भगवा (शेंदरी, अष्टगंधा), आरक्ता, गणेश जातीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घडविलेली क्रांती

श्री. सुधाकर शामराव पवार,
मु.पो. वाल्हा, ता. पुरंदर, जि. पुणे,
फोन : (९५२११५) २८४३९७



डाळींब - आरक्ता, क्षेत्र - १ एकर, लागवड - ६ वर्षापुर्वी

१ एकरमध्ये आरक्ता डाळींबाची ल्गावाद ६ वर्षापुर्वी केली. लागवडीतील अंतर १०' x १२' असून ड्रिपने पाणी देतो. झाडे दोन वर्षाची झाल्यानंतर बहार धरण्यास सुरुवात केली. दोन वर्षापासून डाळींबाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे पंचामृत वापरत आहे. दोन महिने ताण देऊन झाले जानेवारीत पाणी सोडणार आहे. कळी निघण्यासाठी १- १ महिन्याचे अंतराने ५०० मिली आणि ७५० मिली पंचामृताचा डोस वापरतो. दर १० ते १५ दिवसांनी फवारणी चालूच असते. माल पोसण्यासाठी राईपनरचे प्रमाण वाढवून घेतो. प्रत्येक झाडावर २०० फळे धरतो. जून महिन्यात डाळींब मार्केटला चालू होतात. मुंबई, वाशी मार्केटला पाठवितो. ६ नग १४० रू. पर्यंत जातात. चार महिने हा माल चालतो. तोडा चौथ्या दिवशी करतो. माल ज्ञानेश्वर कान्हुजी डोंगरे आणि महालक्ष्मी फ्रुट ट्रेडर्स (हांडे) हे दोन दलाल आहेत. त्यांचेकडे पाठवितो. ते नंतर दिल्लीला पाठवून तेथून माल निर्यात होतो.

छाटणी करण्यासाठी फलटणवरून गडी आणतो. छाटणीला एका झाडास ७ रू. घेतात. अर्ध्यातासात १ झाडाची छाटणी होते. रोगट, वाळलेल्या आणि अनावश्यक फांद्या छाटतो. छाटणी झाल्यावर पानगळ करतो. मोरचुंद, चुना, गेरू झाडाच्या बुंध्याला लावतो. मागच्या वर्षी किसान प्रदर्शनाच्या वेळेस कल्पतरू सेंद्रिय खत वापरले होते. एका झाडाला दीड ते २ किलो वापरतो. पहिले रसायनिक खत वापरीत होतो. आता हे कल्पतरू वापरत असल्यामुळे खर्च कमी येतो आणि जमिनीचा पोतही सुधारतो.