हार्मोनीचा दर ४ ते ५ दिवसांनी स्प्रे डावण्या अजिबात नाही

श्री. सुभाष लक्ष्मण माळी,
मु. पो. सावळज, ता. तासगाव, जि. सांगली,
मोबा. ९९७०८९६९२८


माझ्या बागेत कोवळ्या पानावरती डावणी होता. बोर्डोचा स्प्रे करून देखील डावणी फुलतच होता. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे हार्मोनी हे औषध १.५ मिली + एम ४५ - १.५ ग्रॅम/लिटर असे स्प्रे केले. डावणी सुरूवातीस तांबूस पडून व नंतर तो डावणी इतरत्र कोठे ही फुलला नाही. असा स्प्रे मी खराब वातावरण झाल्यावर दर चार ते पाच दिवसातून करत राहलो व आज तागायत माझ्या बागेत डावणी अजिबात त्रास देत नाही.

हार्मोनीमुळे बागेची पाने हिरवट काळपट दिसत आहेत. हार्मोनीमुळे माझ्याबागेत डावणी येण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे इतर औषधांवरील खर्चात बचत झाली आहे. हार्मोनी हे औषध अतिशय चांगले आहे.