प्रतिकुल परिस्थितीत डाळींब बहारातील फुलकळी निघण्यातील समस्या व उपाययोजना

श्री. सय्यद आय. आर. (B.sc.Agri.),
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, कृषी विज्ञान केंद्र, नाशिक.
मो. ९३७०३६४३३६डाळींब पिकांमधील महत्त्वाची बाब म्हणजे फुल ते फळ सेटिंग होणे होये. याकरिता योग्य बहाराची निवड ही नैसर्गिक बाबींचा विचार करूनच ठरवावी. त्याचप्रमाणे बागेतील पाणी व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर, बागेस दिलेला ताण पुरेसा आहे का हे पाहणे, झाडातील जोम व कडीतील अन्नद्रव्यांचा साठा, हवामान इत्यादी बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

सद्य परिस्थितीत डाळींब उत्पादकांनी हस्त बहाराचे ज्यांनी नियोजन केले, त्यांनी सप्टेंबरमध्ये पाणी तोडले व ऑक्टोबरमध्ये बागेचा ताण सोडला (पाणी दिले), परंतु चालू वर्षी उशीरा पाऊस पडल्यामुळे (ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात) हस्त बहारात झाडांना विश्रांती (Rest Period) मिळाली नाही. पाण्याचा ताण व्यवस्थित बसला नाही. अशा परिस्थितीत छाटणी अगोदरच पाणी न देतादेखील डाळींब बागेत पानगळ करण्या अगोदर फुले निघण्यास सुरुवात झाली. अशावेळी बागेची पानगळ करण्यासाठी पानगळीच्या औषधांच्या (तीव्र औषधांची फवारणी) वापरातील प्रमाणात अधिक वाढ झाली. त्याचप्रमाणे विश्रांती काळात मिश्र खतांचा वापर झालेला असल्यास पानगळ व्यवस्थित होत नाही.

अधिक प्रमाणात पानगळीच्या औषधांच्या फवारण्यामुळे सुक्ष्म अवस्थेतील गर्भ जिरला जावून फुलधारणा होते नाही, अथवा कमी प्रमाणात झालेली दिसून येते. वातावरणातील बदल, ढगाळ हवामान, थंडीतील होणारा आकस्मिक बदल, दिवस व रात्र यातील तापमानातील होणार बदल व पाणी देण्याच्या पद्धतीतील होणारा बदल, दर दोन ते तीन दिवसानंतर तापमानातील होणारा चढ - उतार, फुलधारणेस आवश्यक असलेले २५ डी. ते ३० डी. सेल्सिअस तापमानाचा अभाव व काडीतील अन्नद्रव्याचा कमी साठा या कारणास्तव हस्त बहारात फुलधारणेत अडथळे निर्माण झाले. त्यामुळे फुलधारणा कमी झाली, तर काही ठिकाणी झालीच नाही. यामध्ये अशीरा का होईना फुलधारणा होईल की नाही अशा, परिस्थितीमध्ये डाळींब बागायतदार द्विधा मनस्थितीत आहेत. कारण हस्तबहार सोडून आंबे बहार धरावा का ? का धरलेल्या हस्तबहाराचीच वात पहावी ? हे समजेना.

तेव्हा ज्यांच्या बागांमध्ये ४० - ५० % किंवा ३० % हून अधिक फुलकळी निघाली आहे. त्यांनी आलेला बहार धरण्यास हरकत नाही. कारण जानेवारी अखेरनंतर तापमानात वाढ होऊ लागेल. त्यामुळे फुलकळी निघणारच आहे. म्हणजे उत्पादन मिळेल. मात्र यामध्ये एवढीच समस्या आहे की, सर्व फळे एकावेळी तयार न होता मागे - पुढे मिळतील.

तर ज्यांच्या बागेमध्ये हस्त बहाराला अजिबात फुलकळी निघाली नाही किंवा २०% हूनही कमी आहे. त्यांनी आंबे बहार धरावा, तर ज्यांनी हस्त बहार धरलाच नाही त्यांनीही डिसेंबर - जानेवारीत ताण देऊन जानेवारीअखेरीस ते फेब्रुवारीच्या पहिला पंधरावड्यात पाणी देऊन आंबे बहार धरावा. यामध्ये वरील (फुलकळी एकसारखी न निघण्याच्या) समस्येवर खालील उपाययोजना करावी.

उपयायोजन : १) वॉटर शूटस काढणे.

२) बागेस पाणी देताना हवामान, हंगाम व जानिनीची प्रत (प्रकार) इत्यादी बाबींचा विचार करून पाणी योग्य प्रमाणात देणे.

३) खतांचा (Fertigation)योग्य प्रमाणात (संतुलित) वापर असावा. उदा. नत्राचा अतिरिक्त वापर टाळावा. नत्र स्फुरद (१२ : ६१: ० सारखी) खते योग्य प्रमाणात द्यावीत.

४) यामध्ये कल्पतरू या सेन्दिर्य खताचा वापर केल्यास परिणामकारक बदल जाणवेल.

५) गर्भधारणा व्यवस्थित होण्यासाठी, फुलकळी भरगच्च लागण्यासाठी,सेटिंग होण्यासाठी थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + बुरशीनाशक + २०० ते २५० लि. पाणी या प्रमाणात फवारणी करवी. वरील फवारणीनंतर १५ दिवसांनी वरीलप्रमाणेच फवारणी केल्यास कळी व्यवस्थित निघेल.

अशा प्रकारे नियोजन केल्यास सद्य परिस्थितीत (प्रतिकूल) गर्भ न जिरता मादी फुल संख्या ६० ते ७० % पर्यत वाढलेली निश्चितच दिसेल व फुलगळ समस्येवरदेखील व्यवस्थितपणे मात करता येईल. नर फुलांची संख्या वाढणार नाही अथवा नर फुले गळत असताना मादी फुलांच्या पोषणावर परिणाम होऊ न देता मादी फुलांची गळ होणे पर्यायाने थांबेल. पुढे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या डाळींबासाठी फवारणीपत्रकाप्रमाणे फवारण्या केल्यास फळांची सेंटिंग (गाठ सेटिंग ) व्यवस्थित साधता येईल. पर्यायाने उत्पादनात व गुणवत्तेत वाढ होऊन तेल्या, मर, सारकोस्पोरा, अल्टर नेरिय, कोलिटोट्रिकम, अॅस्परजिल्स, अॅन्थ्रॅक्नोज वर प्रभावी प्रतिबंधत्मकपणे मात करता येईल आणि निर्यातक्षम (किंग साईज, सुपर साईज) फळांचे उत्पादन मिळेल.