दोन वर्षाच्या ६०० डाळींबा झाडांपासून ३ लाख रू. उत्पन्न, जागेवरून माल ३५ रू. किलोने दिला

श्री. सुनिल गंगाधर देवरे,
मु.पो. वजिरखेडे, ता. मालेगाव, जि. नाशिक.
मो.९८९०३३०७९९मी २३ मे २००६ रोजी डाळींबाला पहिले पाणी दिले. त्यानंतर २ ते ३ दिवसांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सटाणा शाखेच्या प्रतिनिधींची भेट झाली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्नॉंलॉजीचा वापर करण्याचे ठरवून सटाणा शाखेतून लगेच औषधे घेऊन आलो.

पहिली फवारणी पाणी दिल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी जर्मिनेटर + थ्राईवर प्रत्येकी ५ मिली प्रती १ लि. पाण्यासाठी घेऊन वापर केला. त्यामुळे माझ्या प्लॉटची एकसारखी फुट होऊन पानांची साईज चांगल्या प्रकारे मिळाली व प्लॉटवर कोणत्याही प्रकारची विकृती नव्हती.

दुसरी फवारणी फाकील्या फवारणीनंतर १५ दिवसांनी थ्राईवर + क्रॉंपशाईनरची केली. कळी एकसारखी, मोठी व जोमदार मिळाली. पाने हिरवीगार व टवटवीत होती. त्यानंतर २० ते २१ दिवसांनी तिसरी फवारणी थ्राईवर + क्रॉंपशाईनरची केल्यामुळे माल चमकदार व पेरूच्या आकाराएवढा झाला. त्यानंतर चौथी फवारणी न्युट्राटोन + क्रॉंपशाईनरची केल्यामुळे कलर येऊन फुगवण झाली. पाचव्या फवारणीत राईपनरचा वापर केला, त्यामुळे फुगवण होऊन गोडी वाढली.

या औषधांमुळे किटकनाशक व बुरशीनाशकांचा वापर कमी प्रमाणात झाला. यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे ७० % बाग प्लेग रोगामुळे गेल्या, परंतु माझा माल शेवटपर्यंत चांगल्या प्रकारचा होता. संदर्भासाठी कृषी विज्ञान, एप्रिल २००७ कव्हरवर फोटो दिला आहे. दोन वर्षाच्या ६०० झाडांपासून जागेवरून ३५ रू. किलो दराने डाळींब जाऊन ३ लाख रू. झाले. मी नविनच क्षेत्र घेतले. आम्हाला वडिलोपार्जीत शेती नाही. त्यामुळे शेतीबद्दल कसलीही माहिती नव्हती, परंतु डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने मला चांगल्या प्रकारे माल मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. पुढील हंगामात यापेक्षाही चांगल्या प्रकारे उत्पन्न घेण्याच विचार आहे. त्यासाठी आता कल्पतरू सेंद्रिय खताच्या ५ बॅगा घेऊन जात आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळाल्याबद्दल आभारी आहे.