'कसमा' पट्ट्यातील डाळींब शेतीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदान

श्री. सय्यद आय. आर., (B.Sc. Agri.)
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, कृषी विज्ञान केंद्र, नाशिक.
मो: ९३७०३६४३३६डाळींब सर्वसाधारण कोणत्याही हवामानात येते. मात्र समशितोष्ण हवामानात उत्पादनक्षमता वाढून फळांची प्रत चांगली मिळते. नाशिक जिल्ह्यातील कसमा विभागात (पट्ट्यात) १९८० सालापासून डाळींब लागवडीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. सुरुवातीस ऊस, कांदा व पारंपारिक पिकांमुळे जमिनी निकृष्ट बनल्या. या भागात पाणी भरपूर असतानादेखील मजुराभावी डाळींबकडे शेतकऱ्यांचा कळ वाढू लागला आहे. कारण या पिकाचे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळून द्राक्षापेक्षा कष्ट कमी, खर्च कमी व मजूर कमी लागतो. तसेच वार्षिक पीक असल्यामुळे जमिनीचा पट्टा डाळींबासाठी योग्य. २० वर्षापूर्वी कांदा, गहू, हरभरा, भुईमूग, ऊस व भूसार पिकांखाली येथील क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. परंतु या पिकांमध्ये उत्पादन कमी व बाजारभाव अपेक्षेपेक्षा कमी मिळत असे. ऊस बारा महिने असून उतार एकरी ३० ते ४० टनापुढे जात नसे.

डाळींब पिकासाठी हवामान, तापमान दिवसेंदिवस योग्य ठरत गेले. सुरुवातीस या परिसरात मस्कत डाळींबाची लागवड केली गेली. त्याच्या ५ ते ७ किलोच्या पाटीला ५ ते १० रू. दर त्याकाळी मिळायचा. नंतर गणेश, आरक्त्ता, शेंदरी (भगवा) वाणांच्या लागवडी वाढू लागल्या. कसमा पट्ट्यात तापमान वाढू लागले. पाणी कमी झाले. उपलब्ध पाणी द्राक्ष पिकांसाठी पुरेणासे झाले. मजुर वर्ग मिळत नाही. अशा परिस्थितीत द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र कमी होऊन डाळींबाचे क्षेत्र वाढू लागले. डाळींब पिकासाठी बाजारपेठ, दळणवळणाची साधने वाढली, अहमदाबाद मार्केटमध्ये डाळींब चांगल्या भावाने (दराने) विकले जावू लागले. आरक्त्ता, शेंदरी वाणाच्या डाळींबाला ५० ते ६० रू. किलो बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळू लागल्याने माल निर्यात होऊ लागला. उत्पादन जास्तीत जास्त व आर्थिकदृष्ट्या परवडेल असा मिळू लागला. तसेच युरोपियन व आखाती देशात माल पाठविण्याइतपत गुणवत्ता (Quality) असलेली फळे निर्माण करण्याची क्षमता डाळींब उत्पादकांकडे आली.

डाळींबातील बहार:

१) मृग बहार : एप्रिल व मे महिन्यात पाण्याचा ताण देऊन फळे नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये काढणीस तयार होतात.

२) हस्त बहार : जुलै महिन्यात झाडांना ताण देऊन (पाऊस नसेल तर) फळे मार्च महिन्यात काढणीस तयार होतात.

३) आंबे बहार : नोव्हेंबर -डिसेंबर महिन्यात बागेस ताण देऊन फळे जुलै, ऑगस्ट महिन्यात तयार होतात.

कळवण, सटाणा, मालेगांव, देवळा (कसमादे) या परिसरात सद्यपरिस्थितीत मृग बहार व आंबे बहार धरण्याकडे डाळींब उत्पादकांचा कल आहे. मृग बहारात रोग - किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवला, मर रोगांमुळे झाडे वाळून गेली. त्याचप्रमाणे सरकोस्पोरामुळे पानावरील फळावरील चट्टे, कोलेटीट्रिकमचे पानावरील व फळावरील ठिपके, अॅस्परजिल्स बुरशीपासून होणारी फळकूज आदी रोगांचा प्रादुर्भाव तसेच उकाड्या, फळे बॉईल होणे, तडकणे इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागले. त्याचप्रमाणे फळ पोखरणारी अळी, पिठ्या ढेकूण (मिलीबग्ज), पिंक बोअरर, स्टेम बोअरर, खोड कीड, सुत्रकृमी, थ्रीप्स किडींचा प्रादुर्भाव जाणवला.

उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊनच उत्पादकांनी आंबे बहार धरला आहे. मागील काही वर्षापासून शेंदरी (भगवा), आरक्त्ता, काळा आरक्त्ता, मृदुला जातीच्या लागवडी मोठ्या प्रमाणात होत आहेत. या भागातील ताहाराबाद, उतरणे, पिंपळ कोठे, नामपूर, सटाणा, आसखेडा, पिंगळवाडे, भडाणे, दयाने, लखमापूर, देवळा, कळवण, वाजगांव, ब्राम्हणगांव, आखतवाडे, मालेगांव या परिसरातील काही डाळींब उत्पादक मागील ७ - ८ वर्षांपासून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच वापर बहार धरल्यापासून करून निर्यातक्षम डाळींब तयार करत आहेत. गेल्या दोन - तीन वर्षापासून त्यात सातत्याने वाढच होते आहे.

या भागात डाळींबाखालील ७०० ते ८५० एकर क्षेत्र असून चालू हंगामात आंबे बहारासाठी छाटणी करून काड्यांवर नवीन एकसारखी फुट मिळविण्याकडे उत्पादकांचा कल आहे. हवामानातील बदल, अकाली पाऊस व पाण्याचा ताण व्यवस्थित न बसणे या कारणास्तव तसेच पानगळीसाठी पानगळीसाठी इथ्रेलच्या वापरातील चुकीचे प्रमाण यामुळे पानगळ व्यवस्थित झाली नाही. फूट एकसारखी निघाली नाही. निघालेली पाने फुलकळींना घेऊनच निघाली. पानांची सेंटिंग न होता अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर फुलकळी कमी निघणे. काहींनी जिब्रेलिक अॅसिडचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे फळे उबळण्याची समस्या जाणवणार नसली, तरी फळांच्या संख्येत निश्चितच घट जाणवेल.

हवामानातील बदल, वाढते तापमान फुलकळी कमी निघण्यास कारणीभूत आहे. अशा परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या प्रिझम व थ्राईवर या औषधांचा बागेस पाणी दिल्यानंतर दोन ते चार दिवसानंतर फवारणीत वापर केल्याने फुट व पालवी एकसारखी निघते, नंतर थ्राईवर व क्रॉंपशाईनरच्या फवारणीमुळे ती गर्द हिरव्या रंगाची होऊन पाने रुंद, आकाराने मोठी (संदर्भ - कृषी विज्ञान, मे २००७, कव्हरवरील फोटो ) झाली आहेत. या हंगामात या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या पिंगळवाडे, ताहाराबाद, करंजाड, मकरंदवाडी, कापशी, आसखेडा, उतराणे, भडाणे, मेशी, वाजगांव, नामपूर, मालेगांव, सटाणा परिसरातील बागायतदारांनी अनुभव घेतला, फुलकळी मोठ्या प्रमाणात लागून फुलगळ झाली नाही.

लागवड काळजीपूर्वक न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या बागामध्ये समस्या जाणवल्या, अयोग्य जमिनीत लागवड (निचरा न होणाऱ्या व भारी), कमी अंतरावर लागवड, कुठल्याही एकाच बहारावर येतील तेवढीच कमी प्रमाणात फळे वर्षभर घेत राहणे, खोडामध्ये राखीव अन्नसाठा व असमतोल नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण तसेच C/N Ratio या कारणास्तव काही बागांवर फुलकळी नगण्य प्रमाणात जाणवते. मर रोगाचे प्रमाण, निमॅटोडसचे प्रमाण जाणवते. त्याचप्रमाणे मागील हंगामात रासायनिक खताचा अतिवापर, अति तीव्रतेची छाटणी, अनावश्यक संजीवकांचा वापर, कमी जास्त तीव्रतेची औषध फवारणी, वापरातील अयोग्य प्रमाण अशी अनेक कारणे त्यास कारणीभूत आहेत. अद्यापही बागायतदार त्याच पद्धतीने (वाटेने) जातात असे चित्र जाणवते. परिणामी बहार व नियोजन यामध्ये तफावत प्रकर्षाने जाणवते. सद्यपरिस्थितीत फुलकळी मागेपुढे असल्याचे चित्र, त्यावर पानांची कार्यक्षमता वाढविण्याची गरज आहे. पाणी टंचाई नसलेल्या भागात फुलकळी सेंटिंग डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर असल्याचे अनुभवाने सिद्ध झाले असून ज्या डाळींब बागायतदारांनी जर्मिनेटर ड्रिपद्वारे १ लिटर प्रती एकरी आणि फवारणीद्वारे १ लिटर बागेस पाणी दिल्यानंतर दिले. नंतर दुसऱ्या फवारणीतील प्रिझम १ लि. + थ्राईवर १ लि. २०० लि. पाण्यातून वापरले. त्यांच्या बागेत रुंद व निळसर गर्द हिरवीगार पान सेंटिंग झालेली आहे. तिसऱ्या फवारणीतील थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. चा २०० लि. पाण्यातून वापर केल्याने फुलकळी मोठ्या प्रमाणात लागून फुलगळ झाली नाही. (संदर्भ : कृषी विज्ञान, मे २००७, कव्हरवरील फोटो)

वॉटर शूटसचे प्रमाण कमी जाणवते. हवामानातील चढ - उतार, तापमानातील बदल यामुळे गर्भ जिरतो. नर फुलांचे प्रमाण अधिक निघत असल्याचे जाणवले आहे. साधारणपणे बहार धरल्यापासून ३५ ते ४० दिवसानंतर फुलगळ होण्यास सुरुवात होते. सेंटिंग होताना योग्य व संतुलित खतांचा वापर तसेच थ्राईवर व क्रॉंपशाईनरचा फवारणीतील वापर अतिशय फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव अनेक बागायतदारांनी घेतला. फुलकळी गळणे, कमी निघणे यासाठी अन्नद्रव्याच्या नियोजनाबरोबरच व्यवस्थापन म्हणजे योग्य निगा घेणे, झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, बागेतील कामे वेळेवर करणे, स्वच्छता राखणे, पाणी नियमित देणे, जास्त किंवा कमी पाणी अशा प्रकारे पाण्याचा ताण आदी बाबींचा विचार केला गेला पाहिजे. तसेच खतांचे संतुलन, सेंद्रिय खताचा वापर, निंबोळी पेंड व कल्पतरू सेंद्रिय खतांचा वापर निमॅटोडसवर प्रभावीपणे नियंत्रणाबरोबर अन्नद्रव्याचा समतोल राखण्यास मदत होते.

त्याचप्रमाणे मर रोगावर हमखासपणे नियंत्रणासाठी जर्मिनेटर व थ्राईवर सोबत कॉपर ऑफ्झीक्लोराईड्स + स्ट्रेप्टोसायक्लीन यांची ड्रेंचिंग (आळवणी ) देखील मर थांबविण्यास फारच उपयुक्त ठरलेली आहे. ट्रायकोडर्माच जमिनीत वापर करावा.

प्रमाण : जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉंपर १०० ग्रॅम + ६ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन + २०० लि. पाणी. असे द्रावण तयार करून प्रत्येक झाडास ५०० मिली द्रावण बुडाजवळ ओतणे.

तेल्या : मर रोगांची समस्या दिवसेंदिवास प्रकर्षाने जाणवत असतानाचा गेल्या २- ३ वर्षांपासून जिवाणू (तेल्या) रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळींब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सदर रोगाची तीव्रता नाशिक जिल्ह्यात वाजगांव, द्रवळा परिसरातील काही बागांवर जाणवू लागली. सोलापूर जिल्ह्यातील कोरडवाहू भातात उदा. सांगोला व परिसरात या रोगाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

झान्थोमोनास, अॅनोकझोपोडीस, पी.व्ही., पुनिकी या जिवाणुंमुळे पानांवर, फळांवर डाग पडणे, पान गळणे, फळे गळून पडणे ही बाब प्रकर्षाने जाणवते.

सटाणा व परिसरात या रोगांची तीव्रता कमी असली तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. डाळींब क्षेत्र टप्प्याटप्प्याने वाढते आहे. एका बागेवरून दुसऱ्या बागेवर तेल्या पसरण्यास वेळ लागणार नाही. बागेची स्वच्छता ही सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. स्वच्छ सुर्यप्रकाश व हव खेळती यासाठी फांद्यांची हलकी छाटणी, त्याचप्रमाणे डाळींब पिकाची नवीन लागवड करताना ५ - ५ मीटर अंतरावर करणे.

तेल्याच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाच्या फवारण्य बरोबरच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वेळापत्रकाप्रमाणे फवारण्या अत्यंत प्रभावी असल्याचे पिंगळवाडे, वाजगांव परिसरातील डाळींब उत्पादकांचे बोलके अनुभव आहेत.

तेल्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन ०.५ ग्रॅम + ब्लू कॉपर किंवा ब्लायटॉंक्स ०.५ ग्रॅम / लि. प्नायातून फवारणी पानांवर, फळांवर तसेच ८ ते १० दिवसांनी बॅक्टेरीया मायसिन २.५ ग्रॅम + निमार्क १० मिली + कॉपर ऑक्झीक्ळोराईड्स २.५ ग्रॅमची प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे फवारणीपत्रक

डाळींब पिकासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या केल्यास निर्यातक्षम व भरघोस उत्पादन घेता येते.

जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन व कल्पतरू सेंद्रिय खत वापरून विक्रमी दर्जेदार (निर्यातक्षम) उत्पादन मिळवा.

जर्मिनेटर: एकसारखी फुट, पांढर्‍या मुळ्यांची वाढ, गुटीकलम करताना अत्यंत उपयुक्त, मर रोग थांबतो, पुन्हा मर होत नाही. छाट कलमांना मुळ्या फुटतात.

थ्राईवर: नवीन पालवी रुंद व गर्द हिरवी होते. फुलकळी मोठ्या प्रमाणात निघतो. फुलगळ थांबते व वॉटर शूट थांबतो. पानांमध्ये राखीव अन्नसाठा तयार होतो, फळ सेटींग (कर्बग्रहणाची क्रिया वाढवतो), रोगांवर प्रभावी व प्रतिबंधक उपाय म्हणून फायदेशीर.

क्रॉंपशाईनर: खराब वातावरण (ऊन, पाऊस, थंडी, घुके) यापासून संरक्षण, फुलकळी, पाने तजेलदार राहतात. फुलांना शाईनींग येते. ट्रान्सपोर्टमध्ये माल खराब होत नाही. उन्हात पाने, फुलकळी टवटवीत राहते.

राईपनर: नैसर्गिक गडद रंग, वजनात वाढ, दाणे, एकसारखे राहून कलर येतो, पक्वता, आकार वाढतो.

प्रोटेक्टंट: पाने, देठ, खोड, फुल यांचेवर केसाळ लव तयार होते. त्यामुळे थ्रीप्स, काळा मावा यावर प्रतिबंधक, पिठ्या ढेकणावर प्रभावी. सुरसा अळी, फळ पोखरणारी अळी नियंत्रणासाठी प्रभावी.

प्रिझम प्रतिकूल परिस्थितीत फूटवा एकसारखा निघतो, जुन्या बागांनाही फूटवा भरपूर निघतो.

न्युट्राटोन : डाळींब फुलकळी निघताना जिरत नाही. माल पोसण्यासाठी, किंगसाईज, सुपरसाईज माल तयार करण्यासाठी उपयुक्त.

कल्पतरू : उत्कृष्ट सेंद्रिय खत C/N Ratio व्यवस्थित होतो. मुख्य व दुय्यम अन्नघटकांचा समतोल राखला जातो.

आळवणी: जर्मिनेटर १ लि. + २०० लि. पाणी (ड्रीपमधून) बहार धरते वेळेस द्यावे.

फवारणी

१) बहार धरताना - छाटणी झाल्यानंतर ( ४ ते ५ दिवसांनी - पहिले पाणी दिल्यानंतर २ ते ३ दिवसांनी) प्रिझम ५०० मिली + जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + २०० ते २५० लि. पाणी.

आळवणी - जर्मिनेटर १ लि. + २०० ते २५० लि. पाणी (ड्रीपमधून).

२) दुसरी फवारणी : पहिल्या फवारणीनंतर १२ ते १३ दिवसांनी (नवीन पालवी पिवळसर,तांबूस रंगाची असताना) थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम किंवा किटकनाशक + २०० ते २५० लि. पाणी.

३) तिसरी फवारणी : वरील फवारणीनंतर १० दिवसांनी (२२ ते २४ व दिवस - चौकी तयार होत असताना) थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम किंवा किटकनाशक + बुरशीनाशक + २०० ते २५० लि. पाणी .

४ ) चौथी फवारणी : वरील फवारणीनंतर १५ दिवसांनी (३५ ते ४० वा दिवस - कळी निघते वेळेस) थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + ५०० ते ७५० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + २०० ते २५० लि. पाणी .

आळवणी :फुल साईज सेटिंग (५० वा दिवस) जर्मिनेटर १ लि. + २०० ते २५० लि. पाणी (ड्रीपमधून देणे).

५) पाचवी फवारणी : गाठ सेटिंग अवस्था (लिंबू आकार) थ्राईवर १ लि + क्रॉंपशाईनर १ लि. + प्रिझम ५०० मिली + न्युट्राटोन १ लि. + १ किलो प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + बुरशीनाशक + २०० ते २५० लि. पाणी.

६ ) सहावी फवारणी : (९० ते १०० दिवसांनी) थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + १ किलो प्रोटेक्टंट + २०० ते २५० लि. पाणी.

किंग साईज, सुपर साईज मालाचे तोडे चालू असेपर्यंत थ्राईवर + क्रॉंपशाईनर सोबत न्युट्राटोन + राईपनरची दर १५ दिवसांनी फवारणी घ्यावी.

वेगवेगळ्या हवामान व हंगामात सर्व उत्पादने आमच्या 'कृषी विज्ञान' केंद्रावरील तज्ञांचे सल्ल्याने वापरावीत.