कमी पाण्यात, कमी काळात ऊस २२ ते २५ कांड्यांवर
डॉ. पंकजराव दादासो शिंदे,
मु.पो. सांगावी, ता. बारामती, जि. पुणे.
मोबा. ९८२२१९५१३५
माझ्याकडे मौजे सांगवी येथे तीन एकर काळी कसदार, मध्यम चोपण स्वरूपाची जमीन आहे. पारंपारिक
पद्धतीने शेती करत असताना गेली तन वर्षापासून शेवगा एक एकर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाप्रमाणे
वेळोवेळी फवारणी केल्यामुळे भरपूर फायदा झाला आहे. तो अनुभव 'कृषीविज्ञान', जुलै २०११
च्या मासिकामध्ये दिला आहे. मार्च २०११ मध्ये २० गुंठे शेवगा काढून त्यामध्ये 'कोईमतूर
८६०३२ ऊसाची लागवड सरी
पद्धतीने करताना ऊस कांड्या (दोन डोळ्यांच्या) जर्मिनेटर २५०
मिली + १० लिटर पाणी या द्रावणामध्ये बुडवून पाटीमध्ये नितळून मग लागवड केली असता भरपूर
प्रमाणामध्ये डोळे व पांढऱ्यामुळ्यांची फुट झाल्याचे जाणवली. उगवण लवकर झाली. उन्हाळा
असूनही जळ झाली नाही. त्यानंतर एप्रिल आणि मे मध्ये साधारण एक महिन्याच्या फरकाने १००
लिटर पाण्यासाठी ४०० मिली सप्तामृतची फवारणी करत होतो. कल्पतरू खत वापरण्याची इच्छा
होती मात्र वाहतुकीची सोय नसल्याने रासायनिक खते देत होतो. १२-३२-१६ च्या ४० किलोच्या
४ बॅगा + युरिया ५० किलीच्या २ बॅगा आणि इतर सुक्ष्मद्रव्याची मात्रा देत होतो. जून
२०११ मध्ये ऊस बांधणीस आला. आज रोजी २२ ते २५ कांड्यावर ऊस असून आमचे भागामध्ये एवढ्या
अल्पावधीत पाऊस कमी असतानाही एकदम चांगला ऊस आहे.