४ वर्षाची बाग प्रत्येक झाडावर ३ क्रेट माल भाव ५६ रू. किलो

श्री. हरिश्चंद्र पंडीत आहेर,
मु. पो. सुभाषनगर , ता. देवळा, जि . नाशिक - ४२३१०२.
फोन (०२५९२) २८२३३६



माझ्याकडे ६ एकर भगवा डाळींबाची बाग आहे. लागवड २००१ सालातील असून सर्वसाधारणपणे ५ ते ६ फूट उंचीची झाडे आहेत. एका झाडावर सरासरी १७ ते १८ किलो एवढाच माल निघतो. माल मुरादाबादचे व्यापारी श्री. इश्फाक खान यांच्याकडे ३५ रू. किलोप्रमाणे विकला. कारण आमच्या डाळींबाला फुगवण कमी, शाईनिंग कमी तसेच वजन आणि गोडी कमी होती.

परंतु बागलाण तालुक्यातील माजी आमदार श्री. दिलीप बोरसे यांच्या बागेला जेव्हा मी भेट दिली, तेव्हा त्यांची बाग बधून मी व माझे चार सहकारी आश्चर्यचकित झालो. कारण त्यांच्या एका झाडापासून (झाडाचे वय ४ वर्ष) ३ क्रेट माल ( १ क्रेट = २५ ते ३० किलो) निघत होता. तसेच फळांची क्वालिटी उत्तम असून सरासरी वजन ६०० ते ७०० ग्रॅम एवढे होते. तसेच त्यांच्या मालाला फुगवण, गोडी अधिक होती. जसे लाईटमध्ये झुंबरातील मणी चमकतात तसे उन्हात डाळींब चमकत होते. आम्ही ज्या व्यापार्‍याला माल विकला त्यानेच त्यांचा माल ५६ रू. किलोप्रमाणे खरेदी केला आणि इतर तीन व्यापार्‍यांना सुद्धा माल जात होता.

तसेच त्यांच्या बागेत अजून एक अनुभवायला मिळाले की, त्यांच्याकडील दररोज २५ मुले माल तोडतात आणि मालाच्या वाहतुकीसाठी खास २ ट्रेक्टर आहेत आणि दररोज १५ टन माल विकला जातो. मग आम्ही कुतूहलाने आमदारसाहेबांना विचारले की , 'आमची बाग ६ वर्षाची असूनही एवढे उत्पादन देत नाही आणि तुमची बाग ४ - ५ वर्षांची असून एवढे उत्पादन देते. हे कसे ? तेव्हा त्यांनी सांगितले की , "मी सप्तामृत औषधे (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट,प्रिझम, न्युट्राटोन) तसेच कल्पतरू सेंद्रिय खत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरले त्यामुळेच हे शक्य झाले."

तेव्हा मी सरांच्या नाशिक व सटाणा कृषी विज्ञान केंद्रातून माहिती घेऊन आज (दि. १.१२.२००६) रोजी सरांना भेटायला पुणे ऑफिस येथे आलो आणि सरांना सांगितले की, आमच्या गावात २१ जणांचे ' श्रीराम शेतकरी मित्र मंडळ ' या नावाचे मंडळ आहे. आम्ही पाच जणांनी आमदार साहेबांची बाग बघितली आणि आमच्या मंडळातील १६ शेतकर्‍यांना ही माहिती दिली, तेव्हा त्यांचा आमच्यावर विश्वास बसला नाही. आम्हीसुद्धा बाग बघितली नसती तर आमचाही विश्वास बसला नसत. पण आता ही गोष्ट मनाला पटण्यासारखी असून ते सत्य आहे, असे सरांना सांगितले तेव्हा सर म्हणाले, 'हीच तर कृषी विज्ञानातील क्रांती आहे, तसेच सरांशी चर्चा करून अमूल्य ज्ञान मला प्राप्त झाले आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आणि आमचे 'श्रीराम शेतकरी मित्र मंडळ ' सरांचे तंत्रज्ञान सप्तामृत आणि 'कल्पतरू' सेंद्रिय खत वापरणार आहे.