तूर पिकावरील किडी - ओळख व व्यवस्थापन
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
रणजीत कडू, राहूल गाडे, सखाराम आघाव व
राम वरगंटीवार (कीटकशास्त्र विभाग, मफुकृवि, राहुरी)
खरीप हंगामामध्ये तूर हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रामध्ये ११.८१ लाख हेक्टर क्षेत्र असून ११.०६ लाख टन उत्पादन मिळते आणि उत्पादकता ९३७ किलो/हे. अशी आहे. तूर हे खरीप हंगामातील पीक असले तरी, हे रबी हंगामात पक्व होत असल्यामुळे या पिकांवर खरीप तसेच रब्बी हंगामातील किडी आढळून येतात. पेरणीपासून पीक निघेपर्यंत जवळ जवळ २०० प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु फुले व शेंगावर होणाऱ्या किडीचे आक्रमण हे सर्वात जास्त नुकसानकारक असते. कधी कधी मोठ्या स्वरूपात कीड आल्यास ७० % पेक्षाही अधिक नुकसान शेंगा पोखरणपाऱ्या विविध किडीपासून होते. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास बरेच नुकसान टाळता येईल. शिवाय नवीन विकसीत झालेल वाण बुटके असल्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या मदतीने किडीचे नियंत्रण करणे सोपे जाते.
१. शेंगा पोखरणारी हिरवी अळी : हिरवी अळी ही भयंकर नुकसानकारक कीड आहे. या किडीस हिरवी अमेरिकन बोंडअळी, घाटे अळी इत्यादी नावांनी संबोधण्यात येते. या किडीचा पतंग पिवळसर रंगाचा असतो. मादी नरापेक्षा मोठी असून तिच्या शरीराच्या मागील भागावर केसांचा झुपका असतो. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरूवातीस सुस्त असून प्रथम कोवळी पाने व देठ कुरतडून खातात. नंतर शेंगांना अनियमीत आकाराचे छिद्र पाडून आत शिरतात व दाणे खातात. आभाळ आभ्राच्छादीत असल्यास ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो.
२. पिसारी पतंग : ह्या किडीचा पतंग नाजूक, निमुळता १२.५ मि. मी. लांब करड्या भुऱ्या रंगाचा असतो. पुढील पंख दुभंगलेले व मागील पंख तीन भागात विभागलेले असून त्यांच्या कडांवर नाजूक केसांची दाट लव असते. पुढील पंख खूपच लांब असतात. त्यामुळे त्यांना पिसांरी पतंग म्हणतात. कोष लालसर, तपकिरी रंगाचे असून अळीसारखे दिसतात. मादी कोवळे देठ, पाने, कळ्या फुले व लहान शेंगावर रात्रीच्यावेळी अलग अलग अंडी घालते. अंडी ३ ते ५ दिवसात उबवून त्यातून बाहेर पडलेली अळी शेंगेची साल खरडून तिला छिद्र पाडते व बाहेर राहून आतील दाणे खाते. ही कीड पावसाळा संपल्यानंतर तुरीवर मोठ्या प्रमाणात क्रियशील असते व घाटे अळीचे नुकसान कमी होऊ लागल्यावर या अळीचा उपद्रव वाढू लागतो.
३) शेंगमाशी : शेंगमाशी आकाराने लहान म्हणजे १.५ मि. मी. लांब असते. माशीचा रंग हिरवट काळा असतो. मादी शेंगाच्या सालीच्या आत अंडी ३ - ८ दिवसात उबवून त्यातून निघणारी अपाद अळी सुरुवातीस दाण्याचा पृष्ठभाग पोखरून खाते. त्यामुळे दाण्यावर नागमोडी खाचा तयार झालेल्या दिसतात.
४) पाने फुले गुंडाळणारी अळी : पीक फुलोऱ्यापासून या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रौढ मादी पतंग पिवळसर रंगाची असते. उभट आकाराची अंडी पुंजक्यात शक्यतो झाडाच्या शेंड्यावर घातली जातात. अळी १४ मि. मी. लांब असून हिरवट पांढरा रंग असलेली शरीराच्या दोन्ही बाजूस काळे ठिपके असलेली अशी असते. कोषावस्था चंदेरी रेशमी जाळ्यांनी विणलेल्या अवस्थेत जमिनीत आढळते. कमी कालावधीत असणाऱ्या जाती विशेष बळी पडतात. जास्त आर्द्रता असलेल्या भागात ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. अळी पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्या गुच्छ तयार करते व वाढणारे कोवळे शेंडे, पाने आणि शेंगा एकमेकांना चिकटल्यामुळे शेंगाचे प्रमाण कमी होऊन उत्पादन कमी होते.
तूर पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन :
१) बाजरी, ज्वारी, भूईमुग, कपाशी, सोयाबीन आंतरपीक पद्धतीने पेरणी करावी.
२) पेरणीचे वेळी तुरीच्या बियाण्यात १०० -२०० ग्रॅम ज्वारी बियाणे मिसळावे. ज्वारी ची ताटे पुढे पक्षी थांबे म्हणून उपयोगात येतात.
३) वेळेवर कोळपणी व खुरपणी करावी.
४) हेक्टरी १० कामगंध सापळे पिकात उभारावेत यामुळे शेंगा पोखरणारी हिरवी अळीचे सर्वेक्षण व काही प्रमाणात नियंत्रण करण्यास मदत होईल.
५) कीड प्रतिबंधक वाणांचा वापर करावा.
६) प्रति हेक्टर ५० पक्षी थांबे शेतात उभारावेत, त्यामुळे पक्षी किडीच्या अळ्या खातील.
७ ) तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील, त्या गोळा करून नष्ट कराव्यात.
८ ) गुंडाळलेली पाने व पूर्ण झालेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
९) तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे नियंत्रणाकरीता ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
१०) जैविक नियंत्रण : घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एच. ए. एन. पी. व्ही. हा त्या अळीचा विषाणू प्रती हेक्टर २५० मिली फवारावे. एच. ए. एन. पी. व्ही. च्या (२५० अळ्यांचा अर्क / हेक्टर) तीन फवारण्या एक आठवड्याच्या अंतराने कराव्यात. (हे औषध महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे 'हेलिओकील' या नामसंबोधनाने तयार करण्यात येते.)
११) शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांची संख्या : २ प्रति झाड किंवा ५ -१० % कीडग्रस्त शेंगा, पिसारी पतंग : ५ अळ्या प्रति १० झाडे, शेंगामाशी: १० टक्के उपद्रवित शेंगा आढळून आल्यास खालील प्रमाणे फवारणी कारवी.
रासायनिक कीटकनाशकांचा वापर सोडओळ अथवा पट्टा पद्धतीने केल्यास परोपजीवी किडींचे संरक्षण होऊन उपद्रवी किडींचा नाश करण्यासाठी त्याची मदत होते. पारंपारिक पद्धतीने धान्य साठवितांना मडक्यात, कोठीत, कणगीत, धान्याच्यावर रेतीचा किंवा एरंडीच्या बियांचा किंवा कडुनिंबाच्या वाळलेल्या पाल्याचा थर द्यावा. वरील पद्धतीने एकत्रितरित्या कीड व्यवस्थापनाच्या पद्धतींचा वापर केल्यास तूर पिकावरील किडींचे योग्य वेळी नियंत्रण होते. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळता येते.

कीड | उपाययोजना व फवारणीची वेळ | कीडनाशक | प्रमाण प्रति १० लिटर पाणी |
---|---|---|---|
शेंग पोखरणाऱ्या अळ्या (शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग) पाने व फुले जाळी करणारी अळी | पहिली फवारणी पिकास फुलकळी येवू लागताच | निंबोळी अर्क ५ टक्के + फेनव्हेलरेट २० % प्रवाही | ३ मिली |
दुसरी फवारणी पिक ५० % फुलोऱ्यावर असताना | क्विनॉलफॉस २५ ई.सी./ फेन्थोएट ५० ई.सी./ प्रोफेनोफॉस ४० टक्के + सायापरमेथ्रीन ४ टक्के |
१६ मिली १४ मिली २५ मिली |
|
तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी | मोनोक्रोटोफॉस ३६ ई.सी./ क्लोरपायरीफॉस २० ई.सी./ स्पिनोसॅड ४५ ई.सी/ इमामेक्टीन बेन्झोएट ५ एस.जी. |
११ मिली २५ मिली ४ मिली ३ ग्रॅम |
|
शेंग माशी | दुसऱ्या व तिसऱ्या फवारणीसोबत | डायमिथोएट ३० ई.सी. मोनोक्रोटोफॉस ३६ ई.सी./ ट्रायझोफॉस ४० ई.सी. |
१० मिली ११ मिली २० मिली |
वरील प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी कीटकनाशकाची मात्रा तीन पट करावी. |