डाळींबाच्या २५ महिन्याच्या ४०० झाडांवर प्रत्येकी १५ किलो माल, भाव ९७ रू. किलो, पहिल्याच वर्षी ३ लाख २५ हजार रू. उत्पन्न

श्री. संतोष पुंजाराम काकुळते, मु. पारनेर, ता. सटाणा, जि. नाशिक. मोबा. ८६०५३९७५६७

मी भगवा डाळींबाची ४०० झाडे मध्यम प्रतीच्या जमिनीत १० x १२' अंतरावर लावून १८ महिने झाले होते. या बागेला ठिबक केलेले आहे. बागेचा पहिला बहार मार्चमध्ये पाणी तोडून १५ एप्रिलमध्ये पहिले पाणी दिले. छाटणीनंतर प्रत्येक झाडास १० :२६ - ५०० ग्रॅम, शेणखत १५ किलो, सुपर फॉस्फेट ५०० ग्रॅम याप्रमाणे खते देऊन १५ एप्रिलला पानगळ केली व २५ एप्रिलला पहिले पाणी दिले. वरून काडीवर व झाडाच्या जाड फांद्यांना (बुंध्याच्या) माल लागण्यासाठी जर्मिनेटर ५ मिली/ लि. प्रमाणे फवारले. त्याने एकसारखे डोळे निघाले. नंतर १२ दिवसांनी दुसरी फवारणी थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येक ५ मिली/ लि. प्रमाणे फवारले. त्याने पानांची कॅनॉपी व फुलकळी जीमदार मिळाली. पाण्याचे प्रमाण एक दिवसाड १ तास (८ लि.) दिले.

केन निघाले नाही. शेंडा थांबविता आला त्यानंतर पुन्हा १५ दिवसांनी थ्राईवर, क्रॉंपशाईनर फवारले. त्यामुळे फुलगळ न होता त्याचे रूपांतर फळांत झाले.

सेटिंग झाल्यानंतर म्हणजे वरील फवारणीनंतर साधारणत: २० ते २१ दिवसांनी थ्राईवर आणि न्युट्राटोन फवारले. त्यामुळे फळांची साईज वाढण्यास मदत झाली. झाड तजेलदार होऊन फळांना शाईनिंग आली.

त्यानंतर २१ दिवसांनी फक्त न्युट्राटोनची फवारणी केली, त्यामुळे फळांची साईज २५० ते ३०० ग्रॅम मिळाली व सनबर्निंगचा प्रादुर्भाव झाला नाही. शेवटच्या एक महिन्यामध्ये राईपनरच्या दोन फवारण्या केल्या. त्याने मालाला कलर, फुगवण, वजन चांगल्याप्रकारे मिळाते.

या पुर्वीच्या डाळींब बागेत असे उत्पन्न कधीही मिळाले नाही. या मालाची काढणी १० नोव्हेंबर २०११ ला केली. ४०० ते ४५० ग्रॅमची साईज मिळाली. विक्री जागेवर व्यापार्‍यांनी ९७ रू. /किलो प्रमाणे ३ टन आणि उर्वरित माल लोकल मार्केटला १६०० रू./ क्रेट म्हणजे ८० रू. किलोप्रमाणे विकला. तर पहिल्याचे बहाराचे ४०० झाडापासून ३ लाख २५ हजार रू. उत्पन्न मिळाले. याला एकूण खर्च ३० ते ३५ हजार रू. आला. यातील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर ५ ते ६ हजार रू. खर्च केला. मध्यंतरी किटकनाशक, बुरशीनाशक फवारावे.

Related Articles
more...