झाडे वठू नये व नवीन डाळींबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. अशोक धोंडीबा माळी,
मु.पो. शिरभावी, ता. सांगोला, जि. सोलापूर,
फोन: (०२१८७) २५४४५३डाळींबाच्या २५० झाडांची ७ वर्षाची बाग आहे. यातील २५० पैकी ५० झाडे वठली. लागवड १०' x १०' वर आहे. त्याला सरांनी सांगितल्या प्रमाणे पंचामृत औषधे प्रत्येकी ७० ते ८० मिली + प्रिझम ७० मिली + १० लिटर पाणी वाफशावर महिन्यातून ३ वेळा प्रत्येकी १ लि. खोडावरून चुळ भरणार आहे. वाफसा पाणी दिल्यावर १० मिनिटात येतो. नवीन बागेची १२' x १२' वर लागवड २ वर्षापूर्वी केली आहे. ती सुरू होण्यासाठी पंचामृत (राईपनर सोडून) व प्रिझम प्रत्येकी ५०० मिली १०० लि. पाणी १५ दिवसांचे अंतराने दोनदा फवारणार आहे.

रासायनिक खते बंद केली आहेत. शेणाची रबडी व गोमुत्र झाडांना दिले. १ ते १ ॥ किलो वजनाची फळे असून ५, ६, ८ नागांची पेटी असते. ६ नाग आज ७५ रू. ला गेलेत. दोन्ही बागांना (चालू व नवीन) ४०० लिटर पाणी लागते. त्यासाठी चालू बागेसाठी पंचामृत राईपनरसह प्रत्येकी १ लिटर + १ लि. न्युट्राटोन + २०० लिटर पाणी याप्रमाणे फवारण्यास सरांनी सांगितले, ही सर्व औषधे आज नेत आहे. ८ फेब्रुवारीला पाणी सोडून निंबोळी अर्धा किलो + कल्पतरू सेंद्रिय खत अर्धा किलो वापरले आहे.

मुंबई (वाशीला) १० रू. वाहतूक + १० रू. पेटी + कमीशन, हमाली, तोलाई, इतर असे सर्व मिळून १० रू. असा एका पेटीस ३० ते ३५ रू. खर्च येतो. त्यामुळे वाशी करावेसे वाटत नाही. पेटी १०० रू. ला गेल्यास ३० - ३५ रू. खर्च वजा जात शेतकर्‍याला ६५ ते ७० रू. राहतात. बाकी सारा खर्च वजा जाऊन पडताळा राहत नाही, म्हणून आम्ही पुणे पसंत करतो.