क्रॉपशाईनर

हवामान रोज बदलत असते. एकाच दिवशी सकाळी थंडी, धुके, धुई, सुरकी, दुपारी कडक ऊन, संध्याकाळी ढगाळ हवा व झिम-झिम अथवा धो-धो पाऊस यातील एका सहा तासाच्या सलग काळात वरील प्रकारापैकी दोन किंवा त्याहून अधिक वातावरणाच्या प्रकारांना पिकास तोंड द्यावे लागते. त्यामुळे कांदा, बटाटा, वाटणा, मिरची, ढोबळी, डाळींब, द्राक्षे, स्ट्रॉबेरी अशा अनेक पिकांवर या खराब हवेचा विपरीत परिणाम नकळत होतो. प्रत्यक्षात हवेचा वाईट परिणाम पिकावर दिसण्याअगोदर दोन दिवसापासून ते वीस दिवस अगोदर निरनिराळ्या रोगांची लागण पिकावर झालेली असते. ती आपणांस दोन ते वीस दिवसांनी लक्षात येते. उदा. कांद्यावरील ताक्या दोन दिवसात दिसतो. टोमॅटोवरील करपा साधारण वीस दिवसांनी समजतो.

या सर्व प्रकारांना आळा बसावा म्हणून क्रॉंपशाईनर हे अतिशय प्रभावी असे पीक संरक्षक आहे.
कोण-कोणत्या पिकांसाठी क्रॉंपशाईनर वापरता येते?

फळभाज्या: टोमॅटो, भेंडी, वांगी, कांदा, बटाटा, गाजर, कोबी, फ्लॉवर, वाटाणा, मिरची, ढोबळी, काकडी, गवार, मुळा, बीट, आले, हळद.

फळे: द्राक्षे, डाळींब, स्ट्रॉबेरी, केळी, पपई, सिताफळ, चिकू, पेरू, आंबा, नारळ, संत्री, मोसंबी, लिंबू, अंजीर, कलिंगड, खरबूज.

पालेभाज्या: शेपू, पालक, चुका, चाकवत, करडई, मेथी, कोथिंबीर, तांदुळजा, पोकळा, माठ, चवळई, पुदीना, चंदनबटवा.

सर्व प्रकारची फुलझाडे: गुलाब, अॅस्टर, गलांडे, गुलाछडी, झेंडू, शेवंती, मोगरा, चमेली, सर्व निर्यात फुले, दचगुलाब, कार्नेशन, जर्बेरा.

क्रॉपशाईनरचे फायदे

 • पांढर्‍याशुभ्र, वजनदार, कापसासाठी, हवामानावर मात करून बाजारभावात वाढ.
 • पाने सतेज व टवटवीत, टणक राहिल्याने वाईट हवेचा दुष्परिणाम पिकावर होत नाही.
 • फळभाज्या, पालेभाज्या, फळे यांना चकाकी येते.
 • फळांना विकृती येत नाही.
 • फळे टणक व जाड सालीची बनतात, त्यामुळे ट्रान्सपोर्टमध्ये खराब होत नाहीत.
 • रासायनिक खते व इतर सर्व औषधांच्या खर्चात लक्षणीय कपात (बचत) होते.
 • पिकांची दर्जा सुधारण्यास मदत होते.
 • क्रॉंपशाईनर म्हणजे वाईट हवामानात पिकांचा नुसता विमाच नव्हे तर बोनस होय.
कॉटन थ्राईवर वापरण्याचे प्रमाण

 • बी वाफ्यावर टाकल्यावर प्रतिकूल परिस्थितीत उगवणीसाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १० मिली १० लिटर पाण्यातून दर २ ते ४ दिवसांनी झारीने वाफश्यावर द्यावे. म्हणजे सर्व रोपे लवकर उगवून येतील. नंतर ५ ते ७ दिवसांच्या अंतराने क्रॉंपशाईनर १०, २०, ३० मिली सप्तामृतातून १० लिटर पाण्यातून २ ते ३ वेळा फवारल्यास रोपे १७ ते २१ दिवसांत लागवडीस येतात.
 • फळभाज्या: फळभाज्याची रोपे वरीलप्रमाणे तयार झाल्यावर (जर्मिनेट, प्रोटेक्टंटमध्ये बुडवून) लागवडीनंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने अनुक्रमे ३००, ४००, ५०० मिली क्रॉंपशाईनर १०० लिटर पाण्यातून ३ - ४ वेळा सप्तामृतातून फवारावे.
 • पालेभाज्या: पालेभाज्यांना आठवड्याच्या अंतराने सप्तामृतामध्ये क्रॉंपशाईनर अनुक्रमे २००,३००, ४०० मिली १०० लिटर पाण्यातून फवारावे.
 • फळझाडे: फळझाडांना सर्वसाधारणपणे १ महिन्याच्या अंतराने सप्तामृतातून अनुक्रमे ३००, ४००, ५००, ६०० मिली क्रॉंपशाईनर १०० लिटर पाण्यातून ४ - ५ वेळा फवारावे.
अधिक माहितीसाठी माहितीपत्रक (फवारणीपत्रक) पाहावे, तसेच आमच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांशी संपर्क साधून सल्ल्यानुसार वापर करावा.

दक्षता: हवा, वातावरण सर्वसाधारण बरे असल्यास हे प्रमाण वापरावे. हवा अतिशय खराब असल्यास (धुक्यात दिवसा लाईट लावून गाड्या चालवाव्या लागतात, अशा हवामानात) थ्राईवरचे प्रमाण तेच ठेवून क्रॉंपशाईनरचे थोडे प्रमाण वाढवावे. प्रत्यक्ष झाडांनी पाने, फुले, फळे पहावीत व त्याचप्रमाणात फवारणी करावी. अशा पद्धतीने फवारणी केल्यास एक महिना कोणतीही खते न लागता पीक व्यवस्थित राहू शकते, कारण बेवड व अगोदरचे पिकांस दिलेल्या खतांचा अंश जमिनीत असतो. त्यावर एक महिन्यापर्यंतची पिके व्यवस्थित राहू शकतात. खुरपणी झाल्यावर व वरीलप्रमाणे फवारणी झाल्यावर पुढील खते द्यावीत. नत्र, स्फुरद व पालाशा हे घटक असलेली मिश्रखतेच फक्त द्यावीत. एक वा दोन घटक असणारी खत देवू नयेत. त्यासाठी कल्पतरू सेंद्रिय खत वापरणे फायदेशीर ठरते.