रोगमुक्त भगवा डाळींब प्रतिकुल परिस्थितीत भाव चांगले

श्री. हरी गोपाळ कमानकर (गुरुजी),
मु.पो. भेंडाळी, ता. निफाड, जि. नाशिक.माझ्याकडे शेंदरी व आरक्ता डाळींबाची ४०० झाडे आहेत. ४ वर्षापूर्वी १०' x १२' अंतरावर लागवड केली असून दोन वर्षापासून मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करीत आहे. मागील वर्षी आंबे बहार धरला. नोव्हेंबरमध्ये ताण दिला. बागेची २६ जानेवारी २००७ छाटणी केली. छाटणीनंतर ४ थ्या दिवशी जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी व जर्मिनेटर १ लि. + २०० लि. पाणी याची आळवणी केली. त्यामुळे फुटवा एकसारखा मिळाला. दुसरी फवारणी १५ दिवसांनी थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. नंतर थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात दोन फवारण्या केल्या. त्याने पानाचे सेटिंग व्यवस्थित होऊन पाने रुंद, फुलकळी मोठ्या प्रमाणात लागून फुलगळ कमी झाली. सरांच्या औषधांच्या व्यतिरिक्त बुरशीनाशक व किटकनाशकांच्या फवारण्या केल्या. गाठ सेटिंग अवस्थेत ५ वी फवारणी थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात केली. सेटिंग अवस्थेत अप्रतिम रिझल्ट मिळाला. ६ वि फवारणी ९५ व्या दिवशी थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + राईपनर १ लि. + २०० लि. पाणी अशी केली असता फळांना कलर येउन आकारमान, वजन वाढलेले जाणवले. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात माल संपला. एकंदरीत ५५० कॅरेट (Crate) माल निघाला. अति पावसात अॅस्परजिलीयम व कोलोट्रिकम रोगाने जवळपास १५० ते १६० कॅरेट माल खराब झालेला काढावा लागला. परंतु सर्व ५५० कॅरेटला ४५० रू. ते ६७५ रू. दर मिळाला. १,७५,००० रू. झाले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी बाग लावून प्रतिकूल परिस्थितीत चांगले उत्पादन मिळून पैसे झाले. इतरांच्या हाती काहीच लागले नाही.

माझ्याकडे असलेल्या डाळींब बागेत मर रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. आमच्या कडे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव नाही. निमॅटोडचा प्रादुर्भाव होता तो आटोक्या आणण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर केला.

मागील वर्षी पावसामुळे फळांचे नुकसान झाले. पूर्ण बागेत बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने ४५ ते ५० हजार रू. खर्च केला होता. तरीही हाती काहीच लागले नव्हते. कृषी खात्याने, पंचायत समितीने मदत देऊ असे आश्वासन दिले, पण त्यावर कार्यवाही झालीच नाही. यावर्षी डाळींबाचे यशस्वी उत्पादन घेऊन त्याची कसर काढली.

माझ्याकडे एक एकर थॉमसन द्राक्ष बागेवर एप्रिल छाटणीपासून फवारणीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर सुरू आहे. काड्या तयार झाल्या. अद्याप पाने टिकून आहेत. भुरीचा प्रादुर्भाव कमी झाला. एप्रिल छाटणीपासूनच्या शेवटच्या फवारणीतील थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + २०० लि. पाणी या फवारणीमुळे छाटणी २० सप्टेंबर दरम्यान करीत आहे.