डाळींबाच्या तेल्या व इतर रोग किडीवर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने मात करणार्‍या प्रगतीशील शेतकर्‍यांचे अनुभव

श्री. आत्माराम बाबुराव खांडेकर (B.E. Ele.),
मु. कुरणेवाडी, पो. वरकुटे मलवडी, ता. माण, जि. सातारा.
मो. ९८६९९८८३४३उपटून टाकायच्या अवस्थेतील तेल्याग्रस्त डाळींबापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्यातक्षम उत्पादन

भगवा डाळींबाची ८५० झाडे १२' x १०' अंतरावर जुलै २००६ मध्ये लावली आहेत. जमीन अत्यंत वरकस असून चढ - उताराची आहे. डाळींबाला ठिबक सिंचन करून दीड वर्षात पहिला बहार धरला. त्यावेळी झाडे लहान असल्याने फळे साधारणच मिळाली. त्यांना जागेवर २८ रू. किलो भाव मिळाला होता. या बहारात लागवड खर्च निघून पुढील बहारासाठी भांडवल उपलब्ध झाले.

चालू अंबीया बहार नोव्हेंबर २००८ अखेरीस धरला. झाडांना रासायनिक खते, शेणखत देऊन पाणी सोडले. फुलकळीही समाधानकारक लागली. बहार धरल्यानंतर २॥ महीन्यांपर्यंत फळांवर कोणत्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव नव्हता. परंतु त्यानंतर काही दिवसांतच ४ झाडांवरील फळांवर तेल्यासदृष्य डाग दिसू लागले. तेल्याचे डाग दिसू लागताच रासायनिक औषधे फवारणीची प्रमाण ८ दिवसांवरून ४ दिवसांवर घेतले आणि डाग असलेली फळे काढून टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ३ - ४ तेल्याची फळे निघत असता, परंतु १० ते १२ दिवसांतच १५ झाडांवर तेल्याचा अॅटॅक खूप वाढला.

रोज १ ते १॥ क्रेट (१५० ते २०० फळे) तेल्याची फळे निघू लागली. रासायनिक औषधे फवारणीचे प्रमाण ४ दिवसांवरून २ दिवसांवर घेतले. आमच्या भागातील इतर शेतकर्‍यांच्याही बागांवर तेल्या होता. त्यामुळे आमच्या बागेतही तेल्या येणे सहाजीकच होते. २ दिवसाआड फवारणी घेतल्यामुळे तेल्या पसरण्याचे प्रमाण कमी झाले होते, पण तेल्याग्रस्त तडकलेली फळे निघतच होती. ३॥ महिने झाले होते. बागेची परिस्थिती फारच बिकट झाली होती. मानसिक स्थिती बिघडत चालली होती. इतर शेतकर्‍यांच्या बागेप्रमाणे आपलीही बाग तेल्याने जाणार अशी भिती वाटू लागली. तेल्यावर औषध नाही हे पूर्णपणे माहित होते. त्यामुळे झाडे काढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.

त्याच कालावधीत माझे जुने प्रो. शिंदे माझ्याकडे सहज कांद्याच्या प्लॉटबद्दल चौकशी करण्यासाठी आले होते. बोलताबोलता डाळींबाचा विषय निघाला. शिंदे सरांनी डाळींबाची बाग बघण्याची इच्छा व्यक्त केली. बाग बघितल्यावर शिंदे सरांच्या लक्षात आले की बागेवर तेल्या आहे. त्यांनी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्याच्या सल्ला दिला, ती कशी आणि किती प्रमाणात वापरायची याबद्दल आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केले. आधी रासायनिक औषधांची २ दिवसाआड घेत असलेली फवारणी बंद करून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ८ - ८ दिवसांनी फवारण्य घेरू लागलो. ३ फावराण्यानंतर फालांवरील तेल्या पूर्णपणे थांबला. तो कुठेही पसरला नाही. एरवी रोज १ ते १॥ क्रेट रोगट फळे निघणारी तेथे मात्र ४- ५ फळे निघू लागली. ४ थी फवारणी झाल्यानंतर फळांवर तेल्याचे डाग परत दिसले नाहीत आणि आता आमची बाग तेल्यापासून पूर्णपणे मुक्त झाली आहे. डॉ. बावसकर सरांच्या औषधामुळे बागेतील तेल्या आणि इतर रोग चिकटा, करपाही पूर्णपणे गेला, फळांची साल जाड झाली. त्यामुळे फळांचे क्रेकींग झाले नाही. फळांना आकर्षक नारिंगी रंग आणि उत्तम चमक आली आहे.

आता आमची फळे विक्रीसाठी पूर्णपणे तयार आहेत आणि तीही पूर्णपणे निरोगी असून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्यामुळे फळे पौष्टीक, गोडीला उत्तम आहेत. शिवाय फळांतील रासायनिक औषध फवारणीचा विषारी अंश पूर्णता नाहीसा झाल्याने शरीराला अजिबात अपायकारक नाहीत.

सध्या प्रत्येक झाडांवर ४० ते ६० फळे असून निम्म्याहून अधिक 'ए - १' दर्जाजी आहेत. फळांना आकर्षक चमक असून ४५० ते ६०० ग्रॅम वजनाची फळे आहेत. उरलेली एक नंबर आहेत. ही बाग काढून टाकण्याच्या अवस्थेतून बाहेर काढून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे निर्यातक्षम माल उत्पादन करणे शक्य झाले. या प्लॉटवर १० मार्च २००९ रोजी डॉ.बावसकर सरांच्या मार्गदर्शनाखाली 'डाळींबावरील तेल्या व इतर रोगांचे नियंत्रण ' या विषयावर परिसंवाद व शिवारफेरी आयोजीत केली होती. त्यावेळी सरांनी आणि परिसरातील डाळींब उत्पादकांनी तसेच तालुक्यातील कृषी अधिकार्‍यांनी सदर प्लॉटची पाहणी केली असता बागायतदार, कृषी अधिकारी आनंदाने आश्चर्यचकीत झाले.

शिंदे सरांच्या मार्गदर्शनाने डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आमची बाग तेल्यापासून वाचली याचा आम्हाला फार आनंद होत आहे.

सध्या ४॥ टन डाळींब फळे तयार असून ५५ रू./ किलोप्रमाणे जागेवर दर मिळाला आहे. अजुन ७ टनापर्यंत माल निघण्याची अपेक्षा आहे.