवस्थित न झाल्याने झाड खुजे राहून वाढ खुंटते. बोंड अपक्व राहून कापूस मजुरांकडून वेचला जात नाही. कापूस बेचातानाना हाताच्या बोटांना व नखांना त्रास होतो व मग असा कापूस हा कमी उमललेला, थोडा ओलसर आखूड धाग्याचा, बोंडात पिवळा रंग, ओलसर, किडयुक्त राहतो. आतील बी सुरकुतलेले अपक्क्व, कमी तेलाचे प्रमाण राहून अशा कापसास 'कवडी' कापूस म्हटले जाते व या कापसास अतिशय कमी भाव मिळतो. ही अवस्था टाळण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर करावा. त्यामुळे पानांची वाढ चांगली होते. शेंड्याकडील असणार्या बोंड व फुलपगडीतील विकृती थांबते.
फवारणी खालीलप्रमाणे करावी-
कॉटनथ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ७५० मिली + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली + न्युट्राटोन ५०० मिली + स्ट्रेप्टोसायक्लीन ३ ग्रॅम + १०० लि. पाणी व आवश्यता भासल्यास कार्बारील वापरावे. अशी फवारणी करून ३ ते ४ वेचण्या पूर्ण कराव्यात. ह्यामुळे कापसाची कवडी होणार नाही. खोडवा घ्यायचा झाल्यास फांद्या छाटून कल्पतरू आळ्यावर टाकून घ्यावे व पंचामृत, पिझम, न्युट्राटोन ५०० ते ७५० मिलीची प्रती १०० लिटर पाण्यातून या प्रमाणात फवारणी करावी. नंतर खत देऊन मातीची भर द्यावी व पाणी वरील उल्लेखाप्रमाणे द्यावे.
वेचणी : साधारणत: पहिली वेचणी दसरा ते दिवाळीच्या दरम्यान सुरू होऊन शेवटची वेचणी डिसेंबरपर्यंत पूर्ण होते. वेचणी पुर्ण झाल्यानंतर राहिलेल्या कैर्या काढून सुकवाव्यात. कॉटन थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर ही औषधे वापरल्यास बोंडांची वाढ झपाट्याने होते. बोंडामध्ये कापूस भरगच्च व वजनदार भरतो. त्यामुळे कापसाच्या वजनात वाढ होऊन उत्पादन अधिक प्रमाणात मिळते. तसेच कापसाची कवडीही होत नाही. माल लवकर तयार होतोच, तसेचे ती वेचण्यांमध्येच पीक मोकळे होऊन पुढील पिकास रान लवकर वापरता येते व तीनही वेचानीचा कापूस एकसारखा व चांगल्या प्रतीची मिळतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे खोडवा सुद्धा परत घेता येतो. तीन ते चार वेचण्या साधारण डिसेंबरपर्यंत पूर्ण होतात. तथापि शेतकरी पुढे तीन ते चार महिने (मार्च / एप्रिलपर्यंत) पळखाट्या शेतात विनाकारण उभ्या ठेऊन शेतीचा कस, पाणी वाया घालवितात, हे चुकीचे असून न परवडणाने आहे. तरी वेचणी पूर्ण झाल्यावर डिसेंबरमध्ये थंडीतच पाळखाट्या उपटून, शेताची नांगरट करून दुबार पिकासाठी अथवा पुढील खरीप हंगामासाठी जमीन तयार करून ठेवावी.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पहिल्या फवारणीत दसरा - दिवाळीला कापसाची पहिली वेचणी येईल, दुसर्या फवारणीत कापूस डिसेंबरला येईल. तिसर्या फवारणीमुळे कापसावर करपा, टाक्य येत नाही. ढगाळ हवामान, झिमझिम पावसामुळे पात्या, फुलांचे पक्या बोंडात रूपांतर होताना कापसाची जी कवडी होते ती पंचामृत, प्रिझम, न्युट्राटोन या औषधांमुळे होणार नाही.
उत्पादन : बागायती कापसाचे एकरी १२ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते.
व्यवस्थित काळजी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वेळेवर, योग्य वापर केल्यास बागायती कापसाचे एकरी २२ क्विंटलपर्यंत उत्पादन घेत येते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून याचा अनुभव जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनि घेतलेला आहे, तसेच त्यांनी या तंत्रज्ञानाने कापसाची फडदड (खोडवा) देखील घेऊन त्यापासून समाधानकारक (एकरी ५ ते ८ क्विं.) उत्पादन घेतले आहे.
प्रक्रिया उद्योग : कापसाच्या संपूर्ण वेचण्या झाल्यानंतर ज्या पळखाट्या तयार जमिनीत उभ्या असतात. त्यांचा उपयोग बरेचशे शेतकरी जळण म्हणून करतात. त्याऐवजी अशा काड्या, कागद, ब्लॅक बोर्ड ( प्लायवूडकरीता) तयार करण्यासाठी केल्यास निश्चितच प्रचंड फायदा होऊ शकतो. मात्र यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे कुटीरोद्योगामध्ये या काड्याचा उपयोग संत्री - मोसंबीसारख्या फळांसाठी करंड्या, टोपल्या तयार करण्यासाठीदेखील केला जातो. तसेच कापसाच्या नफ्टीचा ( कापूस वेचल्यानंतर) उपयोग एअर कुलर्समध्ये करतात.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कापसाचे निरोगी पीक, फुलपात्या भरपूर
दीपक राजाभाऊ कदम, म. पो. बायफणी, ता. माहूर, जि. नांदेड. फोन - ९४२३७२७२९१
मी मध्यम प्रतीच्या १० एकर जमिनीमध्ये १५ जूनला ४' x २' वर बी टी राशी -२ आणि कनक बी टी -२ बियाण्याची उगवणशक्ती ९९% झाली. निघणारा अंकूर टवटवी व सरळ, मोठा जोमदार निघाला. नंतर पंधरा दिवसांनी 'तुळजाई कृषी सेवा केंद्र ' सारखणी यांच्या सल्ल्यानुसार मी जर्मिनेटर, कॉटनथ्राईवर, क्रॉंपशाईनर या औषधांची पहिली फवारणी केली.
त्या फवारणीमुळे कापूस निरोगी व चांगला वाढीला लागला, तसेच खोडापासून फांद्या फुटू लागल्या. नंतर ३० दिवसांनी कॉटन थ्राईवर व क्रॉंपशाईनरची दुसरी फवारणी केली. त्यामुळे कापसाची वाढ झपाट्याने होऊ लागली. कोणत्याही प्रकारचा रोग कापसावर दिसत नाही. नंतर तिसरी फवारणी कॉटन थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनरची ४५ दिवसांनी केली. शेजाऱ्याने या औषधाऐवजी दुसऱ्या औषधांचा वापर केला, तर त्याच्या कापसावर लाल्या व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. माझा कापूस मात्र सप्तामृत औषधाच्या वापरामुळे माझ्या गावामध्ये एक नंबरचा आहे. फुलगळ, पातीगळ व लाल्या रोग असा कुठलाही प्रकार दिसत नाही. प्लॉट जोमदार असून निश्चितच दरवर्षीपेक्षा अधिक उत्पादन मिळेल असे प्लॉट पाहताच जाणवत आहे. कारण फांद्या अधिक फुटून झाडांचा विस्तार वाढला आहे, तसेच प्रत्येक फांदीवर फुलापात्या व बोंडाची संख्या नेहमीपेक्षा जास्त आहे.झाडे सशक्त असल्याने बोंडांचे पोषण होऊन सरांनी सांगितल्याप्रमाणे 'ए' ग्रड दर्जाचे उत्पादन मिळेल असे वाटते.