प्रतिकुल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने डाळींब बागेस फुलकळी

श्री. सुदाम दादाजी शिरसाट,
मु. पो. मेशी, ता. येवला, जि. नाशिक.४ वर्षानंतर प्रथमच शेंदारीचा फुटवा व कळी समाधानकारक

मी डाळींबाच्या शेंदरी जातीची ४ वर्षापूर्वी १०' x १२' अंतरावर लागवड केलेली असून गेल्या ४ वर्षापासोन माझ्या डाळींब पिकामध्ये म्हणावा तसा फुटावा होत नव्हता. क्वालिटी बनत नव्हती. प्रत्येक वर्षी वेगवेगळा प्रयोग करत होतो तरी काही समाधानकारक फरक जाणवत नव्हता. आमच्या गावातील श्री. लक्ष्मण तुळशिराम चव्हाण यांची डॉ.बावसकर सरांच्या औषधांचा वापर केला होता. त्यांचा अनुभव पाहत मी यावर्षी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पंचामृत औषधांचा वापर करावयाचे ठरविले. पाणी तीन आठवडे तोडले. फेब्रुवारीच्या दुसर्‍या पंधरावड्यात पानगळ झाली. एप्रिलमध्ये पहिले पाणी दिले नंतर ८ व्या दिवशी जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + पाणी १०० लि. या प्रमाणात फवारणी केली. फुटवा फारच चांगला निघाला. आतापर्यंत असा फुटवा कधीच झाला नव्हता. फुलकळी जोरात, भरपूर निघाली, दुसरी फवारणी २८ दिवसांनी थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + १५० लि. पाणी या प्रमाणात केली. पाने निरोगी, रुंद होऊन फळांनी गाठ चांगली धरली. कळीची गळ अजिबात झाली नाही. फळांना शाईनिंग अतिशय चांगली मिळाली. आज रोजी थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली.( १५० लि. पाण्यातून फवारण्यासाठी) औषधे घेतली आहेत. कल्पतरू खताचा वापर करण्याचे ठरविले असून ते पुढील आठवड्यात नेऊन वापरणार आहे. यापुढे रासायनिक खते कमी करून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचीच औषधे व खताचा वापर करणार आहे. फळांच्या फुगवणीसाठी पुढील फवारणीत राईपनरचा वापर उपयुक्त ठरेल. अशी खात्री आहे.