डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे दुष्काळावर मात करतात

श्री. साहेबराव भगवान चव्हाण,
मु. पो. शिरभावी, ता. सांगोला, जि. सोलापूर.द्राक्षाच्या बागेला जर रासायनिक औषधे वापरली आणि तीन महिने पाणी नसेल तर पूर्ण बाग होरपळून जाते. पण जर डाळींबाला तीन महिने पाणी नसेल आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांची फवारणी केली तर बागेवर कमी पाण्यामुळे होणारा धोका पुर्ण टळतो.

मावा तुडतुडे जाऊन मधमाशा घोंगावतात

अडाणी माणसानी जर कमी जास्त प्रमाणात ही औषधे वापरली तरी ह्या औषधाचा झाडाला, माणसाला काही अपाय होत नाही. शिवाय याने मधमाशा आणि फुलपाखरे झाडांच्या भोवती घोंगावत असताना दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे इतर रासायनिक औषधाचे प्रमाण थोडे जास्त झाले की, २०० किलो माल निघणाऱ्या बोरीच्या झाडांची पुर्ण गुंडीगळ होऊन अवधा ४० -५० किलो माल हाती लागतो. तर ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पंचामृत औषधे उन्हाळ्यात गारवा धरणारी आहेत, चटका देणारी नाहीत. त्यामुळे आमच्या भागात दुष्काळावर मात करण्यासाठी याचा फायदा होतो. ही औषधे फवारल्यावर रिझल्ट एवढा येतो की, इतर १७ प्रकारची औषधे वापरण्यापेक्षा या औषधावरच थोडा खर्च करून चांगले खात्रीशीर उत्पादन घेता येते. असे आमच्या भागातील लोकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे एकदा ही औषधे वापरली की, पुन्हा दुसरी कुठलीच औषधे वापरत नाहीत.

माझी भगवा डाळींबाची २ एकर, दीड वर्षाची बाग आहे. फळे साधारण लिंबाएवढी झाल्यावर श्री. कल्याण नलवडे यांचा प्लॉट पाहिल्यावर मी ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरायचे ठरवले. त्यानुसार दोन फवारण्या केल्या. ठिबक केलेली आहे. मायक्रोट्युब २ - २ आहेत. कळी सेटिंग होताना जास्त पाणी सोडले तर गुंडी गळ होते. म्हणून फळे पूर्ण तयार झाल्यावर (लिंबाच्या आकाराची झाल्यावर) ठिबक ४ तास चालवतो. तासाला १७ लिटरचा डिसचार्ज आहे. कल्पतरू खत सेटिंग झाल्यावर ५०० ग्रॅम प्रत्येक झाडास दिले. १ महिन्याने पुन्हा ५०० - ५०० ग्रॅम दोन वेळेस दिले.

एका झाडावर साधारण ८० -९० फळे धरली. त्यातील ४० -४५ फळे एक नंबर ३०० ग्रॅमच्या पुढील होती. हा माल विजय तुकाराम खैरे, मार्केटयार्ड , पुणे यांचेकडे येत होता. हायेस्ट रेट २५ रू. पासून ५० रू. किलोपर्यंत निघाले. निम्म्यातून अनुभव घेतला, म्हणून तरी ५० - ६० हजार रू. झाले. नाहीतर खर्चही निघणे अवघड झाले असते.

बहार धरताना या औषधांचा वापर केला नव्हता. त्यामुळे फळे जास्त लागली नव्हती. तरी आलेल्या मालापासून एवढे उत्पादन निघाले. म्हणून यापुढे नलावडे यांच्या बागेप्रमाणे सुरूवातीपासून वापरणार आहे. ३ महिने माल चालू होता. जानेवारी अखेरीस मालाचा माल शेवट झाला.

उम्राण बोराची ३०० झाडे ७ - ८ वर्षाची आहेत. माल बेळगावला जातो. डाळींबाला पाणी कमी लागते. मात्र बोरीला माल सुरू झाल्यावर २०० ते ४०० किलो माल झाडावर असतो, तेव्हा १०० लि. पाणी प्रत्येक झाडाला लागते. सुरूवातीला पाणी कमी लागते. त्यामुळे लोकांचा समज आहे की, बोराला पाणी कमी लागते.