रायझोबियमपेक्षा जर्मिनेटरमुळे हरबऱ्याची उगवण उत्तम व अधिक
श्री. विवेक नारायणराव लोखंडे,
मु. बुदागड, पो. म्हैसपूर, ता. भातकुली, जि.
अमरावती.
मोबा. ८६०५४७८१६७
अमरावती प्रदर्शनमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे स्टॉंलवर चौकशी करून सर्व पिकांची सविस्तर
माहिती घेतली. 'कृषी विज्ञान' मासिकाची वर्गणी भरून काही महिके खरेदी केली. घरी जाऊन
मासिकांचे वाचन केल्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे पुणे ऑफिसला
हरबरा + कपाशी या पिकांची माहिती फोनवरून घेतली. त्यावरून हरबरा १० एकर लागवडीसाठी
जर्मिनेटरची (१ किलो हरबरा बियाणे + ३० मिली जर्मिनेटर + एक ग्लास पाणी याप्रमाणामध्ये
सर्व बियाण्यास वरील द्रावण शिंपडून) बीजप्रक्रिया केली. नंतर प्लॅस्टिक तळवटावर पसरून
खडखडीत वाळवून नंतर पेरणी केली असता उगवण १०० % होऊन हरबरा प्लॉटला काळोखी आली. तेजदार
मोड निघाले. तर काही हरबरा पी. एस. बी. (रायझोबियम) पावडर लावून पेरणी केली असता उगवण
त्यामानाने कमी झाली. आज रोजी पिवळसर प्लॉट दिसत असल्यामुळे पुणे ऑफिसला फोनवरून संपर्क
साधला असता त्यांच्या सल्ल्यानुसार जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट प्रत्येकी
५०० मिली २०० लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी दोन्ही प्लॉटवर करणार आहे. औषधे सोनाली ट्रेडर्स
अमरावतीमधून घेतो. तसेच पाच एकर कापूस सुपर मारुती, कणक आणि अंकुर असे प्रत्येकी दीड
एकरप्रमाणे असे ५ एकर जिरायत कापसासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या शिफारशीप्रमाणे आजपर्यंत
तीन फवारण्या केल्या आहेत. प्लॉट परिस्थिती आमचे भागात इतरांपेक्षा एकदम चांगली आहे.
प्रत्येक फवारणीला पुणे ऑफिसला फोनवरून माहिती घेत असतो आणि सांगितल्याप्रमाणे प्रमाणशीर
फवारणी करतो.